Jijamata Information In Marathi

जिजामाता विषयी माहिती | Jijamata Information In Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

थोर व्यक्तींची माहिती

जिजामाता विषयी माहिती | Jijamata Information In Marathi : जिजाबाई या महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई होत्या. शिवरायांनी आपल्या जीवनात जे काही महान कार्य केले त्यात जिजाबाईंचे खूप मोठे योगदान होते. 

जिजामाता विषयी माहिती | Jijamata Information In Marathi

जिजामाता विषयी थोडक्यात माहिती – Jijamata Information In Marathi

नावजिजाबाई शहाजीराजे भोसले
जन्म (Birthday)१२ जानेवारी १५९८
जन्मस्थान (Birthplace)सिंदखेड, बुलढाणा जिल्ह्यात
वडील (Father Name)लखोजीराजे जाधव
आई (Mother Name)म्हाळसाबाई लखोजीराजे जाधव
पती (Husband Name)शहाजीराजे भोसले
मुले (Children Name)संभाजीराजे,शिवाजीराजे
मृत्यू (Death)१७ जून १६७४
लोकांनी दिलेली पदवीजिजाऊ, जिजाई, मासाहेब

जिजाबाईंचे प्रारंभीक जीवन – Jijamata Information In Marathi

जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 ला महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात झाला. राजमाता जिजाबाई (जिजाऊ) भोसले यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते व ते सिंदखेडा गावाचे राजा सुद्धा होते. 

पूर्वी मुलींची बालविवाह केली जात. जिजामाता यांचे लग्नही लहान वयातच झाले. लखुजी जाधव हे निजामांधील एक सरदार होते. भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला. सन 1609 मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. शहाजीराजे हे त्यावेळी निजामशाहीतील प्रमुख सेनापती होते. त्यांच्या आयुष्याचा बराच काळ हा निजाम, मोगल आणि आदिलशाहा यांच्या सेवेत गेला. पण तरीही ते शूरवीर योद्धे होते. त्यांच्या घराण्यातच राजकारण असल्यामुळे महाराष्ट्राच्या स्वराज्याची त्यांना आधीपासूनच आस होती.

वडिलांकडून त्यांना पुणे आणि सुपली येथील जहागींर मिळाल्यामुळे त्या पुण्यातच राहिल्या. जिजामाता आणि शहाजीराजे भोसले यांना एकूण 8 मुले झाली. मोठा मुलगा संभाजी जे शहाजीराजांसोबत होते. तर त्यानंतर 6 मुली झाल्या. त्यांच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले. ज्यांनी जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याची घडी बसवली.

जिजाबाईंचा विवाह – Jijamata Information In Marathi

6 वर्षाच्या वयात जिजाबाईंच्या विवाह मोलाजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांच्याशी करण्यात आला. नंतरच्या काळात भोसले व जिजाबाईंच्या माहेर असलेल्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाले. यात शहाजी राजे यांचे भाऊ शरफोजी भोसले यांनी जिजाबाईंच्या भावाला ठार केले. मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जिजाबाई यांचे वडील लखुजी जाधव यांनी शहाजीराजांचे भाऊ शरफोजी भोसले यांना ठार केले. यानंतर शहाजी राजे लखुजी जाधवांवर चालून गेले. 

या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत माहेराशी सर्व संबंध तोडले. त्यांनी धैर्याने आपल्या कर्तव्याचे पालन केले. जिजाबाई व शहाजीराजांना एकूण 8 अपत्ये झाली. यात सहा मुली व दोन मुलगे होते. शिवाजी महाराज हे लहान मूल होते. मोठ्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी शहाजीराजांनी घेतली तर शिवाजी महाराजांना सांभाळण्याचे कार्य जिजाबाईंवर सोपवले.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

शिवाजी महाराजांचे संगोपन – Jijamata Information In Marathi

आपल्या जीवनातील सर्व दुःख व संकटांना विसरून जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना चांगले शिक्षण व संस्कार देण्यास सुरूवात केली. शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची कमान सोपवली. शिवाजी महाराजांच्या मदतीला जिजामाता यांना सुद्धा सोबत ‌पाठवले. त्याकाळात निजामशाह, आदिलशहा व मुघलांनद्वारे होत असलेल्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था वाईट होती. पुण्यात ‘दादोजी कोंडदेव’ यांनी शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. जिजाबाई शिवाजी महाराजांना रामायण महाभारत यासारख्या पौराणिक कथा सांगत असत. त्या अतिशय धार्मिक व सात्विक स्वभावाच्या स्त्री होत्या. युद्धाचा अनेक कथा शिवाजी महाराजांना त्यांच्या आई जिजामाता कडूनच कळल्या. 

जिजामातेचे निधन – Jijamata Information In Marathi

शहाजीराजे व त्यांचे मोठे पुत्र संभाजी यांना अफजलखानाने युद्धात मारून टाकले. जिजामातानां गोष्टीचे खूप दुःख झाले व त्यांनी आपल्या पतीसोबत सती जाण्याच्या प्रयत्न केला. परंतु शिवाजी महाराजांनी तेव्हा त्यांना रोखून घेतले. शिवरायांसाठी त्यांची आई हीच मार्गदर्शक होती. जिजामाता या पहिल्या अश्या महिला होत्या ज्यांनी दक्षिण भारतात हिंदवी साम्राज्य निर्माण करण्यासाठी योगदान दिले. त्यांच्या योगदानामुळेच शिवरायांनी कमी सैन्यात लाखो मुघलांना बाहेर काढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जिजाबाईंचा मृत्यू 17 जून 1674 मध्ये झाला. जिजाबाईंचा मृत्यू आधीच शिवाजी महाराजांनी अखंड हिंदवी स्वराज्याची स्थापना करून दिली होती. (Jijamata Information In Marathi)

जिजामाता या एक प्रभावी व वचनबद्ध महिलेच्या रूपात ओळखल्या जातात. त्यांच्यासाठी आत्मसन्मान आणि त्यांची मूल्ये स्वतः व कुटुंबांच्या वर होत्या. त्यांचे विचार दूरदर्शी होते. त्या एक प्रभावी योद्धा देखील होत्या. त्यांच्या या गुणांच्या संचार शिवाजी महाराजांन मध्ये देखील झाला होता. अशा या महान मातेस सादर प्रणाम.

Jijamata Information In Marathi
Jijamata Information In Marathi

Jijau Jayanti Status in Marathi | राजमाता जिजाऊ जयंती स्टेटस

एक उडाली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली,
स्वराज्याच्या संकल्पनेची जिजामातांमुळे नवी पहाट झाली.

जन्माला तिच्या पोटी,गुणगान ज्याचे रयतेच्या पोटी,
तिने दिले शिव आणि छावा,
मिळाला महाराष्ट्राला स्वराज्याचा ठेवा

स्वराज्याचा जिने घडवला विधाता,
धन्य ती स्वराज्यजननी जिजामाता

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली,
प्रहार काढून ज्या माऊलीने,
गुलामगिरीच्या छताडावर प्रहार केला,
त्या विश्वमाता जिजमाता यांच्या जयंतीच्या शुभेच्छा!

थोर तुमचे कर्म
जिजाऊ उपकार तुमचे ना कधी फिटणार,
चंद्र, सूर्य, तारे असे पर्यंत नाव तुमचे कधीही नाही मिटणार.

छावा तू जिजाऊचा
स्वराज्याचा घेतला तू ध्यास,
मूठभर मावळ्यांचा संगितीने त्यामुळे रचला इतिहास

एका स्त्रीची जबरदस्त इच्छा शक्ती
जगातल्या 5-5 महाकाय साम्राज्य उद्धवस्त करु शकते.

असंभव पेलतो वादळ तुझ्या आशीर्वादाने पाठबळ लाभले,
ज्याच्या नशिबी उद्धारले ज्याचे कूळ तूची पायधूळ लागली तिच्या पायी.

महिला शक्ती आहेत, तिचा मान राखण्यासाठी
जिने केले संस्कार अशी आपली जिजामाता आहे खास.

Leave a Comment