Ganesh Chaturthi 2023 – गणेश चतुर्थी

Ganesh Chaturthi (2023) - गणेश चतुर्थी
Ganesh Chaturthi (2023) – गणेश चतुर्थी

Ganesh Chaturthi 2023 Start And End Date ?

लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना आस लागली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत असतात. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कलेचा अधिपती असलेल्या गणपती सुख चैतन्य आणि समृद्धी घेऊन येत असतो.महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होतात आणि या चतुर्थीला जल्लोषात साजरे करतात. जाणून घेऊया यंदा गणेश चतुर्थी कधी आहे.

यंदाचा गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2023) १९ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू होणार आहे. २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुर्थीला संपेल. या दिवशी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. ह्या वर्षी ganesh jayanti date 19 सप्टेंबर , वार – मंगळवार ह्या दिवशी आहे. आणि त्या नंतर 28 सप्टेंबर, वार गुरुवार 2023 ला ganesh visarjan म्हणजे अनंत चतुर्थी (विसर्जन) anant chaturdashi आहे .

चातुर्मासातील दुसरा महिना म्हणजे भाद्रपद. याचे वैदिक नाव नभस्य असे आहे. मात्र, या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र पूर्वा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राजवळ असतो म्हणून या महिन्याला भाद्रपद हे नाव दिले आहे. भाद्रपद महिना म्हटला की, केवळ आणि केवळ आठवतो तो गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथीला धार्मिक दृष्टीकोनातून विशेष महत्त्व असण्याचे कारण म्हणजे या दिवशी मंगलमूर्ती, विघ्नहर्ता, गजानन गणेशाचा जन्म दुपारी झाला. त्यामुळे गणेश चतुर्थी हा गणेश जन्मोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक भाविक १० दिवस गणेशमूर्तीची पूजा करतात तर काही भक्त गणेशमूर्ती एक दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस बसवतात. असे म्हटले जाते की गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरात ठेवून श्रद्धेने पूजा करणाऱ्यांचे सर्व संकट गणपती बाप्पा दूर करतात.

गणेश चतुर्थी Ganesh Chaturthi 2023 महत्त्वाचे मुहूर्त

यंदा मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश चतुर्थी साजरी असून, चतुर्थी तिथी प्रारंभ: १८ सप्टेंबर २०२३ रोजी १२ वाजून ३९ मिनिटे ते चतुर्थी तिथी समाप्ती: १९ सप्टेंबर २०२३ रोजी १ वाजून ४४ मिनिटापर्यंत आहे. या उत्सवात मध्यान्ह (मध्यन्याव्यपिनी) उपस्थित चतुर्थी घेतली जाते. जर हा दिवस रविवार किंवा मंगळवार असेल तर ती महा-चतुर्थी होते. यंदा १९ तारखेला मंगळवार आल्यामुळे २०२३ ची ही महाचतुर्थी धरली जाईल.

मध्याह्न गणेश पूजा मुहूर्त : सकाळी ११ वाजून ०३ मिनिट ते दुपारी १ वाजून २९ मिनिट

चतुर्थी तिथी प्रारंभ : १८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिट

चतुर्थी तिथी समाप्ती : १९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजून २३ मिनिट

आदल्या दिवशी चंद्रदर्शन टाळण्यासाठी वेळ : १८ सप्टेंबर, दुपारी १२ वाजून ३९ मिनिट ते रात्री ८ वाजून ३५ मिनिट

गणेश चतुर्थी २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ०३ मिनिट ते दुपारी १ वाजून २९ मिनिट या वेळेत तुम्ही श्री गणेशजीची मूर्ती स्थापन करू शकता.

Ganesh Chaturthi 2023 गणेश चतुर्थी 2
Ganpati Bappa Status Marathi 2023

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) पूजन

सकाळी स्नान करून सोने, तांबे आणि मातीच्या गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी आणावे. गणपती बाप्पाला विधीवत स्थापन करावे. गणपती बाप्पाला गंध लावावा आणि दुर्वा अर्पण करा. तसेच २१ लाडू अर्पण करा. यातील ५ लाडू गणपती बाप्पाला अर्पण करा आणि उरलेले लाडू गरीब किंवा ब्राह्मणांना वाटून द्या.

दररोज सकाळ संध्याकाळी गणेशाची पूजा करावी. गणेश चतुर्थी, गणेश चालीसा आणि आरतीची कथा वाचल्यानंतर चंद्रदर्शन न करताच चंद्राला अर्घ्य द्यावे. या दिवशी गणेशाच्या सिद्धिविनायक रूपाची पूजा करून उपवास केला जातो.

यानंतर आपआपल्या श्रद्धेप्रमाणे गणेशमूर्ती एक दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस बसवून त्यांचे विधीवत विसर्जन करावे. यंदा गणेश विसर्जन म्हणजेच अनंत चतुर्दशी गुरुवार २८ सप्टेंबर २०२३ रोजी आहे.

पौराणिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र गणेश जन्माला आला तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि वाढ होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.

Ganpati Bappa Status Marathi 2023 – गणपती बाप्पा स्टेटस मराठी

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या कोरोना सारख्या
भयानक रोगापासून संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🙏🌺

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
” गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

More Ganpati Bappa Status Marathi 2023

Ganesh Chaturthi Wishes 2023 – गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

बाप्पाच्या आगमनला सजली सर्व धरती नसानसात भरली स्फुर्ती आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा!

देव येतोय माझा आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची, तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी गणपती बाप्पा मोरया!!!

More Ganesh Chaturthi Wishes 2023 – गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

WhatsApp Ganesh Chaturthi Wishes 2023

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा – सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

May Lord Ganesha always remove obstacles from your life. Happy Ganesha Chaturthi!

More WhatsApp Ganesh Chaturthi Wishes 2023

Ganesh Chaturthi Messages In Marathi – 2023 गणेश चतुर्थी

रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे
भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत
असे गहीवर बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा

सकाळ हसरी असावी बाप्पाची मूर्ती समोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाव सोपे होईल सर्व काम
– गणपती बाप्पा मोरया

More Ganesh Chaturthi Messages In Marathi – 2023 गणेश चतुर्थी

Ganesh Chaturthi Images 2023 – गणेश चतुर्थी फोटो

Happy Ganesh Chaturthi Images 2023
Happy Ganesh Chaturthi Images 2023
Download This Image
Happy Ganesh Chaturthi Images 2023
Happy Ganesh Chaturthi Images 2023
Download This Image
More Ganesh Chaturthi Images 2023 – गणेश चतुर्थी फोटो