Hartalika Wishes In Marathi | हरतालिका शुभेच्छा संदेश : चांगला पती मिळावा म्हणून कुमारीका हरतालिकेचे व्रत करतात. भगवान शंकराला प्राप्त…
Hartalika Wishes In Marathi | हरतालिका शुभेच्छा संदेश
हरतालिका हा सण,
स्त्रियांचा आपल्या पती बद्दल प्रेम
आणि त्याग दर्शविणारा आहे.
आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
व भगवान शिव प्रमाणे एक शक्तिशाली
व प्रेमळ पती लाभो हि आमची सदिच्छा.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा.
हरतालिकाचा हा सण…
तुमच्या जीवनात “नव चैतन्य आणो,
तुमच्या पती आणि परिवारचे सुकल्याण होवो
व तुमच्या शरीर आणि आत्म्याला शुद्ध करो
अशी देवी हरतालिके ला प्रार्थना.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा!
आई पार्वती आणि शंकर देवा चा
दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात सुख,
शांती, समृद्धी, ख़ुशी आणि चांगले स्वास्थ्य आणो,
अशी माझी देवा जवळ प्रार्थना.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा!
चांगला पती मिळावा म्हणून कुमारीका हरतालिकेचे व्रत करतात. भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने देखील हे व्रत केले होते. या व्रतामुळेच त्यांना भगवान शंकरासारखा भोळा पती मिळाला, अशी आख्यायिका सांगितली जाते. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी हरतालिका येते. याला हिंदीमध्ये तिज असे देखील म्हणतात. तर आपण याला ‘हरताळका’ (Hartalika Marathi) असे संबोधतो. दरवर्षी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरताळका येते. हरताळकेचे हे व्रत करण्याची प्रत्येकाची पद्धत आणि हरतालिका पूजा मराठी ही वेगवेगळी आहे.
भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी केलेल्या या व्रताचा महिमा जाणून घेतच कुमारीका अगदी न चुकता हे व्रत करतात. या खास दिवशी तुमच्या मैत्रिणींना या दिवसाच्या खास हरतालिका शुभेच्छा (Hartalika Tritiya Marathi Messages) द्यायला हव्यात. जाणून घेऊया हे खास शुभेच्छा संदेश (Hartalika Wishes In Marathi) जसं हरतालिका शुभेच्छा (Hartalika Chya Shubhechha), हरतालिका सुविचार मराठी (Hartalika Quotes In Marathi), हरतालिका एसएमएस (Hartalika SMS In Marathi), (Hartalika Wishes In Marathi) हरतालिका स्टेटस मराठी (Hartalika Status In Marathi). हरतालिका झाल्यावर गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी खास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर
करिती व्रत सवाष्ण वा कन्या
उपवर अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
आला रे आला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिकेचे व्रत करुन
तुमच्या आयुष्यात येवो
आनंदी आनंद हरतालिकेच्या शुभेच्छा!
देवी पार्वती आणि भगवान शिवशंकर
यांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहू दे!
आपल्याला हरतालिकेच्या खूप-खूप शुभेच्छा
शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरितालिका तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- मंगळागौरीसाठी उखाणे Mangalagaur Ukhane
- Navriche Ukhane | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे Part 2
- Navariche Ukhane | नवरीचे उखाणे
माता उमाला मिळाला जसा शिव वर तुम्हालाही
मिळो मनाजोगता वर
हरितालिकेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
तिच्या मनी असे एक आशा, होऊ नये तिची निराशा
सर्व इच्छांची पूर्ती होवो, समृद्धी घेऊन आली हरतालिका
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!
संकल्प शक्तीचे प्रतीक,
अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो
हरतालिका सण हा आला सौभाग्याचा,
पार्वतीप्रमाणे आयुष्यात येवो भगवान शंकर सगळ्यांच्या,
हरतालिकेच्या शुभेच्छा
संकल्प शक्तीचे प्रतीक
अखंड सौभाग्याची प्रार्थना
हरितालिका सणानिमित्त पूर्ण
होवो तुमच्या मनोकामना
हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा!
प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे,
हरतालिकेचे व्रत हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिका स्टेटस (Hartalika Status In Marathi)
हरतालिकेच्या दिवशी तुम्ही काही स्टेटस ठेवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास स्टेटसदेखील (Hartalika Status In Marathi) निवडले आहेत.
शंकराची मनोभावे पूजा करुन,हरतालिका पुजूया, हरतालिका शुभेच्छा
माता पार्वतीने केले मनोभावे हरतालिकेचे व्रत, म्हणून तिला मिळाले शंकर नावाचे वर, हरतालिकेच्या शुभेच्छा!
करुनी मनोभावे पूजा शंकराची, प्रसन्न करावे त्याला हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!
शंकरासमान पती मिळवण्यासाठी करा हरतालिकेचे व्रत हरतालिकेच्या शुभेच्छा!
तुम्हा आम्हा सगळ्यांचा जीवनात यावा शंकरासमान पती, त्यासाठी पूजावी हरतालिका आजच्या दिवशी
हरतालिकेचा आनंद मनी दाटला, हर्ष आनंदोत्सवाचा क्षण हा आला, हरतालिकेच्या शुभेच्छा!
सण हा हर्षाचा, आनंदाचा, हरतालिका पूजन करण्याचा
हरतालिकेच्या या शुभप्रसंगी असावी तुम्हाला जोडीदाराची साथ, हरतालिकेच्या शुभेच्छा!
नाते अतुट हे जन्मोजन्मीचे मिळावे तुम्हाला सौभाग्याचे देणे, हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरताळका पूजून मिळवूया तुमच्या आवडीचा वर, हरतालिकेच्या शुभेच्छा!
आनंदाने करुया नव्या आयुष्याची सुरुवात, हरतालिका पुजून, करा सुखी संसाराची सुरुवात, हरितालिकेच्या शुभेच्छा
हरतालिकेचा आनंद, तुमच्या आयुष्यात टिकून राहो, हिच इश्वरचरणी प्रार्थना, हरितालिकेच्या शुभेच्छा
तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या हरतालिकेच्या शुभेच्छा!
लाभावी पतीची साथ, व्हावी सुखी संसाराची सुरुवात, हरितालिकेच्या शुभेच्छा
प्रेम, त्याग आणि पतिव्रतेेचे व्रत म्हणजे हरतालिका, हरितालिकेच्या शुभेच्छा
हरतालिका मेसेज मराठी (Hartalika SMS In Marathi)
हरतालिकेच्या दिवशी तुम्ही काही खास मराठी मेसेज पाठवू शकता. यासाठी आम्ही काही निवडक मेसेज (Hartalika SMS In Marathi) निवडले आहेत ते देखील जाणून घेऊया.
माता उमाला मिळाला जसा शिव वर तुम्हालाही मिळो मनाजोगता वर करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर, हरतालिकेच्या शुभेच्छा!
नव चैतन्य येवो तुमच्या आयुष्यात असावी कायम तुम्हाला प्रियवराची साथ म्हणून करा हरतालिका उपवास
पवित्र व्रत करुन मिळावा तुम्हाला सुंदर पती, हिच इच्छा हरतालिकेसमोरी, हरितालिकेच्या शुभेच्छा
हरतालिकेची पूजा करुन मिळावा सुखी संसारासाठी जोडीदार मिळावा तुम्हा आम्हा खास, हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिका सण हा आला आनंद गगनात मावेनासा झाला, हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
हरतालिकेचे व्रत करुन मिळावा हा आनंद सहजीवनात वाढावे सगळ्यांच्या प्रेम
गणेश चतुर्थीच्या आधी येते हरतालिका, आनंद हा सगळ्यांना मिळावा, हरतालिकेच्या शुभेच्छा!
माता पार्वती आणि शंकराची कृपा राहो तुमच्या चरणी, हरतालिकेच्या शुभेच्छा!
मातेला मिळाला इच्छित पती, तुम्हालाही मिळावा चांगला पती, हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिका आली, मनी हर्ष दाटला, सुयोग्य पती सगळ्यांना मिळावा, हरतालिकेच्या शुभेच्छा!
या हरतालिकेच्या शुभेच्छा पाठवून साजरा करा. या दिवसाचा आनंद करा साजरा. यंदाच्या वर्षी हरतालिका (Hartalika Marathi) नक्की साजरी करा.