Shivgarjana In Marathi | शिवगर्जना (घोषवाक्य) मराठी : तर आपण अनेक ठिकाणी पाहिले असेल, ऐकले असेल की शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी एक खास घोषणा किंवा ललकारी दिली जाते. हिला शिवगर्जना असे म्हणतात. या शिवगर्जनेमध्ये शिवरायांसाठी अनेक बिरुदे वापरलेली आहेत.
Shivgarjana | शिवगर्जना (घोषवाक्य)
आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम…
महाराssssज..
गडपती, गजअश्वपती, भुपती, प्रजापती..
सुवर्णरत्नश्री पती..
अष्टवधान जागृत, अष्टप्रधान दैष्टीत
न्यायालंकार मंडीत, शस्रास्रशास्र पारंगत
राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज…
राजा शिव छत्रपती महाराजांचा
विजय असो

छत्रपती शिवाजी महाराज गारद आणि त्याचा सविस्तर अर्थ
गडपती – गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असा राजा.
गजअश्वपती – ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होते असे म्हणता येईल)
भूपती प्रजापती – वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे आणि पालन हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.
सुवर्णरत्नश्रीपती – राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवराय हे ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती होते)
अष्टावधानजागृत – आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.
अष्टप्रधानवेष्टीत – ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज. शिवरायांनी राज्य हाकण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते.
न्यायालंकारमंडीत – कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या बाजुने व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत – सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज. महाराज शस्त्राविद्या पारंगत होतेच त्याबरोबर राजांनी शास्त्र सुद्धा पारंगत केले होते.
राजनितीधुरंधर – आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज. खऱ्या अर्थाने महाराज राजनीनीधुरंदर होतेच, गनिमी कावा वापरून शत्रूला ठरवण्यात महाराज पटाईत होते.
प्रौढप्रतापपुरंदर – मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज. महाराजांनी अनेक लढाया जिंकत स्वराज्य प्रस्थापित केले होते.
क्षत्रियकुलावतंस – क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.
सिंहासनाधिश्वर – जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज. राजांनी राज्याभिषेक साठी ३२ मण सिंहासन बनवून घेतले होते.
महाराजाधिराज – विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.
राजाशिवछत्रपती – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.
Shivgarjana in Marathi Lyrics
इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है|
इन्द्र जिमि जृंभ पर …पवन बारि बाह पर, संभु रति नाह परज्यों साहस बाह पर राम ध्वज राज है|
इन्द्र जिमि जृंभ पर …दावा दृम दण्ड पर, चीता मृग झुण्ड पर भूषण वितुण्ड पर जैसे मृग राज है|
इन्द्र जिमि जृंभ पर …तेज तम अंस पर, कान्हा जिमि कंस पर त्यों म्लेच्छ बंस पर सेर सिवराज है
इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है|
सुसंस्कारी, युद्धशास्त्रात निपुण, उत्तम राजकारणी, न्यायशास्त्र पारंगत, प्रजाहितदक्ष राज्यकारभारी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत. जवळजवळ साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरीच्या बंधनातून प्रजेची मुक्तता करून, हिंदवी स्वराज्यात सुख आणि शांतीने जगण्याचा अधिकार देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी गडावर झाला. आई जिजाबाई यांच्या पदराखाली वाढलेल्या महाराजांना संस्कारांचे, अध्यात्माचे, शिक्षणाचे बाळकडू घरीच मिळाले होते. (Shivgarjana in Marathi)
दादोजी कोंडदेव यांच्या हाताखाली ते सर्व प्रकारच्या युद्धशास्त्रात पारंगत झाले. लहानपणापासूनच त्यांना धर्म, संस्कृती आणि राजकारण याबाबत योग्य ते शिक्षण मिळत गेले. स्वराज्याची संकल्पना शिवरायांनीच प्रथम मांडली. मित्रांची एक फौज तयार करून त्यांनी अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा गड जिंकला व तिथेच अखंड स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे त्यांनी प्रचंड धाडस, आत्मविश्वास, प्रसंगावधान, गनिमी काव्याच्या जोरावर 300 हून अधिक किल्ले जिंकले.
शत्रूचा बीमोड करण्यासोबतच त्यांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. स्वराज्याचा विस्तार होत होता. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. महाराजांच्या राज्यात प्रजेला न्याय मिळू लागला व अपराध्यांना शासन होऊ लागले. पुढे 1774 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला व ते मराठा साम्राज्याचे शासक बनले.