Mahashivratri Wishes In Marathi : देशभरात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. यावेळी 26 फेब्रुवारी 2025 म्हणजेच बुधवारी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळपासूनच शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. या दिवशी आवर्जून एकमेकांना शुभेच्छा (Mahashivratri Wishes In Marathi) मेसेज पाठवतात. तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा, संदेश.
महाशिवरात्री 2025 शुभेच्छा | Mahashivratri Wishes In Marathi
सोमवार हा महादेवाचा वार,
शिव शंभो सर्वांचे तारणहार
करितो व्रत महाशिवरात्रीला
नमन माझे, चित्त माझे, मन माझे
देऊळातील शंकराच्या चरणी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत
शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत
शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत
ओम नमः शिवाय
शिवजींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
महाशिवरात्री 2024 शुभेच्छा | Mahashivratri Wishes In Marathi
भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार
शिव करतात सर्वांचा उद्धार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो
भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो.
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा..!

शिवाची राहो तुमच्यावर कृपा
तुमच्या नशिबाचा होवा कायापालट
तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
हे पण वाचा : महाशिवरात्रीची माहिती | Mahashivratri Information Marathi
बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड,
शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले…
हॅपी महाशिवरात्री
Maha Shivratri Wishes In Marathi
शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

पिऊन भांग रंग जमेल..
आयुष्य भरेल आनंदाने..
घेऊन शंकराचे नाव..
येऊ दे नसानसात उत्साह..
तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शंकराच्या ज्योतीने येईल तेज,
भक्तांच्या हृद्याला मिळेल शांतता,
शिवाच्या द्वारी जो येईल,
त्याच्यावर नक्कीच होईल देवाची कृपा…
शुभ महाशिवरात्री
Maha Shivratri Status Marathi
कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्री 2025 शुभेच्छा | mahashivratri wishes marathi
न जगण्याचा आनंद
न मरणाचे दुःख
फक्त जोपर्यंत आहे जीव
तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वाना
शिवमय शुभेच्छा
जय भोलेनाथ ।
जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात
आणि
जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्री 2025 शुभेच्छा | Maha Shivratri Wishes In Marathi
शिव सत्य आहे,
शिव अनंत आहे,
शिव अनादी आहे,
शिव भगवंत आहे,
शिव ओंकार आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव भक्ती आहे,
शिव शक्ती आहे
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
काल पण तूच
महाकाल पण तूच
लोक ही तूच
त्रिलोकही तूच
शिव पण तूच
आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
मृत्यूचे नाव काल आहे
अमर फक्त महाकाल आहे
मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत
चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत
हर हर महादेव
महाशिवरात्री 2025 शुभेच्छा | Maha Shivratri Wishes In Marathi
हर हर महादेवचा होऊ दे गजर…
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा
कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇 |
Shivgarjana | शिवगर्जना (घोषवाक्य) मराठी |
छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन शुभेच्छा | Sambhaji Maharaj Rajyabhishek |
शिवजयंती 2024 (भाषण) | Shivjayanti Speech In Marathi |
बेलाचे पान वाहतो महादेवाला,
करतो वंदन दैवताला ,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
महाशिवराञी च्या शुभेच्छा.
ॐ नमः शिवाय.
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी
आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा
पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
नदी-नाल्यात काय आहे
प्रेम करायचं असेल शंकरावर करा
बाकीच्या गोष्टीत काय आहे
जय श्री महाकाल
Mahashivratri Chya Shubhechha In Marathi
महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये संसार आहे
त्रिलोकात ज्याची चर्चा आहे
तो आज शंकराचा सण आहे
माझ्यात कोणताही छळ नाही, तुझं कोणतंही भविष्य नाही
मृत्यूच्या गर्भातही मी आयुष्याच्या जवळ आहे
अंधकाराचा आकार आहे, प्रकाशाचा प्रकार आहे
मी शंकर आहे मी शंकर आहे.