Rakshabandhan Messages In Marathi - रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Message In Marathi | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

Raksha Bandhan Message In Marathi | Raksha Bandhan Shubhechha Marathi 2024 : या खास दिवशी या काही सुंदर अशा Wishes, Images, Quotes, Photos, Greeting, Message, Whatsapp and Facebook Status चा वापर करून Raksha Bandhan Message In Marathi तुमच्या भावाला किव्हा बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्या!

Raksha Bandhan Message In Marathi

दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
🎁🎉रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!🎉🎁

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
🎁 🎉रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!🎉 🎁

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !

🎁🎉 बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी……. ✨ 🎁🎉

Raksha Bandhan Message In Marathi

काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
🎉🎁🎉 राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा! 🎁🎉🎉

नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…

🎁 …रक्षाबंधन. . .🎉
भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली.

नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी….
आज सारं सारं आठवले….
हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले…
बंध हे प्रेमाचे नाते आहे…
ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..

बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात….
अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ….
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल…..

Raksha Bandhan Shubhechha Marathi

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
🎁🎉 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁🎉

रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…

राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
🎁 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁

Raksha Bandhan Shubhechha Marathi

चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन
🎁🎊 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁🎊

रक्षाबंधन
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
🎁रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎊🎁

रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप
असते कधी भाडंण होते तर कधी खूप
आठवण येते असे हे नाते असते … 🎁

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,
🎁 🎊 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 🎊 🎁

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी… 🎁

आयुष्यात कुठल्याही क्षणी..
कुठल्याही वळणावर…
कुठल्याही संकटात….
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.
🎁 रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎁

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
✨🎉 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ! ✨🎉

Raksha Bandhan Shubhechha Marathi

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
🎉 Happy Rakshabandhan दादा ! ✨🎉

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
🎁 भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁🎉

किती वाट पाहायला लागली तुझ्या जन्मासाठी मला..
तुझ्या रुपाने मिळाला मला माझा रक्षण करणारा भाऊराया,
🎁🎉 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 🎁🎉

Raksha Bandhan Wishes In Marathi

दादा तुला कधीच सोडणार नाही.
पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच
कोणाला घेऊ देणार नाही.

दादा तू कधीच सुधारणार नाहीस..
यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस

Raksha Bandhan Wishes In Marathi

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.

दूर असलास म्हणून काय झाले
हातावर खरीखुरी राखी नसली तरी
मनाने मी कायम तुझ्या मनगटावर
कायमची राखी बांधली आहे.

रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ…
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ
🎉 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 🎉

रक्षाबंधनाचा सण यावा रोज..
गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस,
🎁🎉 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. 🎁🎉

आयुष्यात तुझी असेल साथ तर कशाला फिकरची बात,
🎁🎉 रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎁🎉

राखीचा दोरा साधा असला तरी
आपले बंध हे दृढ आहेत.

आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन
एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील
तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.
राखी नाही एक दोरा आहे ते आपले
अतुट बंधन.. येतोयस ना दादा…
आज आहे रक्षाबंधन ✨🎉

कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो
पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम
अगदी जबाबदारीने पार पाडतोस.

Raksha Bandhan Wishes In Marathi

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
🎉✨🎉 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🎉🎉

थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
🎉🎉✨🎉 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🎉 🎉🎉

लहानपणीच्या राखी मी आजही जपून
ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखीसोबत
तुझी आणि माझी आठवण जोडली आहे.
🎉🎁🎉 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! 🎁🎉🎉

ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…
🎉🎁 ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ! 🎉🎁

थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
🎉🎁 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎁

एक गोष्ट Commit करायला
गर्व वाटतो कि,
Girlfriend पेक्षा माझ्या Sister..
मला जास्त जीव लावतात…

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.
🎉🎉राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🎁🎉

ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो
माझ्या ताईला फार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! 🎁🎉

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी तुला
भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले.
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.

आधार तू माझा,
मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला
फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 🎁🎊

लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला
आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे.

Happy Raksha Bandhan Marathi

🎁 यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन
सदैव करेन तुझं रक्षण, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎁🎊

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..
कायम तूच केलीस माझी रक्षा..
आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा

लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.
🎁🎊 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎉

कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर आपण एकमेकांचे मित्र असतो.
पण ते खरेच आहे कारण भांडण फक्त दिखावा असतो.
🎉🎉 🎉 राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎉 🎉🎉

बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय,
हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय.

आईने दिला जन्म.. पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी..
काही तरी केले होते पूण्य म्हणूनच तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई
🎁🎊 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! 🎉 🎉🎉

Happy Raksha Bandhan Marathi

येते येते म्हणून किती वाट पाहायला लावतेस.
तुला भेटण्यासाठी मला रक्षाबंधनाचीच का वाट पाहायला लावतेस.

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.

तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार,
🎁🎊 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! 🎁🎉 🎉

माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही.
जीव आहे तोवर तुझी काळजी घेतल्याशिवाय राहू शकत नाही.

नाते तुझे माझे, हळुवारपणे जपलेले,
🎁🎉 ताई रक्षाबंधानाच्या शुभेच्छा! 🎈🎁

ती फक्त बहीण असते जी आईने घराबाहेर
काढल्यानंतरही तुम्हाला घरी घेण्यासाठी धडपडत असते.

ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो
रक्षाबंधनाची वाट पाहतो…
🎉🎉 राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई! 🎉🎁

Happy Raksha Bandhan Marathi

हळद हे चंदन आहे
राखी म्हणजे नात्यांचे बंधन
🎉🎉 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 🎉 🎉

एकत्र वाढलो
लहानपणी खूप प्रेम मिळाले
बंधुप्रेम वाढवा
राखीचा सण आला
🎉🎁 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 🎉🎁

फुलांचे तारे सर्व काही सांगतात
मला हजारात भाऊ आहेत
तुम्हा सगळेयांवर प्रेम करतो

“राखी बांधून हातात
बहिण ओवळे भावाला..
भरवून गोड धोड
जीव लावेल भावाला..
🎉🎁🎉 राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.” 🎉🎁🎉

नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं,
पण तो धाक नाही माझं प्रेम असतं,
🎉🎁 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 🎉🎁

लहान असो वा मोठी बहीण
असते आयुष्यातील सुख,
ज्याच्या नशिबी आहे
सुख त्यालाच ते कळत खूप
🎉🎁 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 🎉🎁

तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढणार नाही,
तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही.

FAQ

2024 मध्ये रक्षाबंधन कधी आहे ?

सोमवार- दिनांक-19 August 2024 रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आहे.

रक्षाबंधन का साजरे केले जाते?

बहिण-भावाच्या सणामागील महत्वाच कारण: रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, हे आजून निश्चित कोणालाच महिती नाही व तशे भक्कम पुरावा सुद्धा कोणाकडे नाहीत. पण रक्षाबंधना विषयी अनेक आख्यायिका व पुराणीक इतिहासचे किस्से आहेत. आस म्हणतात की वैदिक काळात पूर्वी देव व दानवांच्या आघोर युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काहीच चालत नसत, दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान केले होते.

इंद्र आपले वज्र घेऊन युद्ध करायला निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा यासाठी व म्हणूनच त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) हा तिने इंद्रादेवाच्या हातावर बांधला. त्या शची हिने भांधलेल्या त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या दानवांच्या त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले सर्व वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमाचा दिवस ही होता. तेव्हापासून त्याची स्मृती व आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत-प्रथा संपुर्ण ठिकाणी सुरू झाली आणि हा रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे प्राचीण पुरावे म्हणतात.

आनखी एक पौराणिक काळातील अशीही एक कथा सांगण्यात येते की, दैत्य राजा बलीकडे जेव्हा विष्णू आला तेव्हा त्या वेळी शुक्राचार्यानी बळीच्या मनगटावर आपले रक्षासूत्र बांधले. व रक्षासूत्रापासूनच पुढे राखीची प्रथा सुद्धा आली असावी. आणि तशेच द्रौपदीने आपला भरजरी जेव्हा पितांबर फाडून श्रीकृष्णाच्या करंगळीवर जेव्हा चिंधी बांधली आणि श्रीकृष्णाने द्रौपदीचे जेव्हा रक्षण करण्याचे आश्वासन दिले अशीही कथा इतिहासात वाचायला मिळते. सुभद्रा ही जरी कृष्णाची सख्खी बहीण असली तरी सुद्धा द्रौपदी आणि श्रीकृष्णाचे बंधूप्रेमाचे निखळ व अप्रूप नेहमी दिसुन येत.

Leave a Comment