Ramdas Navami Shubhecha Status

Ramdas Navami Shubhecha Status | श्री संत रामदास नवमीच्या शुभेच्छा

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

Ramdas Navami Shubhecha Status MSG In Marathi : छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) गुरू होते. माघ वद्य नवमीला रामदास स्वामी यांनी समाधी घेतली. म्हणून या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते. यंदा 5 मार्चला रामदास नवमी (Ramdas Navmi 2024) साजरी केली जाते.

Ramdas Navami Shubhecha Status
Ramdas Navami Shubhecha Status

श्री संत रामदास नवमीच्या शुभेच्छा | Ramdas Navami Shubhecha Status

महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. संत रामदास स्वामी हे संत तुकारामांच्या काळातील एक संत होते. महाराष्ट्रात जेवढे काही संत झाले त्यामधील स्वतः ची वेगळी ओळख करून देणारे समर्थ रामदास स्वामी होते. संत तुकारामांच्या सहवासामध्ये ते राहिले. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते. माघ वद्य नवमीला रामदास स्वामी यांनी समाधी घेतली. म्हणून या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते.

सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जो करील तयांचे,
परंतु तेथे भगवंताचे
अधिष्ठान पाहिजे…
श्री रामदास नवमीच्या शुभेच्छा…

जितुके काही आपणासी ठावे
तितुके हळूहळू शिकवावे
शहाणे करूनी सोडावे बहुत जन…
श्री रामदास नवमीच्या शुभेच्छा…

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥
श्री रामदास नवमीच्या शुभेच्छा…

श्री संत रामदास नवमीच्या शुभेच्छा | Ramdas Navami Shubhecha Status

रामदास स्वामींचा जन्म 24 मार्च 1608 रोजी महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील जांब या तीर्थक्षेत्री झाला. ऋग्वेदी ब्राह्मण परिवारामध्ये जन्म झाला. समर्थ रामदास स्वामींचे मूळ नाव ‘नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी’ (ठोसर) असे होते. समर्थ रामदास यांनी दासबोध नावाचा प्रसिद्ध मराठी ग्रंथ लिहिला.

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥
श्री समर्थ रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना धर्मता नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

श्री संत रामदास नवमीच्या शुभेच्छा | Ramdas Navami Shubhecha Status

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Shivgarjana | शिवगर्जना (घोषवाक्य) मराठी
छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन शुभेच्छा | Sambhaji Maharaj Rajyabhishek
शिवजयंती 2024 (भाषण) | Shivjayanti Speech In Marathi

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

श्री संत रामदास नवमीच्या शुभेच्छा | Ramdas Navami Shubhecha Status

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।
सुखाची स्वयें सांडि जीवी करावी॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

श्री संत रामदास नवमीच्या शुभेच्छा | Ramdas Navami Shubhecha Status

मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

मना सांग पां रावणा काय जाले।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।
परी शेवटीं काळमूखीं निमाला॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

श्री संत रामदास नवमीच्या शुभेच्छा | Ramdas Navami Shubhecha Status

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

मना राघवेंवीण आशा नको रे।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

श्री संत रामदास नवमीच्या शुभेच्छा | Ramdas Navami Shubhecha Status

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

बहू हिंपुटी होईजे मायपोटी।
नको रे मना यातना तेचि मोठी॥
निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

Leave a Comment