Marathi Bhasha Gaurav Din : ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस Marathi Bhasha Gaurav Din म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषा गौरवदिन | Marathi Bhasha Gaurav Din

प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा केला जातो. वि.वा. शिरवाडकर हे मराठीतील प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि मानवतावादी होते. त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि गरिबीसारख्या सामाजिक दुष्कृत्यांबद्दल बरेच लिखाण केले आहे. त्यांनी सोळा कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, अठरा नाटके आणि सहा एकांकिका लिहिल्या.
मराठी साहित्याची महानता ओळखण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषेत आधुनिक इंडो-आर्यन भाषांमधील काही प्राचीन साहित्याचा समावेश आहे. (Marathi Bhasha Gaurav Din) मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील शाळा आणि इतर संस्थांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते.
मराठी भाषेचे वैशिष्ट्ये
- मराठी भारतातल्या अधिकृत २२ भाषांपैकी एक आहे.
- जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी १५ वी भाषा आहे. तर भारतातली तिसरी भाषा आहे.
- महाराष्ट्र आणि गोव्याची अधिकृत भाषा.
- मराठी भाषेला दीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा.
मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरवदिनातील फरक
- १ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य बनले. मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्य केले गेले. तेव्हापासून, १ मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ किंवा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
- १ मे या एकाच दिवशी मराठी राजभाषा दिन, महाराष्ट्र स्थापना दिन आणि कामगार दिनही साजरा होत होता.
- १ मे रोजी ‘मराठी राजभाषा दिन’, २१ फेब्रुवारीला ‘जागतिक मातृभाषा दिन’ आणि २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ हे तीन वेगवेगळे दिवस आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- Non Veg Jokes Marathi 2023 – नॉन व्हेज जोक्स मराठी भाग १
- Marathi Non Veg Ukhane – मराठी नॉन व्हेज उखाणे
- Chavat Ukhane for Female – महिलांसाठी चावट उखाणे
- Marathi Non Veg Jokes – नॉन व्हेज जोक्स मराठी भाग 2
कुसुमाग्रजांचे मराठीतले योगदान
- कविवर्य कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून घोषित करण्यात आला होता.
- कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कुसुमाग्रजांनी मराठी कवितेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले.
- कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या बोली भाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
- मराठी ही शिकण्याची भाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
- कुसुम हे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचे नाव होते. कुसुमाग्रजांनी आपल्या बहिणीच्या नावावरूनच आपले कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरले.
- कुसुमाग्रांच्या आत्मत्यागी तेज आणि मिलनसार भावनिक लेखनामुळे त्यांचे लेख हे जागतिक दर्जाचे झाले.
मराठी भाषा दिन मराठमोळ्या शुभेच्छा | Marathi Bhasha Din Wishes
मराठी ही आपली मातृभाषा आहे, हीचा सन्मान व संवर्धनासाठी प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. मराठी भाषेचा अभिमान आपल्याला कायम असला पाहीजे. जिथे शक्य होईल तिथे मराठी भाषेचा वापर केला पाहीजे. त्यामुळे मराठी भाषेचा जागर होत राहील. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा…
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
माय मराठीचा दिमाख आगळा
वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा
विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली
वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा.
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी
मराठी माझी जात!
मराठी माझा धर्म!
मराठी माझी माती!
मराठी माझं रक्त!
मराठी माझी शान!
मराठी माझा मान!
मराठी माझा राजा!
जय शिवराय
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रुजवू मराठी फुलवू मराठी
चला बोलू फक्त मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा
माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
भाषेचा गोडवा साखरेहूनी फार,
मऊ मखमली असली तरी
शब्दांना तिच्या धार,
वळवावी तशी वळते
सहज सगळ्यांना कळते.
भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्र्यात आहे, भविष्याचे वरदान
महाराष्ट्रातील तमाम जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जगण्यासाठी जिंकण्यासाठी
इतर भाषांची गरज असेलही जरी
पण ठेच लागल्यावर ‘आई गं’
म्हणतो तीच असते आपली भाषा खरी
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!