Savarkar Quotes Marathi

Veer Savarkar Quotes Marathi | वीर सावरकर यांचे विचार

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी कोट्स

Veer Savarkar Quotes Marathi | वीर सावरकर यांचे विचार

Veer Savarkar Quotes Marathi | वीर सावरकर यांचे विचार

Savarkar Quotes Marathi
Savarkar Quotes Marathi

 वीर सावरकर यांचे तत्वज्ञानी कोट्स – Veer Savarkar Quotes Marathi

लोक म्हणतात आम्ही आईसाठी रक्त सांडू. माझ्याच रक्ताने प्रसन्न व्हायला आई काय कसाई आहे. मी माझं कशाला शत्रूचं रक्त सांडेन – वीर सावरकर

देशहितासाठी अन्य त्यागांसह जनतेच्या प्रेमाचा त्याग करणे हा सर्वात मोठा आणि उच्च आदर्श आहे. कारण जनहीत ध्येय हे केवळ जनस्तुतीमध्येच नाही तर शास्त्रांमध्येही अधिक मोठे मानले आहे – वीर सावरकर

तुम्ही माझी मार्सेलेसची उडी विसरलात तरी चालेल, पण माझी जात्युच्छेदक, अस्पृश्यता निवारक, विज्ञानतावादी विचारप्रणाली मात्र मुळीच विसरू नका – स्वातंत्र्यवीर सावरकर

देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो – वीर सावरकर

वस्तुतः जो समाज देशात बहुसंख्य असतो, त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे

आधुनिक भारत युनायटेड नेशन्समध्ये शत्रूराष्ट्रांना जोडा दाखवू शकेल असं समर्थ राष्ट्र झालं पाहिजे आणि तसं होण्यासाठी महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे – विनायक दामोदर सावरकर

Veer Savarkar Quotes Marathi

मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय, बल पशू आहे, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये…कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे

मनुष्याची सर्व शक्तीचे मूळ हे त्याच्या अहं मध्ये दडलेले आहे

आपले भाग्य मनुष्य स्वतः घडवतो, ईश्वर नाही – वीर सावरकर

प्रिय तरूणांनो, प्रेयसीच्या केसातून फिरणारी तुमची बोटे जर बंदुकीच्या चापावरून फिरू लागली, तर आणि तरच हिंदुस्थान जगू शकेल – वीर सावरकर

स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कोट्स | Veer Savarkar Quotes Marathi

यंत्राने बेकारी वाढत नाही तर विषम वाटणीमुळे वाढते – स्वातंत्र्यवीर सावरकर

अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन! – देशभक्त सावरकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Veer Savarkar Quotes Marathi

स्वतः जगणे व राष्ट्र जगविणे हे आपले कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय.

वर्तमान परिस्थितीवर त्याचा काय प्रभाव पडणार, याची चिंता केल्याव्यतिरिक्त इतिहास लेखकाने इतिहासाचे लेखन करायला हवे आणि त्यावेळची माहिती ही विशुद्ध आणि सत्य स्वरूपातच मांडावी – सावरकर

अनेक फुले फूलती | फुलोनिया सुकोन जाती ||
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे |
मात्र अमर होय ती वंशलता|
निर्वंश जिचा देशाकरिता – वीर सावरकर

नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा , मज भरतभूमिचा तारा ।।
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी ।।

शिवाजी उत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की, जे शिवाजीसारखे आपल्या या पारतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी झुंजायला सिद्ध आहेत – वीर सावरकर

एक देव एक देश एक आशा ।।
एक जाती एक जीव एक आशा ।।

ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडून बसायचे नसते, त्यांच्या आशिर्वादाची अपेक्षा बाळगायची असते – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Veer Savarkar Quotes Marathi

आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी येवो ना येवो
जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे – वीर सावरकर

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Positive Thinking Motivational Quotes (New 2023) Marathi
Motivational Quotes for Students ( New 2023 ) – Marathi
Life Challenges Quotes ( New 2023 ) – मराठी

स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे विज्ञानवादी विचार | Veer Savarkar Quotes Marathi

विज्ञाननिष्ठा वाढविणे हे बुद्धिवाद्यांचे कर्तव्य व धर्म आहे – वीर सावरकर

वेदांपेक्षा विज्ञानाने हे सूर्य, अग्नी, प्रकाश, सोम कसे तत्काळ आणि बिनचूक माणसाळले जातात. या विज्ञानाने सृष्टीला दासासारखे राबवून घेता येते – वीर सावरकर

युरोपीयनांना प्रबळ करणारा धर्मग्रंथ बायबल नव्हे! त्यांनी बायबल मिटले आणि त्यांचे डोळे उघडले! रशियाने तर बायबल फाडूनच टाकले! एकच धर्मग्रंथ असणाऱ्या लक्षावधी मुसलमानांवर, कोणताही धर्मग्रंथ नसलेला आणि विज्ञानग्रंथ धारण करणारा रशियाच आज राज्य करीत आहे – सावरकर

प्रत्क्षनिष्ठ आणि प्रयोगसिध्द विज्ञानच आजच्या परिस्थितीत आमच्या राष्ट्राचा वेद झाला पाहिजे – सावरकर

आधुनिकीकरण ही एक मानसिक प्रक्रिया असल्यामुळे मानसिक आधुनिकीकरणासाठी सर्वप्रथम धर्मग्रंथाचे दास्य झुगारून दिले पाहिजे

Veer Savarkar Quotes Marathi

बुद्धीची प्रतिष्ठापना केल्यावर जो धर्म समाजात अस्तित्वात राहील त्यालाच ते विज्ञानधर्म मानतात – वीर सावरकर

तुम्ही देवाच्या येऊ दिलेती दारी
आभारी जाहले भारी
हे सुतक युगांचे फिटले
विधिलिखित विटाळ ही मिटले
जन्माचे भांडण मिटले
आम्ही शतकांचे दास,
आज सहकारी आभार झाले भारी

पाच हजार वर्षांपूर्वीच्या अज्ञानयुगाकडे पाठ फिरवा आणि विज्ञानुगाचे स्वागत करा

धर्मनिष्ठा बाजूला केल्याशिवाय विज्ञाननिष्ठा प्रस्थापित होत ना

विज्ञानधर्माशिवाय माणसाचा विकासच होऊ शकत नाही

वीर सावरकरांचे विचार | Veer Savarkar Quotes Marathi

मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी विसरू नये – विनायक दामोदर सावरकर

या भूमीला पितृभू आणि पुण्यमू मानणारे ते हिंदू’ अशी माझी बौध्दिक व्याख्या आहे

हिंदुस्थानला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आजच्या सुधारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे, हाच खरा धर्म आहे – वीर सावरकर

Veer Savarkar Quotes Marathi

हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते, तो अनन्य शब्द म्हणजे ‘हिंदू’ ! ‘हिंदू’ या दोन अक्षरांत अगस्तीच्या ओंजळीतील महासागर, तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.

हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासून समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की, यज्ञकुंडातील अग्निहोत्र ज्याप्रमाणे कायम प्रज्वलित राहते, त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करून ठेवा.

गाय एक उपयुक्त पशू आहे – सावरकर (अग्रलेख)

नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरतभूमिचा तारा. प्रासाद इथे भव्य परी मज, भारी आईची झोपडी प्यारी

योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल.

धर्मग्रंथ हे ईश्वरकृत नसून मनुष्यकृत आहेत – सावरकर

धर्मग्रंथावर समाजसंस्था उभे करण्याचे दिवस आता संपले असून, समाजसंस्था आपल्याला बुद्धिवादाच्या नव्या तत्त्वावर म्हणजे विज्ञान ग्रंथांवर उभी केली पाहिजे. – स्वातंत्र्यवीर सावरकर

आपल्यास देण्याची योग्यता आहे तितके शब्द तरी शाब्दिक बौद्धिक राष्ट्रीय नि आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करत राहिले पाहिजे

मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वतःला ओळखण्यात आहेत – स्वातंत्र्यवीर सावरकर

आपल्या प्रामाणिकपणाचा वापर होईल पण केव्हा, तर दुसऱ्यास प्रामाणिक बनविण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच

उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही – विनायक दामोदर सावरकर

हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण

अनादी मी आणि अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपु जगती असा कवण जन्माला

Veer Savarkar Quotes Marathi

(देशहित जपताना) या जगात देवही माणसांच्या तोंडून येणाऱ्या प्रार्थनापेक्षा तोफांच्या तोंडातुन येणाऱ्या प्रार्थनांकडे जास्त लक्ष देतो – विनायक दामोदर सावरकर

पतितांनाच उद्धरण्याचे कार्य राष्ट्रीय हितास आवश्यक आहे

कष्टच तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते – स्वातंत्र्यवीर सावरकर

जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही.

Leave a Comment