Gatari Amavasya 2023 आषाढ अमावस्येला गतहारी अमावस्या का म्हणतात?

Gatari Amavasya 2023 आषाढ अमावस्येला गतहारी अमावस्या का म्हणतात?

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी सणवार

Gatari Amavasya 2023 गटारी अमावस्या : – वास्तविक पाहता याचे मूळ नाव गतहारी अमावास्या असल्याचे सांगितले जाते. जसे शाकाहारी आपण म्हणतो, त्याच अन्वये गतहारी हा शब्द आलेला आहे. गतहारी म्हणजे होऊन गेलेले असा त्याचा अर्थ आहे. आपल्याकडील सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना शास्त्रीय आणि नैसर्गिक आधार आणि महत्त्व आहे.

चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा, अशी प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे. या दिवसापासून निषिद्ध आहार टाळावेत, हा सांगणारा आषाढी अमावास्या म्हणजेच गतहारी अमावास्येचा दिवस असतो. मात्र, आधुनिक काळात याला हटके गोष्टींची जोड मिळाली आणि त्याचा अपभ्रंश म्हणून गटारी अमावास्या असा शब्दप्रयोग प्रचलित झाला, असे सांगितले जाते.

गटारी अमावास्या

नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी रविवार म्हणजे हक्काचा दिवस असतो. त्यामुळे गटारी अमावास्येच्या निमित्ताने मांसाहारावर यथेच्छ ताव मारला जातो. आषाढ महिन्याच्या अखेरच्या दिवशी समस्त नॉनव्हेज प्रेमी मटण, चिकन, नॉनव्हेज खातात. या दिवशी विविध हॉटेलमध्येही नॉनव्हेजप्रेमींची गर्दी असते. त्याचप्रमाणे मद्यपानही केले जाते. यानंतर श्रावण मास सुरू होत असल्यामुळे बहुतांश कुटुंबांमध्ये मांसाहार आणि मद्यपान केले जात नाही. काही कुटुंबांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जनापर्यंत मासांहार केला जात नाही.

त्यामुळे या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त होते. रविवारचा दिवस हा कुटुंबातील सदस्यांच्या सुट्टीचा, एकत्र येऊन मजा करण्याचा हक्काचा दिवस असल्यामुळे गटारी अमावास्या साजरी करण्यासाठी रविवारला अधिक प्राधान्य दिले जाते. दुसरीकडे, श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो. हवा कुंद असल्यामुळे पचनशक्तीही कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न पचत नाही. तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो. म्हणून मासे खाणे टाळले जाते.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

गतहारी अमावस्या

आता गटारीला गतहारी तरी का म्हणत असतील, तर आपल्याला माहीत आहे की आषाढ अमावास्येपासून पुढे चातुर्मासात मांसाहार किंवा कांदा, लसूण असे पदार्थ वर्ज्य केले जातात. याचे एक कारण म्हणजे पावसाच्या चार महिन्यांच्या या काळात मासेमारी बंद असते शिवाय शेताची कामेही सुरु असल्याने एरवी वर्षभर खाल्ले जाणारे पदार्थ तितक्याच मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील असे नाही.

म्हणूनच काही प्रमाणात निर्बंध येत असत यामुळेच वर्षभरात केला जाणारा आहार मागे सोडून चातुर्मासात वेगळ्या पद्धतीचा आहार घेण्याची ही सुरुवात असते म्हणून ही अमावस्या व हा दिवस गतहारी अशा नावाने ओळखला जातो.

आषाढी अमावस्येची विविध नावे

आषाढ अमावास्या विविध नावाने ओळखली जाते. उत्तर भारतात श्रावण अमावास्या किंवा हरियाली अमावास्या नावाने हा दिवस साजरा केला जातो. ओडिसा राज्यात याला चितलगी अमावास्या असे संबोधले जाते. तेलंगण आणि आंध्र प्रदेश या राज्यात चुक्कला अमावास्या म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

आषाढ अमावास्येला दीपपूजनाला महत्त्व असल्यामुळे याला दीप अमावास्या असेही म्हटले जाते. सन २०२३ मध्ये आषाढ अमावास्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावास्या असेही म्हटले जाते.

Leave a Comment