Santa Banta Jokes | संता बंता मराठी जोक्स – भाग १
बंता मायक्रोसाफ्ट कंपनीत इंटरव्ह्यू साठी जातो . .
मॅनेजर : ‘जावा’ चे चार व्हर्जन सांगा . . ?
बंता : मर जावा
मिट जावा
लुट जावा
सदके जावा
मॅनेजर : वेरी गुड . . आता घरी जावा . . !
संता – आज मी बायकोला वाचमैन बरोबर पिक्चर बघायला जाताना पाहिले.
बंता – मग तू माग नाही गेलास?
संता – नाही यार, तो पिक्चर मी पहिलेच बघितला आहे.
संता-बंता जंगलात गेले होते.
समोरून अचानक वाघ आला.
संतानं प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं
माती फेकली आणि तो बंताला म्हणाला, ”पळ पळ बंता!”
बंता हसत उत्तरला,
”मी का पळू? माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत!!!!”
संता: मला वाटतं, ती तरुणी बहिरी आहे.
बंता: तुला कसे माहीत ?
संता: मी आता तिच्यासमोर माझे प्रेम व्यक्त केले,
तर ती म्हणते कालच नवीन चप्पल खरेदी केलेय.
संता: अरे मी password टाकला
कि तिथे asterisks का दिसतात?
Engineer: ते सुरक्षेसाठी आहे, म्हणजे जेव्हा कोणी तुमच्या मागे उभा असेल
तेव्हा त्याला तुमचा password दिसणार नाही..
संता: काही पण, फसवायची काम..
अरे माझ्या गे कोणी उभा नसतो तेव्हा पण asterisks दिसतात..
संताचा मुलगा शाळेला दांडी मारतो.
दुसरया दिवशी टिचर जाब विचारतात.
तो सांगतो,” मी पडलो आणि लागली.”
टिचर: “कुठे पडला ? आणि काय लागली ?
संताचा मुलगा: मी गादीवर पडलो आणि मला झोप लागली.
संता आणि बंता दोघेही एका पाटीर्त चुपचाप घुसतात
आणि मस्तपैकी बुफेकडे जाऊन जेवण हाणायला सुरुवात करतात.
तितक्यात कोण तरी त्यांना विचारतं, तुम्ही कोण?
एक सेकंद विचार करून संता म्हणतो, आम्ही मुलाकडची मंडळी आहोत.
असं म्हटल्यावर सगळेजण त्या दोघांना धोपटतात आणि बाहेर काढतात…
…
कारण ते लग्न नसून वाढदिवसाची पार्टी असते.
एका पॉश हॉटेलमधल्या बारमधे बंता प्रथमच गेला.
एकाने ऑर्डर दिली,…”जॉनी वॉक़र..सिंगल”
दुसरयाने ऑर्डर दिली,…”जॅक डॅनियल्स..सिंगल”
बंता जराही वेळ न लावता बोलला.”बंता सिंग..मॅरिड!!”
एका गावात नदीवर पूल बांधण्यात आला.
सगळे गावकरी म्हणाले , ‘ वा , हे चांगलं झालं. ‘
संता – हो ना ,
पूर्वी उन्हातच पोहून नदी पार करावी लागायची.
आता सावलीतून पोहत जाता येईल.