Sambhaji Maharaj Jayanti Wishesh

Sambhaji Maharaj Jayanti Wishesh – छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

Sambhaji Maharaj Jayanti Wishesh
Sambhaji Maharaj Jayanti Wishesh

Sambhaji Maharaj Jayanti Wishesh | छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा

संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी असा  संभाजी महाराजांचा लौकिक आहे. यासह समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपले वर्चस्व गाजवले.

🚩इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर
मातीच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा संभाजी छत्रपतींना मानाचा मुजरा
संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

🚩 मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा संभाजी महाराज” 🚩

🚩 संभाजी सांगायला सोपे आहेत,
संभाजी ऐकायला सोपे आहेत,
संभाजी जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो संभाजी स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय संभाजी राय! जय जिजाऊ! 🚩

🚩 घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
कळू दे साऱ्या जगास

ताठ होती माना
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला
मानाचा मुजरा🚩

🚩 सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी
लाखात एक असे लाख मोलाचे
अमूल्य शिवरत्न म्हणजे ..🚩

🚩 पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही नतमस्तक झाला…
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला…
झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता
त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता
झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला
मातीचे रक्षण करण्यासाठी देह त्याने वाहीला
जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला
माझा मानाचा मुजरा अशा आपल्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना
जय शंभुराय 🚩

🚩 मृत्युने देखील ज्यांना झुखून मुजरा केला
असा फक्त एकच मर्द आणि शूर मराठा होऊन गेला….
माझा देव
शिवपुत्र
शंभुराजे 🚩

🚩हिंदवी स्वराज्याचे दुसरे
स्वराज्याचे धाकले धनी
अजिंक्य मराठा योद्धा
महापराक्रमी
क्षत्रियकुलावतांस
सिंहासनाधीश्वर
शिवपुत्र
महासम्राट छत्रपती 🚩संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा🚩

🚩 ‘ऊभ्या ”आयुष्यात ”एकच” ”ध्यास” असुदे”
”हातात’ ”भगवा” आणि ”काळजात ”शिवबा”
|| जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभूराजे | 🚩

🚩 जंगलात सिंहासमोर जानारे भरपूर होते
पन सिंहाचा जबडा फाडनारा एकच होता
स्वराज्याचं धाकलं धनी शंभुराजे जन्मोत्सव… 🚩

🚩 सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी
लाखात एक असे लाख मोलाचे
अमूल्य शिवरत्न म्हणजे ..
छत्रपती संभाजी महाराज 🚩

🚩 सोडून गेली माता जेव्हा तो दोन वर्षाचा होता..
नव्हते जेव्हा पिता जगात तो २१ वर्षाचा होता..
वनातल्या वनराजासम तो वादळाशी लढला
नेले जेव्हा मृत्यूने तो ३२ वर्षाचा होता..

त्याला आई लहानपणी सोडून गेली
पिता तरूणपणात सोडून गेला
नातेवाईक विरोधात गेले
जवळचे संकटात सोडून गेले
तरीही तो लढला..

त्याच्यावर विषप्रयोग झाले
त्याची बदनामी झाली
तरीही तो लढला..

कोण होते शंभू राजे….
नरवीर
शुरवीर
धर्मवीर
ज्ञानवीर
गुणवीर
तो होता
शिवाचा छावा
स्वराज्यरक्षक

🚩छत्रपती संभाजी राजे भोसले.🚩
दहा दिशांनी दहा संकटे आली
कोणी उरला नाही वाली
तरीही तो लढला..
अस असताना ही त्याने ४ ग्रंथ लिहिले
अनेक भाषा शिकला, ज्ञान मिळवले.

कोण होता तो…..
नरवीर
शुरवीर
धर्मवीर
ज्ञानवीर
गुणवीर
तो होता
शिवाचा छावा
🚩🚩🚩 स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे भोसले🚩🚩🚩
363व्या संभाजी राजे जयंती दिनाच्या सकल महाराष्ट्र जनांस हार्दिक शुभेच्छा 14 मे 2021 🚩

ज्याने मैत्री अशी केली
कि मिञाने त्याच्यासाठी जीव दिला
शञुत्व असे केले की वैरी वेडा होउन मेला
त्याने कतृत्व असे केले कि
सुर्य चंद्र संपतील🚩🚩
हा सह्याद्रीचा सुर्य तळपतच राहिल.

Leave a Comment