Shetkari Quotes In Marathi

50+ Shetkari Quotes In Marathi | शेतकरी कोटस

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी कोट्स, वैशिष्ट्यपूर्ण

Shetkari Quotes In Marathi, Shetkari Shayari In Marathi : शेतकरी दिन, जो २३ डिसेंबर रोजी साजरा केला जातो, हा दिवस भारतातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रम आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी महत्वपूर्ण आहे.

Shetkari Quotes In Marathi | शेतकरी कोटस

शेतकर्यांच्या फायद्याचे काम करा,
शेतकर्यांचे आयुष्य चांगले बनवा.

शेतकरी आहे अन्नदाता,
तोच आहे देशाचा भाग्यविधाता.

देशाची प्रगती आहे तो पर्यंत अपूर्ण,
जो पर्यंत शेतकऱ्यांचा विकास होत नाही पूर्ण.

प्रामाणिकपणा व कठोर परिश्रम ज्याची शान आहे
तो माझ्या देशाचा शेतकरी आहे.

शेतकरी पूर्ण होईल तेव्हा देशाचा विकास होईल.

जय जवान जय किसान

शेतकऱ्याचा करू या सन्मान,
यातच आहे देशाता अभिमान

बळकट असता शेतकरी,
होईल उन्नती घरोघरी

साधी राहणी मजबूत बांधा, तोच आहे शेतकरी राजा

हरित क्रांती पुन्हा येईल,
देश क्रमांक 1 वर येईल.

शेतक-यांना मदत करा,
देशाच्या विकासाची गती वाढवा.

शेतकर्यांचा विकास,
देशाच्या विकास.

यशस्वी शेतकरी,
प्रगत शेतकरी.

करूनी सर्व संकटावरी मात,
शेतकरी राबतो दिवसरात

Shetkari Status In Marathi

इडा पिडा टळू दे,
बळीराजाचे राज्य येऊ दे.

काळी माती त्याची शान,
राबतो तिच्यात विसरूनी भान.

ज्याचे कष्ट दमदार असते त्यांचे जगणे
आणि वागणे रूबाबातच असते…
शेतकरी

नको लावूस फास गळा बळीराजा,
तूच आहेस या देशाचा पोशिंदा.

बळीराजा तू घेऊ नको फाशी,
जग राहील तुझ्याविण उपाशी.

बळीराजा माझा लय इमानी,
कष्टाने पिकवितो पीकपाणी.

रात दिस मेहनत करी,
खाई कष्टाची भाकरी,
पोसतो ही दुनिया सारी,
माझा बाप शेतकरी.

पैशाला कधीच किंमत नसते,
खरी किंमत तर पैसे मिळवताना केलेल्या कष्टालाच असते…
शेतकरी.

कष्टाच्या पैशावर माज करण्यात
जी मजा आहे ती हरामीच्या पैशांवर नाही…
शेतकरी

कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप लागणार नाही,
विचार करा…
शेतकऱ्याचं काय होत असेल.

जोडूनी काळ्या मातीशी नाळ,
शेतकरी कष्टाने करतो काळावर मात

करूनी कष्ट गाळुनी घाम,
असा आहे आपला शेतकरी महान

समृद्ध शेतकरी,
सुखी शेतकरी

गाऊ आपण निसर्गाची गाणी,
पुसून टाकू शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी

जमिनीवर एकच तारा,
शेतकरी आमचा न्यारा

Shetkari Shayari In Marathi

म्हटलं आत त्याच्याबद्दल लिहावं काहीतरी,
जो करचो रात्रंदिवस शेतमाऊलीची वारी,
पण नंतर लक्षात आलं खूप मोठी आहे शेतकऱ्याची कथा,
सांगायला बसलो कर संपणार नाही गाथा

शेतकऱ्यांच्या अडचणी तोपर्यंत कुणालाच दिसत नाहीत,
जोपर्यंत तो लोकांच्या समोर विद्रोह करत नाही

कितीही गरीब असला तरी शेतकरी अमाप देतो,
इतके झुकते मात सांगा कुणाचा बाप देतो!

भावनेसोबत त्याच्या बघा ना काय थट्टा झाली…
सोयाबीन विकताना दलाली झाली,
पोटाला जगताना मात्र त्याच सोयाबीन तेलाची किंमत दुप्पट झाली!

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Shetkari Instagram Bio Marathi | शेतकरी इंस्टाग्राम बायो
Krushi Din Quotes In Marathi | महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्या
Bail Pola Nibandh Marathi – बैल पोळा निबंध

येतो अवकाळी पाऊस,
नेतो शेतीला वाहून,
कधी कधी तर आकाशातून थेंबही पडत नाही,
शेतकरी थकतो वाट पाहून…

असा कसा रे तू अवकाळी गारांसह बरसतो,
आम्हा शेतकऱ्यांचे छोटेसे स्वप्न धुळीला मिळवतो

पूजा करतो मी जमीनीची,
पुरखाची संपत्ती काळी माती,
बिज पेरल्यावर उगवतं सोनं,
धान्य भरघोस देते काळी धरणी!

मातीमधून सोनं पिकवतो,
निळ्या आभाळाखाली रान,
वीतभर जमीन माझी मजला देते शेतकऱ्याचा बहुमान.

शेताच्या बांधावर बसून
शेतीची कामं होत नाहीत आणि
शेतकऱ्याच्या जन्माला आल्याशिवाय
त्याची दुःखे कळत नाहीत!

निसर्गाने दिली साथ तर पुन्हा येईल
माझ्या बळीराजाचं राज्य,
तुमच्या माझ्या मनातील
आपले हक्काचे अधिराज्य

Farmer Quotes In Marathi

करूनी आपल्या रक्ताचे पाणी,
शेत पिकवी कष्टकरी

अन्नधान्य पिकवेल शेतकरी
तर देशात नांदेल सुखसमृद्धी

शेतकरी आहे अन्नदाता,
तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता

शेतकरी टिकेल
तर शेत पिकेल

अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो,
पण लॉकडाऊनमुळे समजलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो.

देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की,
माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल?
म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला

खाऊन भाकर पिऊन पाणी,
कष्ट करी शेतकरी

वावर आहे तर पावर आहे

जन जनात संदेश पोहतवूया,
बळीराजाला आत्महत्येपासून रोखूया

कष्टाची खाऊनी भाजीभाकरी,
आनंदाने गाणी गातो शेतकरी

ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल,
त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल

जो पाण्याने अंघोळ करतो,
तो फक्त पोशाख बदलू शकतो,
पण जो घामाने अंघोळ करतो,
तो इतिहास बदलू शकतो… शेतकरी

जगाला आता समजेल की पैसा कितीही असला तरी
खायला अन्नधान्य लागतं,
तोच शेतकरी आता घरी निवांत झोपतोय
आणि बाकीच्या लोकांची सध्या झोपच उडालीय.

Shetkari Caption In Marathi

कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा,
मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा,
शेतात राबतो आपला सर्जा राजा.

शेतकरी असता सक्षम,
शेत पिकेल भक्कम.

स्वतःचं घर गळत असूनही पावसाची अपेक्षा करत असतो तो फक्त शेतकरी

मी तर शेतकरी आहे, क्षणभर थांबेन,
पावसाची रिमझिम होताच मी उठून पु्न्हा कामाला लागेन.

पॉपर्टी नव्हे जीव गहाण ठेवून केला
जाणारा व्यवसाय म्हणजे शेती

पगारवाढ होऊनही लोक नाराज दिसतात,
शेतकरी नुसतं आभाळ भरून आलं तरी खुश असतो

Leave a Comment