Navriche Ukhane | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे Part 2

50+ Navriche Ukhane | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे Part 2

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी उखाणे

Navriche Ukhane Part 2 | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे

Navriche Ukhane Part 2 | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे :

लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू
—– रावांना घास देताना,मला येई गोड हसू

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
——राव म्हणजे माझे जीवनसाथी .

हाताने कराव काम मुखाने म्हणावे राम ,
—– रावांचे चरण हेच माझे चारधाम .

सागवानी पेटीला सोन्याची चूक ,
—– रावांच्या हातात कायद्याचे बुक .

केळे देते सोलून पेरू देते चोरून ,
—– रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून .

स्वाती नक्षत्रातील थेंबाने शिंपल्यात होते मोती ,
—– रावांच्या संगतीत उजळते जीवनज्योती .

Navriche Ukhane Part 2 | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे :

मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला,
—– रावांचे आयुष्य वाढो हीच प्रथना तुला.

चांदीची फटफटी सोन्याची सीट ,
नवरा म्हणे बायकोला जाऊ आपण डबलसीट

जन्म दिला मातेने , पालन केले पित्याने
—– रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा
—– रावांना घास भरविते वरण भात तुपाचा

हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
—- रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित
मागते आयुष्य —— रावांच्या सहित

गाण्यांच्या भेंड्यांचा मूड आहे खास
—– रावांना भरविते जिलेबीचा घास

उटी, बँगलोर, म्हैसूर बोलाल तिथे जाऊ
— रावांना घास भरविते पण बोट नका चाऊ

Navriche Ukhane | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे Part 2
Navriche Ukhane | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे Part 2

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

दारी होती तुळस, घालत होते पाणी
लग्नगाठीने झाले मी —— रावांची राणी

चंद्राभोवती आहे तारकांचे रिंगण,
—— रावांच्या नावाने बांधले मी कंकण

श्रीरामाच्या चरणी वाहील फुल आणि पान
—— रावांच्या संसाराची वाढविन मी शान

हंड्यावर हंडे ठेवले सात, त्यावर ठेवली परात
—— रावांची पत्नी म्हणून प्रवेश करते घरात

सासू म्हणजे आहे सासरची आई
—– रावांचे नाव घ्यायला करू नका घाई

अक्षता पडता डोक्यावर मुलगी झाली माहेरची पाहुनी
—- रावांच्या घरची झाले आहे मी गृहिणी

ता ना पी हि नी पा जा हे इंद्रधनुचे सात रंग
—— रावांच्या संसारी आनंदाने मी आहे दंग

या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी
——- रावांचे नाव घेते सार्वजन आहांत साक्षी

अंगणात वृंदावन , त्यात छान तुळस
—— चे नाव घ्यायला मला नाही आळस

Leave a Comment