100+ नवीन कोडी व उत्तरे | New Riddles In Marathi

New Riddles In Marathi With Answers : आजकाल मोबाइल व इंटरनेट च्या युगात मराठी कोडी खेळण्याचा खेळ खूप कमी झाला आहे. म्हणूनच या लेखातील ओळखा पाहू कोडी मराठी (Riddles In Marathi) वाचून आपण आपले मित्र व कुटुंबीयांना प्रश्न करू शकतात आणि पुन्हा एकदा Riddles In Marathi चर्चेत आणू शकतात. तर चला सुरू करूया..

100+ नवीन मराठी कोडी व उत्तरे | New Riddles In Marathi

Riddles In Marathi With Answers
Riddles In Marathi With Answers

१५+ मराठी कोडी उत्तरासह आणि संदर्भासह

हरी झंडी लाल कमान,
तोबा तोबा करे इंसांन….
उत्तर :- मिर्ची (मिरची तिखट असल्या कारणाने प्रत्येक व्यक्ती खाण्यास नकार देते)

हातात आल्यावर शंभर वेळेस कापतो..
आणि थकल्यावर दगड चाटतो..
उत्तर :- चाकू (तुम्हाला काही कापायचे असेल, तर चाकूची बाब समोर येते आणि जेव्हा शार्प करायचा असेल तर काठ दगडाने घासली जाते)

एका आईचे 2 मुलगे
दोन्ही महान भिन्न निसर्ग..
भाऊ भाऊ पेक्षा वेगळा..
एक थंड दुसरा आग.
उत्तर :- चंद्र, सूर्य (ते एकाच स्वभावाची मुले आहेत, परंतु दोघांचे स्वरूप एकमेकाच्या विरुद्ध आहेत, एक गरम निसर्ग आणि दुसरे थंड निसर्ग)

अशी कोणती गोष्ट आहे
जी बनवण्यासाठी बराच वेळ लागतो
परंतु तो खंडित होण्यास काही क्षण लागत नाही.
उत्तर :- विश्वास ट्रस्ट (ट्रस्ट ही एक अनमोल वस्तू आहे जी लोकांना साध्य करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात परंतु तो खंडित होण्यासाठी फक्त एक क्षण लागतो, म्हणून एखाद्याने कधीही हा विश्वास मोडू नये.

प्रत्येकाकडे असे काहीतरी आहे,
पण काही मध्ये कमी आणि काही मध्ये जास्त आहेत
ज्याच्याकडे जास्त आहे त्याला शहाणे म्हणतात
उत्तर :- टॅलेंट, प्रतिभा, कला (मेंदू, कला, प्रत्येकाकडे असते, वेड्या व्यक्तीपासून ते वैज्ञानिकांपर्यंत, परंतु हा फरक यामुळे दोन्ही भिन्न बनतात, वेड्याला मेंदू असतो, कला कमी प्रमाणात असते आणि वैज्ञानिकांना जास्त प्रमाणात असते.

हिरवा हिरवा दिसावा तो दृढ किंवा कच्चा असेल,
आतून ते रेड क्रीम, कोल्ड स्वीट फ्लेक्ससारखे.
उत्तर :- टरबूज (उन्हाळ्याच्या हंगामात बाजारात टरबूज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, जे लोक मोठ्या उत्साहाने खातात. तुम्ही पाहिलेच पाहिजे की टरबूजच्या वरच्या भागावर हिरव्या रंगाचा थर आला की तुम्ही तो कापला तर) आपल्याला आढळेल की आतील भाग लाल होईल. फळ मलईच्या रूपात खाल्ले जाते, आणि रस म्हणून खाल्ले जाते)

दोन अक्षरी नाव आहे
नेहमी सर्दी असते नाकावर
कागद माझा रुमाल आहे
माझे नाव काय आहे ते सांगा
उत्तर :- पेन (पेन दोन शब्दांनी बनलेला आहे, त्याची शाई नेहमीच लिहिण्यास तयार असते. कागदावर लिहिल्यामुळे, म्हणजे पुसण्याने त्याची शाई संपते, म्हणजे कागद रुमाल म्हणून काम करते.)

Latest Riddles In Marathi | Marathi Puzzles

ऊनात चालताना मी येतो
सावलीत बसता मी जातो
वाऱ्याचा स्पर्श मला नकोसा वाटतो
सांगा पाहू मी कोण?
उत्तर :- घाम 

एक गोष्ट जी
खायला कुणाला आवडत नाही
पण सर्वांना मिळते
उत्तर :- धोका 

आपण दिवसभर असे काहीतरी करता,
उचलतो आणि ठेवतो..
आपण त्याशिवाय कोठेही जाऊ शकत नाही.
सांगा काय आहे हे??
उत्तर :- पाऊल 

अशी कोणती गोष्ट आहे
जी फक्त जून मध्ये असते
आणि डिसेंबर मध्ये नसते.
उत्तर :- उन्हाळा 

हिरवे असते आणि लाख मोती असते
त्यात आणि असते शाल अंगावर सांगा तर काय.
उत्तर :- मक्याचे कणीस 

मी काळी आहे पण कोकिळ नाही,
लांब आहे पण काठी नाही,
दोरी नाही पण बांधली जाते
माझे नाव सांग.
उत्तर :- वेणी 

अशी कोणती गोष्ट आहे,
जी डोळ्यासमोर येताच डोळे बंद होते.
उत्तर :- प्रकाश 

Riddles In Marathi With Answers

वाचण्यात आणि लिहिण्यात
दोन्ही ठिकाणी असते माझे काम
मी नाही कागद मी नाही पेन
सांगा काय आहे माझं नाव?
उत्तर :- चश्मा 

उंच वाढतो मी रंग आहे हिरवा
तुम्ही फक्त जमिनीत थोडे पाणी मुरवा
प्रदूषण करतो मी कमी
निरोगी पर्यावरणाची देतो मी हमी
सांगा पाहू मी कोण..??
उत्तर :- झाड 

चार बोटे आणि एक अंगठा
तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही
सर्वजण बेजान म्हणतात मला
तरी नेहमी उपयोगी मी राही
सांगा पाहू मी कोण??
उत्तर :- हातमोजे 

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
शिवजयंती 2024 कोट्स | Shivjayanti Quotes In Marathi
शिवाजी महाराज शायरी | Shivaji Maharaj Shayari Marathi

डोकं चालवा मराठी कोडी व उत्तरे ( riddles in marathi with answers )

मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : मेणबत्ती किंवा पेन्सिल

लोक मला खाण्यासाठी विकत घेतात, पण ते मला कधीही खात नाहीत, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : प्लेट आणि चमचा

माझ्याकडे हृदय आहे, परंतु इतर अवयव नाहीत ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : पत्त्यांचा डेक

गोल आहे पण बॉल नाही, शेपटी आहे पण प्राणी नाही, सारी मुले माझी शेपटी धरून खेळतात, पण तरीसुद्धा मी रडत नाही, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : फुगा

चौकीवर बसली एक रानी, तिच्या डोक्यावर पाणी
उत्तर : मेणबत्ती

आपण जेवढे पुढे जातो तेवढे आपण पाठीमागे सोडत जातो?
उत्तर : पाऊल

रात्री जागतो, दिवसा झोपतो, नेहमी झाडाला उलट लटकलेला असतो, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : वटवाघूळ

प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे?
उत्तर : दिशा

Riddles In Marathi With Answers

एवढस कार्टं घर कसं राखतं?
उत्तर : कुलूप

इथेच आहे पण दिसत नाही?
उत्तर : वारा

पांढरे पातेल पिवळा भात?
उत्तर : अंडी

गावचे पाटील तुम्हाला राम राम
दाढीमिशी तुमची तांबूस खूप लांब लांब
उत्तर :- मक्याचे कणीस

हिरवा आहे परंतु पाने नाही
नक्कल करतो मी परंतु माकड नाही
ओळखा पाहू मी कोण
उत्तर :- पोपट

प्रत्येकाकडे असते मी
सगळे सोडून जातील
पण मी कधीच सोडून जाणार नाही
उत्तर :- सावली

वस्तू आहे मी अशी
छिद्रे असतानाही असतानाही
पाणी भरून मी घेते
उत्तर :- स्पंज

मी नेहमी तुमच्या पुढे असतो
तरीही तुम्ही मला पाहू शकत नाही
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- भविष्य

Riddles In Marathi With Answers

एक काळा घोडा त्यावर बसली पांढरी स्वारी
एक उतरवली आता दुसर्‍याची पाळी
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- तवा आणि पोळी

काळी मी आहे परंतु कोकिळा नाही
लांब मी आहे परंतु काठी नाही
थांब मी जाते परंतु दोरी मी नाही
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- वेणी

ना खातो मी अन्न
ना घेतो मी तुमच्याकडून पगार
तरीही देतो पहारा दिवस रात्र
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर :- कुलूप

सुरेश च्या वडिलांची चार मुले
रमेश निलेश गणेश चौथ्या चे नाव सांगा
उत्तर :- सुरेश

संपूर्ण पृथ्वीची करतो मि सैर
परंतु कधीही जमिनीवर ठेवत नाही पैर
दिवसा काढून झोपा
रात्रभर मी जागतो
सांगा पाहू मी कोण असतो
उत्तर :- चंद्र

Riddles In Marathi With Answers

मी गोष्ट कशी आहे जी
फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा गरमच राहणार
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- गरम मसाला

उंचावरून पडली एक घार
तिला केले मारून ठार
आतील मास खाऊ पटापट
गोड रक्त पिऊ गटागट
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर :- नारळ

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Positive Thinking Motivational Quotes (New 2023) Marathi
Motivational Quotes for Students ( New 2023 ) – Marathi
Life Challenges Quotes ( New 2023 ) – मराठी

एमपीएससी मराठी कोडी (mpsc riddles in marathi with answers)

तिखट मीठ मसाला, चार शिंगे कशाला?
उत्तर : लवंग

सुपभर लाह्या, त्यात एक रुपया?
उत्तर : चंद्र आणि चांदण्या

हिरवी पेटी काट्यात पडली, उघडून पाहिली तर मोत्याने भरली?
उत्तर : भेंडी

तीन पायांची तिपाई, त्यावर बसला शिपाई?
उत्तर : चूल आणि तवा

तिघे जण वाढायला बारा जण जेवायला?
उत्तर : घड्याळ

पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब?
उत्तर : कणीस

Riddles In Marathi With Answers

काळ्या रानात हत्ती मेला, त्याचा पृष्ठभाग उपसून नेला?
उत्तर : कापूस

अशी कोणती गोष्ट आहे जी गरीब लोक फेकून देतात आणि श्रीमंत लोक खिशात ठेवतात?
उत्तर : वाहणारे नाक

अशी कोणती गोष्ट आहे जी चोर चोरी करू शकत नाही?
उत्तर : ज्ञान

ती माय माउली जग तिच्यावर जगते, घामाचा ती वास घेते, मोत्याची ती रास देते?
उत्तर : जमीन

मी कधीही आजारी पडत नाही
तरीसुद्धा लोक मला गोळी देतात
उत्तर :- बंदूक

काळे बीज आणि पांढरी आहे जमीन
लावून ध्यान त्यात वहाल तुम्ही सज्ञान
उत्तर :- पुस्तक

सगळीकडे आहे उजेड आणि गाणी
मी तर आहे सणांची राणी
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- दिवाळी

दगड फोडता चांदी चकाकली
चांदीच्या आडात मिळाले पाणी
सगळे म्हणाले ही परमेश्वराचीच करणी
उत्तर :- नारळ

जगाच्या खबरी साठवून ठेवतो
खूप मोठे माझे पोट
म्हणूनच तर प्रत्येक सकाळी
आता सर्वजण माझी वाट
उत्तर :- वर्तमानपत्र

रस्ता आहे परंतु गाड्या नाहीत
घरे आहेत परंतु माणसे नाहीत
जंगल आहे पण तू प्राणी नाहीत
उत्तर :- नकाशा

पांढरे माझे पातेले
त्यात ठेवला पिवळा भात
ओळखेल मला जो कोणी
त्याच्या कमरेत घाला लाथ
उत्तर :- उकडलेले अंडे

अवतीभोवती आहे लाल रान
32 पिंपळाना फक्त एकच पान
उत्तर :- दात आणि जीभ

लाईट गेली माझी आठवण झाली
असो मी लहान किंवा मोठी
माझ्या डोळ्यातुन नेहमी गळते पाणी
उत्तर :- मेणबत्ती

Riddles In Marathi With Answers

गळा आहे मला पण डोकं नाही मला
खांदा आहे मला पण हात नाहीत मला
उत्तर :- शर्ट

एक सूप भरून लाह्या
त्यात फक्त एक रुपया
उत्तर :- चंद्र आणि चांदण्या

तीन पायांची एक तीपाले
बसला त्यावर एक शिपाई
उत्तर :- चूल आणि तवा

मजेशीर मराठी कोडी ( Funny Riddles In Marathi With Answers)

ऊन बघता मी येतो, सावली पाहता मी लाजतो,
वाऱ्याचे स्पर्श होताच मी नाहीसा होतो. सांगा मी कोण?
उत्तर : घाम

पाणी नाही, पाऊस नाही, रान हिरवेगार. कात नाही, चुना नाही, तोंड लाललाल.
उत्तर : पोपट

कोकणातून येतो, देश विदेशात जातो. मोठेही याला बघून होतात लहान, असा याचा महिमा महान. पिवळा, केशरी रंगाचा, हा तर आहे फळांचा राजा. ओळखा कोण?
उत्तर : आंबा

आकाशातून पडली घार, तिला केलं ठार. रक्त प्यायलं घटाघटा, मांस खाल्लं पटापट.
उत्तर : नारळ

दोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मांतरी…
उत्तर : डोळे

दोन पाय मोठे दोन पाय लहान शेतात राबतो ताकद महान
उत्तर : ट्रॅक्टर

Riddles In Marathi With Answers

आकाशातून पडली घार, तिला केलं ठार. रक्त प्यायलं घटाघटा, मांस खाल्लं पटापट.
उत्तर : नारळ

दोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मान्तरी
उत्तर : डोळे

इथेच आहे पण दिसत नाही
उत्तर : वारा

दोन पाय मोठे दोन पाय लहान शेतात राबतो ताकद महान
उत्तर : ट्रॅक्टर

संपूर्ण गावभर मी फिरते
तरीही मंदिरात जायला मी घाबरते
उत्तर :- चप्पल

दात असून सुद्धा मीच आवडत नाही
काळे शेतात गुंता झाल्यावर ती मी सोडती
उत्तर :- कंगवा

एक रूमाल वाढायला एक तास लागतो
तर दहा रुमाल वाढायला किती तास लागतील
उत्तर :- एक

Riddles In Marathi With Answers

एक लाल गाई
नुसती लाकूड खाई
जर पाणी पिले
तर मरून ति जाई
उत्तर :- आग

पाय नाहीत मला
चाके नाहीत मला
तरी मी खूप चालतो
काही खात नाही मी
फक्त रंगीत पाणी पितो
उत्तर :- पेन

आम्ही दोघे जुळे भाऊ
एकाच रंगाचे आणि एकच उंचीचे
सोबत असता खुप कामाचे
एक हरविता नाही काम दुसऱ्याचे
उत्तर :- चप्पल

ओळखा पाहू मी कोण (Who Am I Riddles In Marathi With Answers)

मी सगळ्यांना उलटे करतो
तरीही स्वःतला काहीच हलवू शकत नाही
उत्तर :- आरसा

तो वेडा नाही तरीही कागद फाडतो
तो पोलिस नाही तरीही तो खाकी घालतो
मंदिर नाही तरीही घंटा तो वाजवतो
सांगा पाहू मी कोण?
उत्तर :- वाहक {Conductor}

एक कपिला गाय
आहेत तिला लोंखडी पाय
राजा बोंबलत जातो
पण ती थांबत नाही
उत्तर :- रेल्वे

मातीविना उगवला कापूस लाख मन
पडला मुसळधार पाऊस तरीही भिजला नाही एकही कन
ओळखा पाहू मी कोण
उत्तर :- ढग

Riddles In Marathi With Answers

बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही
दोन तोंडे आहेत मला तरीही मी गांडूळ नाही
श्वास घेते मी पण तुम्ही नाही
ओळखा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर :- बासरी

अशा भाजीचे नाव सांगा ज्या भाजी मध्ये एका प्रसिद्ध शहराचे
नाव लपलेले आहे…
उत्तर : वांगी आणि शिमला

एका माणसाचे पाच अक्षरी नाव काय ? जे नाव उलटे आणि सरळ वाचले तर सारखेच येते.
उत्तर : नवजीवन

रात्री 3 ठिकाणी आग लागली आहे. 1- मंदिर 2- शाळा 3- दवाखाना सांगा सर्व प्रथम अँबुलन्स कोणती आग विझवेल?
उत्तर : अँबुलन्स आग विझवित नाही.

Riddles In Marathi With Answers

मी चालले राग राग,तु का ग माझ्या माग माग…
उत्तर : सावली

रामाच्या वडीलांना एकून चार मुले आहेत. पहिल्याचं नाव 25 पैसे. दुसऱ्याचं नाव 50 पैसे. चौथ्याचं नाव 100 पैसे. मग तिसऱ्याचं नाव काय असेल?
उत्तर : रामा

एवढं मोठं घर आणि त्याला एकच राखनदार…
उत्तर : कुलूप

तुमच्या आत्याच्या मुलीच्या मामाच्या मुलाचे वडिलांचे भाऊ तुमचे कोण?
उत्तर : काका

ती धावत पळत समुद्रातून येते आणि किनाऱ्यावर आल्यावर नाहीशी होते. ओळखा पाहू ती कोण ?
उत्तर : लाट

Riddles In Marathi With Answers

अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही, आणि शहर आहे पण पाणी नाही
उत्तर : नकाशा

अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवून चालतो पण स्त्रिया दाखवून चालतात?
उत्तर : पर्स

एकदा एक माणूस रस्त्याने जात होता
अचानक प्रचंड पाऊस पडण्यास सुरवात झाली
व संपूर्ण भिजून गेला
तरीही त्याच्या डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही
असे कसे झाले
उत्तर :- कारण तो माणूस टकला होता

Riddles In Marathi With Answers

एका कोंबड्याने एका घराच्या छतावर अंडे दिले
तर ते कोणत्या बाजूला पडेल
उत्तर :- कोंबडी कधी अंडी देत नसतो

अशी कोणती संपत्ती आहे
जी वाटल्याने वाढते
उत्तर :- ज्ञान

हजार येतात हजार जातात
हजार बसतात पारावर
हाका मारून जोरात
हजार घेतात उरावर
उत्तर :- बस किंवा रेल्वे

डोळा असून सुद्धा
मी पाहू शकत नाही
उत्तर :- सुई

लाल मी आहे पण तो रंग नाही
कृष्ण मी आहे पण देव मी नाही
आड आहे पण पाणी त्यात नाही
वाणी आहे पण दुकान माझं नाही
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- लालकृष्ण आडवाणी

मी आहे तरी कोण
तिच्या डोळ्यात बोटे टाकली की
माझं तोंड उघडते
उत्तर :- कात्री

तुम्ही जेवढे त्याच्या जवळ जाल,
तेवढा तो मोठा होत राहील..
सांगा पाहू कोण?
उत्तर :- डोंगर

आठवड्याच्या सात वारांचे व्यतिरिक्त
अजून तीन दिवसांची नावे सांगा
उत्तर :- काल, आज, उद्या

लई धाकड हा
तीन डोके आणि पाय दहा
उत्तर :- दोन बैल आणि एक शेतकरी

प्रश्न असा की उत्तर काय
उत्तर :- दिशा

हिरव्या पेटीत बंद मी
काट्यात मी पडलेली
उघडून पहा मला
मी आहे मोत्याने भरलेली
उत्तर :- भेंडी

नसते मला कधी इंजीन
नसते मला कसलेही इंधन
आपले पाय चालवा भरभर
तरच धावणार मी पटपट
सांगा मी आहे तरी कोण ?
उत्तर :- सायकल

Riddles In Marathi With Answers

नेहमीच असतो मी तुमच्या घरी
तरी काहींनाच मी आवडतो
एकावर एक कपडे मी घालतो
तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर :- कांदा

मी नेहमी तिथेच असतो
तुम्ही मला फक्त दिवसाच पाहू शकता
रात्री मी तुम्हाला दिसणारच नाही
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- सूर्य

उन्हाळ्यात माझ्या पासून दूर तुम्ही पळता
हिवाळ्यात माझ्या जवळ तुम्ही येता
माझ्यामुळेच आकाशात दिसतात तुम्हाला सात रंग
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- ऊन

अशी कोणती गोष्ट आहे तुमची
जी बाकीचे लोक तुमच्यापेक्षा जास्त वापरतात
उत्तर :- नाव

छोटेसे कार्टे
संपूर्ण घर राखते
उत्तर :- कुलूप

आम्ही जुळे भाऊ शेजाशेजारी
तरीही भेटत नाही जन्मोजन्मी
उत्तर :- डोळे

एक शेतकऱ्याकडे होते दोन बैल
एक मेला एक विकला
आता त्याच्याकडे किती बैल राहिले ?
उत्तर :- एक किंवा शून्य

प्रत्येकाच्या शरीराचा भाग मी आहे
तुम्ही मला डाव्या हाताने पकडू शकता
परंतु उजव्या हाताने नाही
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर :- उजवा कोपरा

बारा जण आहेत जेवायला
एक जण आहे वाढायला
ओळखा पाहू मी कोण
उत्तर :- घड्याळ

माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत
तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही
सांगा मी आहे कोण
उत्तर :- कीबोर्ड

कोणत्या महिन्यात
लोक सर्वात कमी झोपतात
उत्तर :- फेब्रुवारी

Riddles In Marathi With Answers

असे फळ कोणते
त्याच्या पोटात दात असतात
उत्तर :- डाळिंब

येथे एक फूल फुलले आहे,
येथे एक फूल फुलले आहे
आम्ही एक विचित्र आश्चर्य पाहिले,
पानांवर पाने.
उत्तर :- फुलकोबी

माणसासाठी कोणती गोष्ट हानिकारक आहे?
पण लोक अजूनही ते पितात.
उत्तर :- राग

दोन बोटांचा रस्ता..
त्यावर चाले रेल्वे..
लोकांसाठी आहे उपयोगाची..
काही सेकंदात आग लावते..
उत्तर :- माचीस काडी (मॅचस्टीक)

सर्वेशच्या वडिलांना 4 मुले आहेत
सुरेश
रमेश
गणेश
चौथ्याचे नाव सांगा?
उत्तर :- चौथेचे नाव सर्वेश आहे.

फळ नाही पण फळ म्हणतो,
मीठ आणि मिरपूड सह गोड
खाणार्‍याचे आरोग्य वाढते,
सीता मायेची आठवण करून द्देते.
उत्तर :- सीताफळ

अशी कोणती गोष्ट आहे,
जी आपण जागी असल्यावर वर जाते
आणि झोपी गेल्यावर खाली येते.
उत्तर :- डोळ्यांच्या पापण्या

बिना चुलही ची खीर बनवली..
गोड नाही नमकीन नाही..
थोडे थोडे खाल्याचे लोक खूप शौकीन.
उत्तर :- चुना

हा गौरव आहे मेजवानीत बनारसी
ही तिची ओळख वाढवते.
उत्तर :- पान

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Shivgarjana | शिवगर्जना (घोषवाक्य) मराठी
छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन शुभेच्छा | Sambhaji Maharaj Rajyabhishek
शिवजयंती 2024 (भाषण) | Shivjayanti Speech In Marathi

Riddles In Marathi With Answers

दिसत नाही पण घातलेले आहे हे दागिने..
हे स्त्रीचे रत्न आहे…
उत्तर :- लज्जा

अशी कोणती गोष्ट आहे
पती आपल्या पत्नीला देऊ शकतो?
परंतु पत्नी आपल्या पतीला देऊ शकत नाही.
उत्तर :- आडनाव (surname)

कोण आहे जो
आपली सर्व कामे
आपल्या नाकाने करतो
उत्तर :- हत्ती

दोन अक्षरात सामावले माझे नाव
मस्तक झाकणे आपले माझे काम
ओळखा पाहू मी आहे कोण
उत्तर :- टोपी

प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती
जी नेहमीच वाढत जाते कधीही कमी होत नाही
उत्तर :- वय

एक रहस्य बॉक्स पाहिला,
ज्याला नाही कव्हर
किंवा लॉक केलेला नाही..
खाली किंवा कोपरा बंद केलेला नाही,
त्यामध्ये चांदी आणि सोने आहे. कोण पाहू??
उत्तर :- अंडी

दोन गुहेचे आहेत दोन रक्षक
दोन्ही आहेत उंच आणि आहेत काळेभोर
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- मिशा

थंडीतही वितळणारी गोष्ट मी
सांगा तुम्ही माझे नाव काय
उत्तर :- मेणबत्ती

पंख नाहीत मला तरीही मी हवेत उडते
हात नसूनही मी तुमच्याशी भांडते
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- पतंग

Riddles In Marathi With Answers

मी आहे वस्तू सोन्याची
तरीही मला किंमत नाही सोन्याची
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- Bed

तीन अक्षरांचे माझे नाव
वाचा उलटे किंवा वाचा सरळ
मी आहे प्रवासाचे साधन
सांगा पाहू माझे नाव
उत्तर :- जहाज

अशी कोणती गोष्ट आहे
जी फाटल्यावर अजिबात आवाज येत नाही
उत्तर :- दूध

आपण कोणत्या प्रकारचा
टेबल खाऊ शकतो?
उत्तर :- व्हेजिटेबल

एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची संधी दिली जाते
परंतु त्यासाठी तीन पैकी एका खोलीतून जायचे असते
पहिल्या खोलीत भयानक आग असते
दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहेत
दुसऱ्या खोलीत एक्स सिंह आहे जो एका वर्षापासून भूकेला आहे
उत्तर :- तिसऱ्या खोलीतून एका वर्षापासून भुकेला सिंह जिवंत असणार नाही.

अशी कोणती गोष्ट आहे
जी सर्वात हलके असते
परंतु बलवान व्यक्ती तिला रोखू शकत नाही
उत्तर :- श्वास

भाऊराया माझा खूप शैतान
बस तू माझ्या नाकावर
पकडून माझे कान
सांगा आहे तरी मी कोण
उत्तर :- चष्मा

एका काळ्याकुट्ट राजाची
अद्भुत मी राणी
हळूहळू पिणार मी पाणी
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- दिवा

कोकणातून आली एक नार
आहे तिचा पदर हिरवागार
आहे तिचा कंबरेला पोर
सांगा मी आहे तरी कोण
उत्तर :- काजू

अशी गोष्ट जी तुम्ही गिळू शकता
किंवा ती तुम्हाला गिळू शकते
सांगा पाहू ती आहे कोणती
उत्तर :- अहंकार

कोकणातून आलेला एक रंगू कोळी
आणि त्याने एक भिंगु चोळी
शिंपी म्हणतोय मी शिव तरी कशी
धोबी म्हणतोय मी धुवू तरी कशी
राणी म्हणते मी घालू तरी कशी
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- कागद

एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला
तरीही त्याला काही जखम झाली नाही असे कसे
उत्तर :- तो पहिल्याच पायरीवर होता

कोकणातून आला एक भट
त्याला धर की आपट
सांगा मी आहे तरी कोण
उत्तर :- नारळ

हिरव्या घरात लपले एक लाल घर
लाल घरात आहेत खूप लहान मुले
ओळखा पाहू मी कोण
उत्तर :- कलिंगड

अशी कोणती गोष्ट आहेे,
जिचा रंग काळा आहे?
ती प्रकाशात दिसते…
पण अंधारात दिसू शकत नाही…
उत्तर: छाया (सावली)

कंबर बांधून घरात राहतो
काय आहे ते? मला सांगा?
उत्तर :- झाडू

कोणता तो चेहरा…
सकाळपासून संध्याकाळ पर्यंत..
आकाशाकडे पाहत राहतो हसत…
उत्तर :- सूर्यफूल

Riddles In Marathi With Answers

काळ्याभोर रानात एक हत्ती मेला
लोकांनी त्याचा पृष्ठभाग उपसून नेला
सांगा मी कोण
उत्तर :- कापूस

तुम्ही एका माकडा सोबत त्याच्या घरात गेलात
तिथे त्याचा संपूर्ण परिवार केळी खात होता
तर त्या घरातील सगळ्यात हुशार कोण
उत्तर :- तुम्ही

काट्याकुट्यांचा बांधला मोठा भारा
निघालास कुठे शेंबड्या पोरा
ओळखा पाहू मी कोण
उत्तर :- फणस

एक वानर एक खारुताई आणि एक पक्षी
नारळाच्या झाडावर जोराने धावत होते
तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील
उत्तर :- नारळाच्या झाडावर केळी नसतात

कोकणातून आली माझी सखी
तिच्या मानेवर दिली मी बुक्की
तिच्या घरभर पसरल्या लेकी
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- लसुन

चार बोटे आणि एक अंगठा
तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही
सर्वजण बेजार म्हणतात मला
तरी नेहमी उपयोगी मी राही
सांगा पाहू मी कोण
उत्तर :- हातमोजे

गोष्ट आहे मी अशी
मला घेता तुम्ही खाण्यासाठी
मात्र मला तुम्ही खात नाही
सांगा पाहू मी कोण ?
उत्तर :- ताट

Riddles In Marathi With Answers

जर आपल्याला तहान लागली असेल,
तर ते आपण पिऊ शकतो..
जर आपल्याला भूक लागली असेल,
तर आपण ते खाऊ सुद्धा शकतो..
आणि थंडी वाजत असेल,
तर आपण त्याला जाळू सुद्धा शकतो
सांगा ते काय आहे?
उत्तर :- नारळ

दिवसा झोप काढुनी मी
फिरतो बाहेर रात्रीला मी
आहे असा प्रवासी मी
पाठीला दिवा बांधून मी
कोण आहे मी ?
उत्तर :- काजवा

बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले
तुला तहान लागली तर ती खा
तुला भूक लागली तर ती खा
तुला थंडी वाजली तर ती जाळ
ओळखा पाहू ती वस्तू कोणती
उत्तर :- नारळ

पाच अक्षराचा एक पदार्थ
पहिल्या तीन अक्षराचे होते फुलाचे नाव
पाचवे आणि चौथे अक्षराचा अर्थ मौज
पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर
सांगा पाहू मी कोण?
उत्तर :- गुलाबजाम

एका माणसाला बारा मुले
काही छोटी काही मोठी
काही तापट तर काही थंड
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर :- वर्ष

सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात
ना असे काना नावात
ना असे मात्रा नावात
ना असे नी वेलांटी नावात
नांव सांगा त्याचे ?
उत्तर :- अहमदनगर

नाव एका माणसाचे चार अक्षरी!!
पहिले दुसरे अक्षर मिळून त्याच्या बायकोचे नाव
दुसरे तिसरे अक्षर मिळून त्याच्या मुलीचे नाव
तिसरे चौथे अक्षर मिळून त्याच्या मुलाचे नाव
चारही अक्षर मिळून त्याचे नाव
ओळखा पाहू ते नाव काय..??
उत्तर :- सिताराम

मुकुट माझ्या डोक्यावर आहे
जांभळा झगा माझ्या अंगावर आहे
आहेत मला काटे जरा सांभाळून
चविष्ट आहे मी खातात मला भाजून
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर :- वांगे

चार खंडाचा आहे एक शहर
चार आड विना पाण्याचे
18 चोर आहेत त्या शहरात
एक राणी आणि एक शिपाई
मारून सर्वांना त्या आडात टाकी
ओळख पाहू मी कोण
उत्तर :- कॅरम

Leave a Comment