WhatsApp Jokes | व्हाट्सएप मराठी जोक्स

WhatsApp Jokes | व्हाट्सएप मराठी जोक्स

सुनबाई: सासूबाई कॅडबरी खाणार का ?
सासूबाई: नको बाई, मला कुठे “सात समुंदर “वर नाचता येतंय

सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका..
शांति पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका..
सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका..
आणि आयुष्य आनंदात जगायचं असेल तर हा ग्रुप सोड नका…
कारण….. आपली शाखा कुठेही नाही ! ! !

बायका कोणालाही गुंडाळु शकतात….
खरं वाटत नसेल तर २ तारखेला बघा….
वडाच्या झाडाला पण सोडत नाहीत…. ?

लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोशी काय बोलावं ते बंड्याला कळंत नव्हतं…
बरांच वेळ विचार करुन तो तिला म्हणाला,
तुझ्या घरी माहित्ये ना की आज तू इथेच झोपणार आहेस ते ?

प्रियकर: प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
.
.
.
प्रियसी- मग माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?
.
.
.
.
प्रियकर: मग काय एखाद्या कुत्रिला दगड मारतो

गण्या- आई, मला खुपच थंडी वाजतेय..
आई – मग तुला स्वेटर देऊ का???
-स्वेटर नको,
बाबांना सांगून लग्नाचंच बघ ना.
आईनं पालता घालून तुडवला.

सर्वात कमी शब्दांचा पण अतिशय (हास्य)स्फोटक विनोद…
.
.
सासरे (फोनवर): काय जावईबापू… काय करताय?
जावई: सहन!

सासरे जावयाला समजावत असतात
सासरे: तू ड्रिंक करतोस अस मी ऐकले आहे?
जावई: हो
सासरे: किती?
जावई: आठवड्यातून तीनदा
सासरे: किती वर्ष झाली पितोय?
जावई: 30 वर्ष
सासरे: एक ड्रिंक चा साधारण खर्च किती असेल?
जावई: 500 रु
सासरे: म्हणजे आठवड्याचे 1500,महिन्याचे 6000,वर्षाचे 72000, 30 वर्षाचे 21,60,000
हेच पैसे तू fix deposit मध्ये टाकले असते तर आतापर्यंत त्याचे 60,00,000 झाले असते,
एवढ्या पैशात एक हाय क्लास मर्सिडीज आली असती जावई: तुम्ही किती ड्रिंक करतात?
सासरे: नाही,अजिबात नाही
जावई: मग तुमची मर्सिडीज कुठे आहे?

एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात,
तेव्हा त्या मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते.
आजोबाः सूनबाई का आराडतीयास पोरावर….
सूनबाईः बघाना मामांजी बंडू नुसतच कोलगेट खातोय…
आजोबाः बंडू नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत..
सूनबाई, दवाखान्यात

बरं झालं बोर्डच्या रिझल्ट मध्ये Exit poll नाही ते
नाहीतर घरच्यांनी 3-4 दिवस अगोदर पासुन मारायला सुरूवात केली असती….

Leave a Comment