धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi

धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi : महाराष्ट्रातील प्रत्येक सण हा एक सांस्कृतिक आणि प्रादेशिक महत्त्व ठेवतो. त्यामध्ये दिवाळी हा सण तर कृषी, कलात्मक आणि सांस्कृतिक विशेषता स्पष्ट करतो. त्यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, (Dhanteras Information In Marathi) नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशी विविध कृत्ये वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जातात. त्यामधील या लेखात आपण धनत्रयोदशी (Dhantrayodashi) या दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत.

धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi

धनतेरस (Dhanteras), ज्याला धनत्रयोदशी असेही म्हणतात, या दिवसापासून पाच दिवसांच्या दिवाळी सणाची सुरुवात होते. हिंदू कॅलेंडर महिन्यातील कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 13 व्या चंद्र दिवशी हा सण साजरा केला जातो.

धनत्रयोदशीच्या उत्सवाबरोबरच, याला धन्वंतरी जयंती, आयुर्वेदाच्या देवाची जयंती म्हणूनही ओळखले जाते. आरोग्याच्या दृष्टीने आयुष मंत्रालय धनत्रयोदशीला “राष्ट्रीय आयुर्वेद दिवस” ​​म्हणून साजरा करते.(Dhanteras Information In Marathi)

दिपावली हा सणांचा राजा मानल्या गेलेल्या उत्सवात लोक आनंदाने सहभागी होऊन वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. (Dhanteras Information In Marathi) सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक दृष्टिकोन दीपावलीचे महत्त्व स्पष्ट करते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा आणि भाऊबीज या दिवसांचे विधी ,पूजा मांडून ते वेगवेगळ्या दिवशी क्रमाने साजरे केले जातात. आपण धनत्रयोदशी म्हणजे काय? आणि याचे महत्त्व, पूजाविधी आणि यामागील कथा या लेखाद्वारे आज आपण जाणून घेऊया.(Dhanteras Information In Marathi)

धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती

धनत्रयोदशी हा दीपावली चा दुसरा दिवस. अश्विन महिन्याच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरा केला जातो. देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा या दिवशी म्हणजेच समुद्र मंथनाच्या वेळी जन्म झाला. त्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजन असेही म्हणतात. संपत्ती, धन, पैसा आणि आर्थिक वाढ व्हावी, घरात सुख ,शांती, समाधान लाभावे, यासाठी या दिवशी लक्ष्मीदेवी आणि कुबेर यांचे मनापासून पूजन केले जाते. (Dhanteras Information In Marathi) दररोज वापरण्यात येणाऱ्या वस्तू, वाहने यांचे देखील पूजन करण्यात येते.

इंद्र देव आणि असुर यांच्यामध्ये ज्यावेळी समुद्रमंथन चालले होते, त्यावेळी देवी लक्ष्मी प्रकट झाली तसेच धन्वंतरी देखील अमृतकुंभ घेऊन प्रकट झाल्यामुळे त्या दोघांचीही धनत्रयोदशी या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा देवांचा वैद्य होता. उत्तम औषधींचा लाभ त्याच्यामुळे देवांना मिळत होता.(Dhanteras Information In Marathi)

व्यापारी लोक या दिवशी आपल्या व्यवसाय धंद्यातील, दुकानातील हिशोब आणि वह्या या साहित्याची पूजा करतात. तसेच या दिवसापासून नवीन हिशोबाची वही घालण्याची प्रथा आहे.

धनत्रयोदशी म्हणजे दिवाळी

महाराष्ट्रात दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस! परंतु आजची स्थिती पाहता सर्व लोक गाईची उपासना करताना दिसत नाहीत. त्यामुळे धनत्रयोदशी हाच दिवस दिवाळीचा आहे असे सद्य दिनदर्शिकेमध्ये दर्शवले आहे. या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते.(Dhanteras Information In Marathi) त्यानंतर नवीन पोशाख परिधान केला जातो. घराबाहेर पणत्या लावल्या जातात. दिवाळीसाठी केलेला गोड तिखट फराळ खाल्ला जातो.

लहान – मोठी मुले फटाके वाजवतात तर मुली घराबाहेर रांगोळी काढतात. दिवसभर सर्वांना शुभेच्छा संदेश दिल्यानंतर आणि आप्तेष्टांच्या घरी फराळ करून झाल्यानंतर पुन्हा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी सर्वजण एकत्र जमतात, फटाके फोडतात. आकाशकंदील आणि दिवेलागणी केली जाते. आजकाल तर मोबाईलमध्ये फोटो काढून स्टेटस ठेवूनच दिवाळी साजरी केल्यासारखी वाटते.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

धनत्रयोदशी संपूर्ण माहिती

 • दिवाळीचा पहिला दिवस असतो वसुबारसचा आणि दिवाळीचा धनत्रयोदशी हा दुसरा दिवस आहे.
 • धनत्रयोदशी हा दिवस आश्विन महिन्याच्या त्रयोदशीला असतो.
 • धन, संपत्ती आणि आर्थिक वाढ व्हावी म्हणून देखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
 • देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाला.
 • इंद्रदेव आणि असुर यांच्यामध्ये समुद्र मंथन चालले असताना मंथनातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली तसेच धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले. त्यामुळे या दोघांचीही पूजा या दिवशी केली जाते.
 • व्यापारी लोक या दिवशी स्वतःच्या हिशोबाच्या वह्या, दुकाने, त्यामधील साहित्य या सर्वांची पूजा करतात. तसेच या दिवसापासून नवीन हिशोबाची वही घालण्याची प्रथा आहे.
 • या दिवसाचे सांस्कृतिक महत्त्व देखील मोठे आहे.
 • उपजिविकेसाठी उपयोगी असलेल्या सर्व वस्तूंचे म्हणजेच आपले काम व त्यासाठी उपयोगी असलेल्या वस्तूंचे पूजन केले जाते. ज्याद्वारे आपण धनप्राप्ती करतो त्याचेही पूजन केले जाते.
 • अमृतकुंभ रूपाने अनेक औषधांचा सार देवांना प्राप्त झाल्याने त्यांना देवांच वैद्यराज म्हटले जाऊ लागले.

अर्थ

धनत्रयोदशी हा आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा उत्सव आहे. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि यमराजाची पूजा केली जाते. धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा. अर्थात धन म्हणजे काय तर जे आपण कमावलेलं आहे, ज्यावर आपला हक्क आहे ते. मग प्रत्येकजण काय कमावतो, (Dhanteras Information In Marathi) तर आपण शेतात धान्य पिकवतो, आपण शरीर कमावतो, आपण शिक्षण घेतो, आपण शब्दांचे धन कमावतो. या सगळ्या धनाची पूजा केली जाते. या दिवशी अश्विन महिन्याच्या त्रयोदशी येते, म्हणून ही धनत्रयोदशी.

म्हणून तर तुकाराम महाराजांनी म्हटलंय, ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने, (Dhanteras Information In Marathi) शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू’ अर्थात आमच्यासाठी शब्दांनाच धनाचे अन्‌ शस्त्रांचे मोल आहे. अशा विविध प्रकारातील धनाचे पूजन धनत्रयोदशीला केले जाते.

इतिहास

हिंदू दिनदर्शिकेनुसार कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदिक देव धन्वंतरीची देखील सगळे पूजा करतात. (Dhanteras Information In Marathi) या दिवशी लोक समुद्रमंथनादरम्यान प्रकट झालेल्या भगवान धन्वंतरी पूजा करतात. एका प्रसिद्ध कथेनुसार, देव आणि असुरांनी धन्वंतरी निर्माण करण्यासाठी समुद्रमंथन केले. त्याला विष्णूचा अवतार आणि देवांचा चिकित्सक मानले जाते.

या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात आणि दिवाळीची तयारी करतात. संध्याकाळी ते भगवान धन्वंतरीची पूजा करतात.तसेच यादिवशी यमदिपदान देखील केले जाते. या दिवशी घरातील सगळे दिवे आणि कंदील लावून आपली घरे सजवतात. धनत्रयोदशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण तो दिवाळीच्या आनंददायी सुट्टीचा शुभारंभ करतो.

धनत्रयोदशीची पूजा आणि मुहूर्त 2023

 • शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023
 • धनत्रयोदशी पूजेचा मुहूर्त – 05:47 PM ते संध्याकाळी 07:43
 • कालावधी – 01 तास 56 मि.
 • यमदीपदान चालू शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023
 • प्रदोष काळ – 05:30 PM ते 08:08 PM
 • वृषभ काळ – 05:47 PM ते संध्याकाळी 07:43
 • त्रयोदशी तिथीची सुरुवात – 10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12:35 वाजता
 • त्रयोदशी तिथी समाप्त – 11 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 01:57 वाजता

धनत्रयोदशी का साजरी करतात?

काही लोकप्रिय हिंदू पौराणिक कथाशी संबंधित इतर अनेक धार्मिक सणाप्रमाणे धनत्रयोदशी देखील आपण साजरी करतो.(Dhanteras Information In Marathi) बरेच लोक धनत्रयोदशी भगवान धन्वंतरी यांना अर्पण करतात तर काही लोक भगवान यमराज आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. एका प्रसिद्ध कथेनुसार, देव आणि असुरांनी धन्वंतरी निर्माण करण्यासाठी समुद्रमंथन केले. त्याला विष्णूचा अवतार आणि देवांचा चिकित्सक मानले जाते.

धनत्रयोदशी कशी साजरी करतात

दिवाळीच्या आधीचा दिवस म्हणजेच धनतेरस असते. त्यालाच धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी तेरा दिवे लावून हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी हा आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा उत्सव आहे. तसेच अंगणातही दिवे लावले जातात. देवघरावर विद्युत रोषणाई केली जाते. त्यामागे हाच उद्देश आहे, की सतत आपल्या आयुष्यामध्ये असेच अशाच प्रकारची रोषणाई राहावी व कुठल्याही प्रकारची आरोग्य हानी न व्हावी म्हणून ही पूजा केली जाते. (Dhanteras Information In Marathi) त्या संबंधीच्या अडचणी पासून नेहमी दूर रहावे. हा त्यामागचा उद्देश आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदिक देव धन्वंतरीची देखील सगळे पूजा करतात. जर आपल्याकडे धन टिकत नसेल तर पैसा सुद्धा येत नसेल तर या दिवशी धनत्रयोदशीची पूजा करत असतांना साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूचे दान सुद्धा देण्याची प्रथा आहे.

या दिवशी दिवे घराच्या आत आणि तेरा दिवे घराच्या बाहेर ठेवल्याने घरात दारिद्र आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. यादिवशी संपूर्ण घर सच्चा केले जाते. धनतेरसच्या दिवशी सर्वात आधी संध्याकाळी तेरा दिवे प्रज्वलित करून आणि तिजोरीतील कुबेराचे पूजन करतात. (Dhanteras Information In Marathi) नंतर हळद, कुंकू, अक्षता वाहून चंदन, धूप, दीप, नैवेद्य याने पूजन झाल्यावर आरती करतात. आणि मंत्र, पुष्पांजली अर्पित करतात. तसेच तेरा दिवे लावत असताना, त्या दिव्याजवळ तेरा कवड्या ठेवतात. नंतर या कवड्या घरातील एखाद्या कोपऱ्यात दाबून ठेवतात. असे समजले जाते की, या कवड्यांमुळे अचानक धनलाभ होण्याचे योग बनतात. तसेच कुटुंबातील लोकांसाठी भेट वस्तू, कपडे, इतर वस्तू खरेदी करतात.

तसेच दारावर येणारे गरजू भिकारी किंवा कोणीही मागणारे आले तर त्याला रिकाम्या हाती पाठवत नसतात. पाच दिवस दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने हिंदू महिला साजरा करत असतात. या दिवशी कुठलेही प्रकारचे भांडण न करता मनामध्ये सकारात्मकता ठेवली जाते. आपल्या कामात यश मिळविण्यासाठी इच्छा असलेल्या या सणाच्या दिवशी त्या झाडाची डहाळी तोडावी ज्या झाडावर वटवाघळं बसत असतील, तेथील डहाळी घरामध्ये ठेवल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते आणि धनात वृद्धी होते. अशी लोकांची श्रद्धा आहे.

या दिवशी धन्वंतरी जन्मोत्सव हे आणखीन एक व्रत करण्यात येते. त्या मागे आयुर्वेदाचे प्रवर्तक असलेला विष्णूचा अवतार धन्वंतरी आहे. एका प्रसिद्ध कथेनुसार, देव आणि असुरांनी धन्वंतरी निर्माण करण्यासाठी समुद्रमंथन केले. त्याला विष्णूचा अवतार आणि देवांचा चिकित्सक मानले जाते. (Dhanteras Information In Marathi) धन्वंतरी सर्व विद्यात निष्णात होता. मंत्र, तंत्रातही विशारद होता. त्यांच्या अलौकिक प्रतिभेने औषधींचे सारामृत रूपाने देवांना प्राप्त झाले. त्यामुळे त्या देवांचे वैद्य राज हे पद मिळाले. त्यामुळे संध्याकाळी ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतरीची प्रार्थना केली जाते व दीर्घायुष्य मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते.

धनत्रयोदशीला भांडी, सोने आणि चांदी का खरेदी करतात

या दिवशी दागिने, रत्ने, धातू, घरगुती उत्पादने खरेदी करणे शुभ आहे. आणि असे मानले जाते की, ते खरेदी केल्याने आपण धनाची देवी लक्ष्मी घरी आणली. (Dhanteras Information In Marathi) या दिवशी लोक चांदी किंवा सोन्याच्या नाण्यांची पूजा करतात. असे मानले जाते की, सोन्या-चांदीसारख्या वस्तू खरेदी केल्याने घरात वाईट गोष्टींचा प्रवेश होत नाही आणि घरात सुख-समृद्धी समाधान टिकून राहते.

धनत्रयोदशीच्या दिवशी दान करण्याच्या वस्तू

वस्त्र : या दिवशी वस्त्र दान करणे शुभ समजले जाते. या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीना, गरिबांना कपडे दान करावे. असे मानले जाते की असे केल्याने घरात धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही.

धान्य : असे मानले जाते की, या दिवशी धान्य दान केल्यास घरात अन्नधान्याचा साठा नेहमीच भरलेला राहतो. अन्नधान्य दान करण्याबरोबरच गरिबांनाही अन्नदान अर्थात भोजनही करवता येऊ शकते. भोजन केल्यानंतर दक्षिणा देणे देखील शुभ मानतात.

झाडू : या दिवशी झाडूचे दान करावे. या दिवशी झाडू दान केल्याने शुभ फळ मिळते असे मानले जाते. या दिवशी कोणत्याही मंदिरात किंवा गरीबांना झाडू दान केल्याने आपल्याला कधीही धनाची कमतरता भासत नाही.

लोह : या दिवशी लोहाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी लोह दान केल्याने जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी लोखंड दान केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात असा समज आहे.

Dhanteras Information In Marathi
Dhanteras Information In Marathi

धनत्रयोदशीचे महत्व | Dhantrayodashi Significance

संध्याकाळी भक्त त्यांच्या घरी शांती आणि आनंद आणण्यासाठी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेतात. हिंदू संस्कृतीत असा विश्वास आहे की, देवी लक्ष्मी फक्त स्वच्छ आणि सुंदर घरातच प्रवेश करते. म्हणून या दिवशी लोक देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या निवासस्थानात आमंत्रित करण्यासाठी त्यांचे घर स्वच्छ करतात. ते दिवे लावतात, रांगोळ्या काढतात आणि प्रवेशद्वारावर तोरण लावतात. (Dhanteras Information In Marathi) धनत्रयोदशी हा केवळ सण नाही हे आकर्षक पौराणिक कथा, पूजा आणि उत्सव यांचे सुंदर मिश्रण आहे. अनेकजण रात्रीच्या वेळी भगवान यमराजाची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दीपदान करून प्रार्थना करतात.

हिंदू मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 13 दिवे प्रज्वलित केले जातात. लोक या दिवसातला चांदीची भांडी, स्त्रियांसाठी दागिने म्हणजे सोन्याचे झुमके किंवा धातूशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानतात. त्यांचा असा विश्वास आहे की, इथे त्यांच्यासाठी नशीब आणि संपत्ती आणते. याशिवाय काही लोक त्यांच्या मुख्य उत्पन्नाची स्त्रोताची पूजा करणे पसंत करतात. (Dhanteras Information In Marathi) कारण दुकानदार त्यांच्या कामाच्या ठिकाणी याची पूजा करतात. आणि शेतकरी त्यांच्या सुंदर सुशोभित गुरांची तसेच धान्याची, शस्त्रांची पूजा करतात. भारतातील लोक पारंपारिक भारतीय पोशाख परिधान करतात आणि अत्यंत उत्साहाने हा सण थाटामाटात साजरा करतात.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

धनत्रयोदशी 13 दिव्यांचे महत्त्व

 • या सणाच्या दिवशी, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत, 13 जुने/जुने मातीचे दिवे प्रज्वलित करावे आणि मृत्यूपासून बचाव करण्यासाठी घराबाहेरील कचराकुंडीजवळ दक्षिणेकडे तोंड करून ठेवावे. पहिला दिवा कुटुंबाला अनपेक्षित मृत्यूपासून वाचवतो.
 • या रात्री तुमच्या पूजेच्या मंदिरासमोर/घरासमोर तुपाचा दुसरा दिवा लावावा जेणेकरून सौभाग्य प्राप्त होईल.
 • सौभाग्य, समृद्धी आणि समृद्धीसाठी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिसरा दिवा लक्ष्मीसमोर लावावा.
 • चौथा दिवा तुळशीसमोर ठेवल्याने घरात सुख-शांती नांदते.
 • आपल्या घरात आनंद, प्रेम, शुभेच्छा आणि आनंदाचे स्वागत करण्याचे प्रतीक आहे. म्हणून पाचवा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर लावावा.
 • आर्थिक संकट, आरोग्य संकटापासून मुक्तीचे प्रतीक आहे; आणि कीर्ती आणि नशीब आणण्यासाठी आहे. म्हणून मोहरीच्या तेलाने सहावा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावणे शुभ मानले जाते.
 • घराजवळील कोणत्याही मंदिरात सातवा दिवा लावावा.
 • कचराकुंडीजवळ आठवा दिवा लावावा.
 • घराभोवती सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी नववा दिवा आपल्या स्नान गृहाच्या बाहेर ठेवा.
 • छतावर दहावा दिवा लावा कारण ते संरक्षणाचे प्रतीक आहे.
 • आनंद पसरवण्यासाठी अकराव्या दिव्याने खिडकी सजवा.
 • बारावा दिवा सणाची भावना साजरी करण्यासाठी टेरेसवर ठेवा.
 • तेरावा दिवा लावून तुमच्या घराचा चौक सजवा.

धनत्रयोदशीला यमदेवतेची पूजा करावी

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीसह कुबेर आणि यमराजाच्या पूजेलाही खूप महत्त्व आहे. या दिवशी जे गौरी, गणेश, धन्वंतरी, कुबेर आणि यम यांची पंचोपचार पद्धतीने पूजा करतात, असे मानले जाते. त्याच्या आयुष्यात कशाचीच कमतरता नसते. असा दिवा लावल्यामुळे यमाच्या पाशातून आणि नरकातून आपल्याला मुक्ती मिळते.

धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू घरी आणा!

धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीला खूप महत्त्व असते. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करणे खूप शुभ असते. या दिवशी देवी लक्ष्मीच्या आगमनानिमित्त सोन्या-चांदीचे दागिने, भांडी, नवीन गाडी, झाडू इत्यादी खरेदी करू शकता. या दिवशी गौरी गणेशासोबत भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. (Dhanteras Information In Marathi) भगवान धन्वंतरी हे वैद्य मानले जातात. अशा स्थितीत त्यांची पूजा केल्याने माणूस असाध्य रोगांपासून मुक्त होऊन निरोगी बनतो. तसेच त्यांची पूजा केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.

धन्वंतरी पौराणिक मंत्र

ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:

अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय

त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप

श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः॥

धनत्रयोदशीला या गोष्टींची घ्या विशेष काळजी

या दिवशी पूजा करण्यापूर्वी माता लक्ष्मीचे चित्र तुमच्या घराच्या, दुकानाच्या तिजोरीवर लावा आणि त्याची पूजा करा, पण एका (Dhanteras Information In Marathi) गोष्टीची विशेष काळजी घ्या की तुम्ही लावत असलेल्या चित्रात माता लक्ष्मी कमळामध्ये धन वर्षा करतानाच्या मुद्रेत विराजमान असावी.

जेव्हा तुम्ही या सणासाठी बाजारातून खरेदी करत असाल, (Dhanteras Information In Marathi) तेव्हा तुम्ही 11 गोमती चक्रे खरेदी करून घरी आणू शकता. घरी आणल्यानंतर त्यावर चंदन लावून लक्ष्मीची पूजा करावी. आणि माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा. यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने तुमच्या घरात सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहील.

धनत्रयोदशी कथा

एका कठीण भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनातील सर्व सुख सोयी उपभोगाव्यात म्हणून हेमा राजा व राणी आपल्या पुत्राचे लग्न करतात. लग्नानंतर चौथ्या दिवशी तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जातात. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो.

त्याची पत्नी त्याला वेगवेगळ्या गाणी गोष्टी ऐकून जागे ठेवत असते. ज्यावेळी यम या राजकुमाराच्या खोलीत सापाच्या रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, (Dhanteras Information In Marathi) त्यावेळी त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपून जातात, या कारणामुळे यम आपल्या यमलोकात परततो. अशा प्रकारे त्या राजकुमारची पत्नी त्याचे प्राण वाचवते. म्हणून या दिवसाला यमदीपदान असे देखील म्हणतात. या दिवशी संध्याकाळच्या वेळी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावून त्याला नमस्कार करून आपण यमाची प्रार्थना करतो. (Dhanteras Information In Marathi)

FAQs

धनत्रयोदशी का साजरी केली जाते?

आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांची जयंती धनत्रयोदशी म्हणून साजरी केली जाते. दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी हा धन्वंतरी दिन म्हणून साजरा केला जातो.

धनत्रयोदशीचा अर्थ काय? (Dhanteras Information In Marathi)

धनत्रयोदशी या नावाने ओळखला जाणारा हा हिंदूंचा सण आहे. या दिवशी लोक शुभेच्छा आणण्यासाठी भांडी आणि दागिने खरेदी करतात. हा शब्द ‘धन’ म्हणजे संपत्ती आणि ‘तेरस’ म्हणजे तेरा म्हणजेच कृष्ण त्रयोदशी या शब्दापासून बनला आहे.

आपण धनत्रयोदशीला दिवे लावतो का?

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा. त्याला गंध, पुष्प आणि अक्षतांनी पूजा करावी. आणि तो दिवा दक्षिण दिशेला लावून यमासाठी प्रार्थना करावी. असा दिवा लावल्यामुळे यमाच्या पाशातून आणि नरकातून आपल्याला मुक्ती मिळते.

धनत्रयोदशीचा दिवाळीशी संबंध कसा आहे?

धनत्रयोदशी (संस्कृत: धनत्रयोदशी) म्हणूनही ओळखले जाते, हा भारतातील बहुतेक भागांमध्ये दिवाळीचा सण म्हणून ओळखला जाणारा पहिला दिवस आहे. हिंदू कॅलेंडर चंद्रसौर आहे.
या सणाबद्दल अजून एक दंतकथा अशी देखील आहे की, ज्यावेळी इंद्राने असुरांना बरोबर घेऊन समुद्रमंथन केले. त्यावेळी या दिवशी त्यातून लक्ष्मी देवी प्रकट झाली. त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी हा अमृतकुंभ घेऊन बाहेर आला. म्हणून या दिवशी धन्वंतरी ची देखील पूजा केली जाते. म्हणूनच या दिवसाला धन्वंतरी जयंती असे देखील म्हटले जाते.

निष्कर्ष

या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/शास्त्रातून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती वितरीत करणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी.

Leave a Comment