Powerful Morning Motivation | सकाळची शक्तिशाली प्रेरणा

Powerful Morning Motivation | सकाळची शक्तिशाली प्रेरणा

 

गरजेचे नाही आहे की प्रत्येक दिवस हा चांगलाच असेल, परंतु प्रत्येक दिवशी आपण चांगलं काही नक्की करू शकतो. जर आज आपल्या सोबत काही वाईट घडत असेल तर ते अस नाहीये की ते तुमच्या आजच्या कर्मा मुळे घडत असेल, आपल्या सोबत जे काही होत आहे ते आपल्या मागील कर्मांमुळे होते आहे.

त्या कर्मांमुळे घडते आहे जे आपण भूतकाळात केलेले आहेत आणि पुढे आपल्यासोबत जे काही घडणार आहे ना ते अवलंबून असेल आपल्या आजच्या म्हणजेच वर्तमान काळावर! तर आपले कर्तव्य बनते की आपण आपल्यासाठी आपल्या चांगल्या भविष्यासाठी आज काहीतरी चांगले केले पाहिजे.

आजच्या या दिवसाला आपल्या जीवनातील मागील दिवसांपेक्षा एक जास्त प्रोडकटिव्ह दिवस बनवा. जे देखील काम तुम्ही आता करत आहात त्यात पूर्णपणे घुसून जा, म्हणजे हे काम इतक्या सचोटीने करा की जे आजपर्यंत इतके अचूक कोणीच केलेले नसेल, तरच जे आजपर्यंत नाही झाले ते होऊ शकेल, तरच तुम्ही ते बनऊ शकाल जे आजपर्यंत बनू शकला नाहीत, तेव्हाच तुम्हाला ते मिळेल जे आजपर्यंत नाही मिळाले, तेव्हाच तुम्हाला तो सन्मान मिळेल जो आजपर्यंत कधीच नाही मिळाला.

आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची, जगाला तुमची सिद्धता दाखवून देण्याची. मला माहित आहे एक दिवसात जगाला तुमची सिद्धता तुम्ही दाखवून देऊ शकणार नाही, परंतु आज असे काही तरी करा की तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वेगाने पोहोचू शकाल. प्रत्येक सेकंदाची किंमत करा, जेणेकरून हे विश्व पुढे जाऊन तुमची प्रत्येक सेकंदाची किंमत करेल. हे नका म्हणू की पुढे जाऊन करेन, उद्या करेन! उद्या काय अशी खास गोष्ट आहे जी आज नाहीये? अरे काही खास नाहीये, तीच व्यक्ती आहे, तीच ऊर्जा आहे, तोच दिवस आहे! इतकेच नाही तर उद्या त्या कामाला कार्याची ऊर्जा, त्यासाठी उत्फुर्तता अजून कमी होऊन जाईल.

जेव्हा कोणी मनुष्य मरतो ना तेव्हा तो पुन्हा कधीच परत फिरून येत नाही, त्याप्रमाणेच एकदा वेळ निघून गेली ना तर ती पुन्हा येणार नाही. एक सेकंद जरी निघून गेला तर तो पुन्हा कधी येत नाही. जर तुमचे प्रतिस्पर्धी 5 तास काम करत आहेत ना तर तुम्ही 6 ते 7 तास काम करा. जितके काम हे विश्व करते आहे ना त्यापेक्षा थोडेसे जास्त काम तुम्ही करा, तेव्हाच तुम्ही जगाच्या पुढे निघू शकाल. बघा तुमच्या जवळपास कोणता असा व्यक्ती आहे जो जास्त काम करतो आहे आणि त्यापेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करा.

कुठलाही अलार्म नसताना किंवा कोणताही स्ट्रगल नसताना तेच लोक सकाळी लवकर उठू शकतात जे आपल्या जीवनाला धरून आपल्या प्रत्येल नवीन दिवसाला सामोरे जाण्यासाठी खूप उत्साही असतात. जेव्हा सकाळी उत्स्फूर्तपणे आपले डोळे उघडतात त्या सकाळची मजाच काही वेगळी असते. माझ्या प्रत्येक दिवसाच्या सकाळची सुरुवात ही उत्स्फूर्तपणे होत असते. मी उत्स्फूर्त असते काम करण्यासाठी, आपल्या आयुष्याला आणखी चांगले बनवण्यासाठी, स्वतःला आणखी चांगले बनवण्यासाठी.

असे घडते यासाठी कारण मला साधारण जीवन जगणे आणि साधारण मनुष्य बनून राहणे मुळीच आवडत नाही.
त्यामुळे प्रत्येक दिवशी काम करा, स्वतःसाठी करा, स्वतःला आणखी सक्षम बनवण्यासाठी करा, आपले आयुष्य सुंदर बनवण्यासाठी करा. आणि पुन्हा सांगते जितके जग करते आहे त्यापेक्षा 2 तास जास्त काम करा. उत्स्फूर्तपणे आणि पोसिटीव्ह विचारांनी दिवसाची सुरुवात करा,

बेस्ट ऑफ लक!

तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात

Leave a Comment