Bail Pola Nibandh Marathi – बैल पोळा निबंध
Bail Pola Nibandh Marathi – बैल पोळा निबंध : पोळ्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्या बैलाची पूजा केली जाते.
आजच्या या लेखात आपण Bail Pola Nibandh Marathi – बैल पोळा निबंध मराठी पाहणार आहोत. हा Bail Pola Nibandh Marathi आपले ज्ञान तर वाढवेलच परंतु आपणास शाळा कॉलेज मध्ये देखील फार उपयोगी ठरेल.
बैल पोळा निबंध – Bail Pola Nibandh Marathi
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
महाराष्ट्रातील लोक पिठोरी अमावस्या ला बैलपोळ्याच्या उत्सव साजरा करतात. हा सण छत्तीसगडमध्ये देखील प्रसिद्ध आहे. या दिवशी पशुधनाची पूजा केली जाते. एकीकडे जिथे बैलांची पूजा केली जाते तर दुसरीकडे स्वादिष्ट व्यंजन बनवून त्यांचा आस्वाद घेतला जातो. यासोबतच या दिवशी बैलांना सजवण्याची प्रतियोगिता देखील आयोजित केली जाते.
पोळा सणाची शहरापासून तर गावापर्यंत धूम असते. परंतु या सणाचे विशेष आकर्षण गावांमध्येच पहावयास मिळते. गावातील शेतकरी सकाळपासूनच बैलपोळ्याच्या तयारीला सुरुवात करून देता. सकाळी लवकर उठून बैलांना आंघोळ घातली जाते यानंतर त्यांना सजवून त्यांची पूजा केली जाते. घरातील स्त्रिया स्वादिष्ट व्यंजन, पुरणपोळी व शिरा बनवतात. या दिवशी बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. च्या घरात बैलजोडी नसते ते लोक माती व लाकडाचे बैल देखील पूजतात.
बैलपोळ्याचा सण शेतीवर आधारित सण आहे. हा सण आपल्या बैलांचे व शेती तसेच शेतकऱ्याच्या कामी येणार्या प्राण्यांची महत्त्व सांगतो. निसर्ग, मनुष्य आणि सर्व प्राणिमात्रांमध्ये देव आहे व यांची पूजा हीच देवाची पूजा होय, याची जाणीव हा सण आपणास करवून देतो.
बैल पोळा निबंध – Essay on bail pola in Marathi
श्रावण महिन्याची सुरुवात होताच अनेक सण उत्सवांची रेलचेल सुरू होते. पावसाचे दिवस असल्याने सृष्टीचे सौदर्यही खुलून दिसते. अश्या या श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांनंतर सरत्या श्रावणात येतो बैल पोळ्याचा सण. संपूर्ण महाराष्ट्रात आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार हा सण. शेतकरी बांधवांसाठी पोळा सणाचे महत्व खूप आहे.
बैलपोळ्याचा दिवस शेतकऱ्यांची बैलांविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय. वर्षभर शेतात कष्ट करून राबणाऱ्या आणि शेतकऱ्याचा खांद्याला खांदा लावून शेतीत मदत करणाऱ्या बैलाला या दिवशी पुजले जाते. बैलपोळ्याच्या दिवशी सर्वात आधी शेतकरी भल्या पहाटे उठून बैलांच्या गळा आणि नाकातील दोर काढतात. यानंतर त्यांना आंघोळ घालून तयार केले जाते. जर जवळपास नदी अथवा तलाव असेल तर त्या ठिकाणी अंघोळीसाठी नेले जाते. अंघोळ घातल्यानंतर शेतकरी लोक आपल्या बैलांना छान सजवतात. त्यांच्या शिंगांना रंग लावून अंगावर झुल घातली जाते.
यादिवशी बैलांना पुरणपोळी चे जेवण असते. काही ठिकाणी बाजरी ची खिचडी सुद्धा बैलांना खाऊ घातली जाते. यादिवशी सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असते. सायंकाळच्या वेळी गावातील सर्व लोक आपापल्या बैलांना घेऊन गावाच्या मोकळ्या चौकात जमतात. बैलपोळ्याच्या दिवस शेतकरी आणि शेतात काम करणारे बैल व इतर सर्व प्राण्यांच्या विश्रांतीचा दिवस असतो. म्हणून या दिवशी कोणतेही काम केले जात नाही. यानंतर संध्याकाळच्या वेळी घरातील महिला आपापल्या बैलाची आरती ओवाळून पूजा करतात. ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली जाते.
भारतीय संस्कृती मनुष्या सोबतच निसर्ग आणि प्राणीमात्रांची देखील पूजा करायला शिकवते. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये बैलपोळ्याची एक प्राचीन कथा देखील पहावयास मिळते. या कथेनुसार एकदा भगवान शंकर आणि देवी पार्वती सारीपाठ चा खेळ खेळत असतात. त्यावेळी देवी पार्वतीने खेळाचा डाव जिंकला परंतु भगवान शंकर म्हणाले की हा खेळ मी जिंकला. या विषयावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या खेळाचा साक्षी म्हणून समोर भगवान शंकराचा नंदी बसलेला होता. त्यावेळी शंकरांनी नंदी ला विचारले की तू सांग डाव कोणी जिंकला. नंदिने शंकराची बाजू घेत त्यांनी जिंकला म्हणून सांगितले. त्यावेळी देवी पार्वतीने रागात येऊन नंदीला शाप दिला की पृथ्वीलोकावर तुझ्या मानेवर जू बसवण्यात येईल व तुला खूप कष्ट करावे लागेल.
हा श्राप ऐकून नंदीला त्याची चूक लक्षात आली व त्याने देवी पार्वतीची क्षमा मागितली. यानंतर देवी पार्वतीने त्याला माफ करीत एक वरदान दिले की जरी तुला कष्ट करावे लागत असले तरी वर्षातून एक दिवस तुझ्यासाठी आनंदाचा राहील. या दिवशी तुझी देवा प्रमाणे पूजा केली व तुला छान छान भोजन खाऊ घालण्यात येईल आणि हाच तो बैलपोळ्याच्या दिवस तेव्हापासून पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा केली जाते.
FAQ
बैल पोळा 2023 मध्ये केव्हा आहे?
उत्तर: 14 सप्टेंबर, गुरुवार 2023
बैल पोळा हा सण का साजरा केला जातो?
उत्तर: बैलांप्रती कृतज्ञता आणि सन्मान निर्माण व्हावा
बैल पोळा केव्हा मानवीला जातो?
उत्तर: श्रावण माहित्यात पिंडोरी अमावसेला बैल पोळा हा सण येतो
आम्ही आशा करतो की बैल पोळा विषयी निबंध शोधणाऱ्या प्रत्येकासाठी ही माहिती उपयुक्त ठरली असेल आणि Bail Pola Nibandh Marathi ने आपल्या ज्ञानात नक्कीच वृद्धी केली असेल.
Bail Pola Nibandh Marathi, Bail Pola Easy Nibandh In Marathi