गोपा देताना घ्यायचे उखाणे | Barshache Ukhane : बाळाचे नाव ठेवायचे म्हटले तर त्या आधी आई बाबांना एकमेकांचे नाव उखाण्यात (Barshache Ukhane) तर घ्यावेच लागते नाही का? चला तर घेऊया बारश्याला एक एक गोड उखाणा
बारशाचे उखाणे | Barshache Ukhane
टीप :- पहिल्या_________ठिकाणी पतीचे नाव घेऊन दुसऱ्या_________ ठिकाणी दागिन्याचे नाव घ्यावे.
नीलवर्ण आकाशात चमकतो शशी
_____________चं नाव घेते_____________च्या बारशाच्या दिवशी.
मावळला सूर्य उगवला शशी
_____________चं नाव घेतेच्या दिवशी
आई-वडिल आहेत प्रेमळ, सासू सासरे आहेत हौशी
_____________चे नाव घेते बारशाच्या दिवशी
चंद्र तारागणाच्या मेळाव्यात _____________ हसते,
_____________बरोबर तोडे घेऊन बारशाला येते…
आंब्यांच्या फांदीवर पाय कसा देऊ,
_____________बरोबर_____________घेऊन बारशाला येऊ…..
सौभाग्याची जीवनज्योत प्रीतीतेलाने तेवते,
_____________बरोबर_____________घेऊन बारशाला येते.
प्रीतीचा ठेवा प्राणपणाने जपते,
_____________बरोबर_____________घेऊन बारशाला येते….
मातृत्वाच्या मांगल्याने मान मोहित होते,
_____________बरोबर_____________घेऊन बारशाला येते.
पतिव्रता धर्म नम्रतेने वागते,
_____________बरोबर_____________घेऊन बारशाला येते.
लक्ष्मी शोभते दाग-दागिन्याने, विनयाने विद्या शोभते,
_____________बरोबर_____________घेऊन बारशाला येते.
तुळशीला घालते प्रदक्षिणा, विष्णूला नवस करते,
_____________बरोबर_____________घेऊन बारशाला येते.
सकाळच्या वेळी अंगणात येतात काऊ, चिऊ,
_____________बरोबर_____________घेऊन बारशाला येऊ.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- मंगळागौरीसाठी उखाणे Mangalagaur Ukhane
- Navriche Ukhane | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे Part 2
- Navariche Ukhane | नवरीचे उखाणे
दशरथ राजानं केला पुत्रासाठी नवस आज
_____________च्या मुलाच्या बारशाचा दिवस.

शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी
_____________चं नाव घेते बारशाच्या दिवशी.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी
_____________चं नाव घेते_____________च्या बारशाच्या दिवशी.
हिरवं लिंबू गारसं
_____________रावांच्या बाळाचं आज बारसं.
बनारसी शालूला आहेत जरतारी काठ
_____________च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.
नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण
_____________चं नाव घेते बारशाचं कारण.
कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी
_____________चं नाव घेते_____________च्या बारशाच्या दिवशी.
नाही कशी म्हणू तुम्हा, घेते मी नाव,
_____________रावांच्या बाळाला दिले, तुम्ही गोड नाव.
लिंबू पाणी, छान लागत गारस,
_____________रावांच्या, बाळाचं आज बारस.
पाहुणे येणार म्हणून, वाटून ठेवलं सारण,
_____________रावांचं नाव घेते, बारश्याच्या कारण.
सर्वांच्या आहेत, नावाप्रमाणे राशी,
_____________च नाव घेते_____________च्या बारशाच्या दिवशी.
_____________आहे पाटील, घराण्याचा वारसा,
आज आहे _____________च्या मुलाचा बारसा.
तुमच्या सर्वांच्या येण्याने, बहरले घर,
_____________रावांच्या संसारात, पडली नवी भर.
बाळाचे नाव ठेवायला, जमल्या साऱ्या मावशी,
_____________रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी.
बाळाच्या जन्माने, सारे आनंदले घर,
_____________रावांच्या घराण्यात, पडली नवी भर.
मेकअप करायला, पाहिजे समोर आरसा,
_____________रावांच्या घराला, लागलाय अखेर वारसा.
गणपती बाप्पाला, केला होता नवस,
_____________च्या मुलाचा आज, बारशाचा दिवस.
पाटीलबाई, जाधवबाई बारश्याला चला,
पाहुणा आला नवा, त्याच नाव ठेवा.
नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण,
_____________चं नाव घेते बारशाचं कारण
बनारसी शालूला आहेत जरतारी काठ,
_____________च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
_____________चं नाव घेते_____________च्या बारशाच्या दिवशी
शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी,
_____________चं नाव घेते बारश्याच्या दिवशी
Name Ceremony Ukhane In Marathi
मावळला सूर्य उगवला शशी,
_____________चं नाव घेते बारश्याच्या दिवशी
बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर,
_____________रावांच्या संसारात पडली नवी भर