Navra Bayko Jokes In Marathi Sharechat – भाग 3
Navra Bayko Jokes In Marathi Sharechat – भाग 3
गण्या: तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस?
बंड्या: “गुगल!”
गण्या: का रे?
बंड्या: आयला एक प्रश्न विचारला की “हजार” उत्तरं देते..!
समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न …
पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत
.
.
.
.
तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कश्या मिळतात?
बायको: जिथे असाल तिथेच थांबा. कुठेही बाहेर पडू नका.
पावसामुळे परीस्थिती खूप बेकार आहे. काळजी वाटते.
सांगितलेल ऐका यावेळी तरी!
नवरा: बरं, बरं!
बायको: बरं, नक्की कुठे आहात तुम्ही आता?
नवरा: माझ्या जुन्या मैत्रिणीच्या घरी. अचानक भेटली. तिने चहाला बोलवलं.
एकदम सन्नाटा
दुसऱ्या सेकंदाला बायको: जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब.
पावसाची कारण मला सांगु नकोस, समजलं ना.
बायको: बंदूक घेऊन दारात का थांबलात.
नवरा: वाघाची शिकार करायला चाललो.
बायको: मग थांबलात का?
नवरा: बाहेर कुत्रा उभा आहे तो गेला की जातो.
पती: तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन options आहेत म्हणून,
इथं तर एकच भाजी दिसतेय . . .
पत्नी: ( शांतपणे options दोनच आहेत…
1.खायचं असेल तर खा,
2.नाहीतर बोंबलत जा !!!
अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला “बोटाने” इशारा केला. आणि बोलाऊन घेतले..
.
.
नवरा- काय झालं का बोलावलस??
बायको- काम तसं काही खास नाही, मी फक्त ह्या “बोटात” किती Power
आहे ते तपासत होते…
गावठी बायको…
नवरा आपल्या बायको ला घेवून हॉटेलमधे जातो.
नवरा: काय खाणार तू…?
बायको : काय पण चालेल…
नवरा: वेटर, अरे एक मेनूकार्ड आण रे…
बायको: अहो दोन मागवा ना, मी पण तेच खाणार…!
बायको: जास्त पिऊ नका लवकर घरी या.
नवरा: तुला कसं कळालं मी प्यायला आलोय ते.
बायको: किचन मधून एक ग्लास चोरीला गेलाय म्हणून..
“प्लास्टिक बंदी..”
आईला 21 वर्ष लागतात मुलाला जेनटल बनवायला आणि
.
.
.
.
बायकोला 21 मिनिट लागतात नवऱ्याला मेंटल बनवायला.
पति-पत्नी एका गच्च गर्दी असलेल्या बस मधून प्रवास करत होते…
योगायोगाने पतीसमोर एक सुंदर स्त्री असते व ते तिला चिटकुन् उभे असतात,
स्वाभाविकपणे हे पाहून पत्नी फार जळत असते !
अचानकपणे ती सूंदर बाई फिरली व तिने पतिदेवाच्या कानाखाली एक जोरदार चपराक लावली!
“लाज नाही वाटत परस्त्रीला चिमटी काढायला!”
बसमधुन उतरल्यावर
पति: खरेच मी नाही ग चिमटा काढला..
पत्नी: अर्थपूर्ण नजरेने पाहत हसत बोलली
“आणखी चिटका ??? चिमटा मीच काढला होता “
बोला पत्नीधर्माचा विजय असो!!
नवरा: अग कुठे चाललीस तू?
बायको: दिसत नाही काय ? आंघोळीला चाललीय ते !
नवरा: अग पण मोबाईल घेऊन ?
बायको: मग, बादली भरेपर्यंत काय करू ……………
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको मराठी विनोद – भाग १
- Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको विनोद – भाग २
- Non Veg Navra Bayko Jokes Marathi – भाग 4
- Jokes In Marathi Navra Bayko – भाग ५
मोबाईल विकत घेतल्या वर आणि
लग्न केल्यावर माणसाला एकाच गोष्टीचा राग येतो
.
.
.
थोड अजुन थांबलो असतो तर चांगलं मॉडेल मिळालं असतं…
😆😆😆😆😆😆😆 ती म्हणाली प्रेमात प्रत्येकाने ताजमहाल बनवायची काही गरज नाही,
रोज भांडी घासली आणि कपडे धुतले तरी खुप झालं…….!
(Anniversary special)
पती सोफ्यावर आडवा पडला होता.
पत्नीने त्याच्या डोक्यात दंडुका मारला.
पती: का मारलीस यार !
पत्नी: तुमच्या खिशात एक चिठ्ठी सापडली .तिच्यावर रेशमा असे लिहिले होते.
पती: अगं ती रेसची घोडी आहे. कालच्या रविवारी मी रेस खेळायला गेलो होतो ना!
पत्नी: सॉरी.
चार दिवसांनंतर पती घरी येताच त्याच्या डोक्यात पुन्हा दंडुका बसला.
पती: आता का मारलीस ?
पत्नी: घोडीचा फोन आला होता.
Navra Bayko Jokes In Marathi Sharechat
सासुबाई: नवर्या मुलाला विचारतात..
वर्हाडी एवढे आनंदात वेडयासारखे का नाचू राहिलेत?
.
.
.
नवरदेव- कारण त्यांना सांगितल आहे कि..
हुंड्याच्या पैस्यातून सगळ्यांची उधारी दिली जाईल..
नवरा: हिप्नोटाइज करणं म्हणजे काय?
बायको: म्हणजे एखाद्याला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवून
आपल्याला हवी ती कामं करून घ्यायची.
नवरा: चल खोटारडी..त्याला तर लग्न म्हणतात. ‘
बायको ने विचारलं: ”मी कशी दिसते ओ
मी म्हणालो: श्रीदेवी नंतर तुझाच नंबर आहे….!
तांब्या फेकुन मारलं ना राव….
पती आणि पत्नी सोफ्यावर बसून कलिंगडाचे काप खात TV पाहत असतात.
पत्नीच्या एका हातात अर्थातच मोबाईल असतो.
पतीचा मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावलेला असतो.
एवढ्यात किचनमधून smsचा टोन ऐकू येतो, म्हणून पती किचनमध्ये जातो आणि मेसेज वाचतो.
बायकोचा मेसेज असतो: “किचनमधून परत येताना मीठ घेऊन या!” 😃
बायको बराच वेळा पासुन बाथरुम मधुन बाहेर आली नाही
म्हणुन सहज दरवाजा वाजवला …….
आतुन मोठ्याने आवाज आला ……
“आहे …..आहे….तुमची श्रीदेवी अजुन जिवंत आहे ……..
Navra Bayko Jokes In Marathi Sharechat
रात्री २ वाजता बायकोचा मोबाईल वाजला.
नवरा गडबडीत उठला.
बायकोचा मोबाईल बघितला तर मेसेज होता, “ब्युटीफुल”
नवऱ्याने रागाने बायकोला उठवुन विचारले,
“तुला ईतक्या रात्री ब्युटीफुलचा मेसेज कोणी पाठवलाय?”
बायको पण चक्रावली आता ४० च्या वयात ब्युटीफुल कोण म्हणणार आपल्याला??
जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तेव्हा नवऱ्याला ओरडुन म्हणाली,
“चष्मा लावून मोबाईल उचलत जावा “बॅटरी फुल” लिहिले आहे.”
बायको सोबत काल झालेल्या शाब्दीक चकमकी नंतर असं वाटतं
की एक भारतरत्न अशा बायकांसाठी पण असलं पाहिजे.
ज्या 300 शब्द प्रति मिनिटं बोलल्या नंतर म्हणतात की
– माझं तोंड उघडायला नका लावू.
लग्नाच्या पुजेवेळी
नवरा : गुरुजी पत्नीला माझ्या डावीकडे बसवायच की उजवीकडे?
गुरूजी : बघ जमतय तस कर, नंतर ती तुझ्या डोक्यावरच बसणार आहे
बायकांनी नवऱ्यासाठी करवा चौथचे व्रत करण्याऐवजी
मौनव्रत केल्यास पती २५ वर्ष जास्त जगू शकतो .
Navra Bayko Jokes In Marathi Sharechat
बायको: मला बोलायचीही इच्छा नाही,
तुम्ही माझा वाढदिवस पुन्हा विसरला… असं होतंच कसं?
नवरा: तुझा वाढदिवस मी लक्षात ठेवावा असं वाटतच कसं तुला?
तुझे वय वाढलंय असं वाटतच नाही.
बायको: खरंच?
नवरा: (मनात) टायमावर डायलॉग आठवला, नाहीतर काही खरं नव्हतं आज. ‘
पत्नी : जर मी अचानक मारून गेली तर तुम्ही दुसरे लग्न कराल का?
पती : नो डार्लिंग, तसा तर मी स्वप्नातही विचार करू शकत नाही.
पत्नी : का नाही का? तुमच्या चांगल्या वाईट क्षणांमध्ये तुमची सुख दुःखात साथ देणारी कोणी तरी हवी ना.
प्लिज मी मेल्यावर तुम्ही दुसरे लग्न करा, तुम्हाला माझी शपथ डार्लिंग.
पती : ओह, मेल्यानंतर पण माझी एवढी काळजी??
पत्नी : तर प्रॉमिस, तुम्ही दुसरे लग्न कराल ना?
पती : ओके बाबा, पण फक्त तू शपथ घातलीस म्हणून तुझ्यासाठी दुसरे लग्न कारेन.
पत्नी : तुम्ही तुमच्या नवीन पत्नीला या घरात ठेवाल ना?
पती : हो, पण मी तिला तुझी रूम नाही देणार वापरायला.
पत्नी : तिला आपली कार चालवायला द्याल ना?
पती : नो, नेव्हर, त्या कारमध्ये आपल्या दोघांच्या प्रेमळ आठवणी आहेत.
तुझी आठवण म्हणून मी कायम माझ्याजवळ ठेवील ती कार. तिला नवीन कार घेऊन देईल
पत्नी : आणि माझे दागिने?
पती : ते मी कसे देईल तिला? त्यात तुझ्या आठवणी आहेत ना. मी तिला नवीन दागिने बनवून देईन.
पत्नी : आणि तिने माझ्या चप्पल वापरल्या तर?
पती : नाही वापरू शकणार ती. तिच्या पायाची साईज ७ आहे आणि तुझ्या पायाची ९.
भयाण शांतता….. (चप्पल तुटेपर्यंत हाणला नवऱ्याला)
एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात.
तिकडून एक वात्रट मुलगा येतो आणि म्हणतो,
“काका काल वाली जास्तच मस्त होती”.
नवरा आता चार दिवसांपासून भुकेला त्या मुलाला शोधतोय
बायको: माझं लग्न जर एखाद्या राक्षसाशी झालं असतं ना
तरी मी आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तुझ्याबरोबर कंटाळलेय
नवरा: अगं वेडी, रक्ताच्या नात्यांमध्ये कुठे लग्नं होतात काय?
एकदा एका राजाने बायकोचे ऐकणारे आणि न ऐकणारे पुरुष पाहायचे ठरवले.
ऐकणारे आणि न ऐकणारे अशा दोन रंग करायला सांगितले.
सर्व पुरुष बायकोचे ऐकणारे याच रांगेत उभे होते.
फक्त एकच पुरुष न ऐकणारे अशा रांगेत उभा होता.
राजा म्हणाला: वा तू एकटाच बायकोच न ऐकणारा खरा पुरुष आहे.
त्यावर पुरुष म्हणाला: नाही, मला बायकोनेच येथे उभे राहायला सांगितले आहे.
काल रात्री उशिरा घरी पोहोचलो.
बराच वेळ बेल वाजवली पण बायकोने काही दर उघडलं नाही.
शेवटी आख्खी रात्र रस्त्यावर काढली.
मित्र: मग सकाळी तिच्यावर चिडलास की नाही?
नाही रे, सकाळी उठल्यावर लक्षात आलं की बायको माहेरी गेलीय
आणि चावी माझ्या खिश्यातच आहे.
तात्पर्य: कमी प्या रे
नवरा: माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय,
ताबडतोब अँब्युलन्स ला फोन लाव.
बायको: हो लावते, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा.
नवरा: राहू दे, थोडं बरं वाटतंय आता.
नवरा: हल्ली तुझे उपवास नसतात का?
लग्नाआधी बरेच करायचीस ना?
बायको: हो ना. सोळा सोमवार करून तुमच्याशी लग्न झालं
आणि माझा विश्वासच उडाला उपवासांवरचा.
Navra Bayko Jokes In Marathi Sharechat, Navra Bayko Jokes In Marathi Sharechat Image, Navra Bayko Jokes In Marathi Sharechat Status, Navra Bayko Jokes In Marathi Sharechat Story