gruhpravesh ukhane for female

Top 100+ Gruhpravesh Ukhane | गृहप्रवेश उखाणे

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी उखाणे

Gruhpravesh Ukhane / गृहप्रवेश उखाणे : gruhpravesh ukhane for female ,ukhane for gruhpravesh, gruhpravesh marathi ukhane

Gruhpravesh Ukhane For Female
gruhpravesh ukhane for female

100+ गृहप्रवेश उखाणे | Gruhpravesh Ukhane

नवीन घरासाठी गृहप्रवेश उखाणे

रात्रीच्या अंधारात आकाशात चमकतात तारे,
__रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे

शालुत पदर सांभाळताना नववधू मी बावरते,
__रावांचे नाव घेत नव्या घरातील स्वप्न रंगवते

शंकराच्या पिंडीवर वाहल्या बेलफुलाच्या राशी,
__रावांचे नाव घेते गृहप्रवेशीच्या दिवशी

ताजमहल बनवण्यासाठी कारागीर होते कुशल,
__रावांचे नाव घेत गृहप्रवेशासाठी स्पेशल

विवाह म्हणजे सुरूवात नव्या जीवनाची,
__रावांचे नाव घेते जाणीव ठेवत कर्तव्यांची

लग्नात आंदणात मिळाली चांदीची परात,
__रावांचे नाव घेत येते नव्या घरात

रूपेरी सागराची चंदेरी लाट
__रावांचे नाव घेते सोडा माझी वाट

धान्याचे माप काठोकाठ भरले,
__रावांचे नाव घेत सौभाग्यवती झाले

आईवडिलांनी वाढवले, मामांनी घडवले,
__रावांचे नाव घ्यायला सख्यांनी अडवले

उंबरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायांनी ओलांडते,
__रावाच्या जीवनात भाग्याने प्रवेश करते

महिलांसाठी गृहप्रवेशासाठी उखाणे मराठी | Gruhpravesh Ukhane For Female

हिरव्याकंच शालूला जरीचा काठ,
__रावांचे नाव घेते सोडा माझी वाट

सर्वांसमोर वाकून करते नमस्कार जोडते दोन्ही हात,
__रावांचे नाव घेते आता सोडा माझी वाट

लग्नानंतर आर्शीवादासाठी थोरामोठ्यांसमोर वाकले,
__रावांचे नाव घेत संसारात पाऊल टाकले

रोज देवापुढे लावत होते चांदीचा दिवा,
__रावांचे नाव घेत सांगते जन्मोजन्मी हाच जोडीदार हवा

पैठणीवर शोभते मोरांची जोडी,
__रावांमुळे आली माझ्या जीवनाला गोडी

नव्या दिशा नव्या आशांसह करते नव्या घरी पदार्पण,
__रावांसाठी करेन संपूर्ण जीवन अर्पण

चांदीच्या ताटात जिलेभीची रास, गृहप्रवेशाच्या दिवशी
__रावांना भरवते मी प्रेमाचा घास

रुखवतीत ठेवले होते खोबऱ्याचे काप,
__रावांचे नाव घेते ओलांडून नव्या घराचे माप

हंड्यावर ठेवले हंडे, त्यावर ठेवली परात,
__रावांचे नाव घेते करत प्रवेश नव्या घरात

रेशमी पैठणीवर शोभते कोल्हापुरी ठुशी,
__रावांचे नाव घेते गृहप्रवेशीच्या दिवशी

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
50+ Chavat Ukhane Lagnache – लग्नाचे चावट उखाणे
100+ Marathi Non Veg Ukhane – मराठी नॉन व्हेज उखाणे
50+ Navriche Ukhane | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे Part 2
100+ Barshache Ukhane | बारशाचे उखाणे

Best उखाणे गृहप्रवेश | Best Gruhpravesh Ukhane

उंबरठ्यावरील माप पायाच्या स्पर्शाने लवंडते,
__रावाचे नाव घेत गृहप्रवेश करते.

सोन्याच्या कलशाखाली ठेवली चांदीची परात,
__रावांचे नाव घेत करते प्रवेश नव्या घरात

थोरामोठ्यांच्या आर्शीवादाने लागले लग्न, मामाने केला आहेर,
__रावांसाठी मी सोडले माझे प्रेमाचे माहेर

मासेमारीसाठी समुद्रावर जमला नौका,
__रावांचे नाव घेते सर्वजण नीट ऐका

जमले सर्व नातेवाईक, लग्न लागले दारात,
__रावांचे नाव घेते, मला आता येऊ द्या घरात

_ची लेक झाली
_ची सून,
__रावांचे नाव घेते गृहप्रवेश करून

त्यांना आवडते क्रिकेट आणि मला आवडतो हॉकीचा खेळ,
__रावांचे नाव घेते जवळ आली गृहप्रवेशाची वेळ

शुभमुहूर्तावर लागले लग्न, धुमधडाक्यात आली वरात,
__रावांचे नाव घेते टाकत पहिले पाऊल घरात

_च्या घरी कधी जाणार याची लागली होती चाहुल,
_रावांचे नाव घेते टाकत नव्या घरी पाऊल

कुळस्वामिनीला स्मरून करते वंदन तुम्हा सर्वांना,
__रावांचे नाव घेत मागते आर्शीवाद द्या आम्हाला

नवरी साठी गृहप्रवेश | Gruhpravesh Ukhane for Bride

चांदीच्या वाटीत ठेवला बदामाचा शिरा,
__रावांचे नाव घेत सांगते तेच माझा खरा दागिना

मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा,
__रावांचे नाव घेत जपते मराठी परंपरा

संसाररूपी वेलीला फुलले कोवळे कोवळे कोंब,
__रावांचे नाव घेते सखे थोडावेळ थांब

लग्न झाल्यावर मुलीने सासरी जाणं आहे समाजाची रीत,
__रावांचे नाव घेत सांगते त्यांच्यावर आहे माझी माझी खरी प्रीत

मराठीत आहेत खूप सुंदर सुंदर म्हणी,
__रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या क्षणी

सह्याद्रीच्या कड्याकपारीत झाडी घनदाट,
__रावांचे नाव घेते सोडा आता माझी वाट

आईवडील आहेत प्रेमळ आणि सासू सासरे आहेत हौशी,
__रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी

माहेरी जपली मी नाती आणि गोती,
__रावांचे नाव घेत जोडते आता यात नवे मोती

नव्या घराच्या दारावर लावले आहे श्रीगणेशाचे चित्र,
__रावांमुळे मिळाले मला सौभाग्याचे मानपत्र

गृहप्रवेश उखाणे | Gruhpravesh Ukhane for New Home

आर्शीवादाचे दान घेते तुम्हा सर्वांसमोर वाकून,
__रावांचे नाव घेते नव्या घरात तुमच्या सर्वांचा मान राखून

जमले सगळी नातीगोती आमच्या या नव्या घरात,
__रावांचे नाव घेते आनंदाच्या भरात

नव्या कामाची सुरूवात जशी श्रीगणेशापासून,
__रावाचे नाव घेते नव्या घरात बसून

श्रीमहालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी,
__रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी

चांदीच्या ताटात भरवला पुरणपोळीचा घास,
__रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी खास

शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून,
__रावांचे नाव घेते नव्या घरी सर्वांचा मान राखून

लग्न झाले आता बहरू दे आमच्या संसाराची वेल,
__रावांचे नाव घेते वाजवून नव्या घराची बेल

मंगळसूत्राच्या वाट्या म्हणजे सासर आणि माहेर,
__रावच आहेच माझा गृहप्रवेशाचा आहेर

_ची लेक मी झाली
आता_ची सून,
__रावांचे नाव घेत करते गृहप्रवेश

दत्तगुरूंच्या रूपात दिसतात मला ब्रम्हा, विष्णू आणि महेश,
__रावांचे नाव घेत करते गृहप्रवेश

Leave a Comment