Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह १

Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह १

💘 आवडत मला पावसात चिम्ब चिम्ब भिजण.
अनुभवते मी बीजा च अन्कुरन्यासाठी रुजन.

💘 कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.

💘 तुझे काय ते तुला माहित
प्रेम माझे खरे होते
तुला ओळखता नाही आले
मी तर सर्वस्व तुला वाहिले होते

💘 दिवसागन श्वास नविन
श्वासागन भास नविन
पण तुझ होकारानेच सुरु होइल
माझ्या आयुष्याचा प्रवास नविन !!!

💘 मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

💘 मनातले सारे तिला सांगण्याचे
मी नेहमीच ठरवत होतो
समोर ति आल्यावर मात्र
नेहमीच मी घाबरलो होतो

💘 माझ्या ओठावरचं हसु,
आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन,
क्षणभर जगाला विसरल्याचं

💘 आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो

💘 ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.

💘 कुठेतरी कधीतरी तुला
डोळे भरून पाहावंसं वाटत.
पापण्या मिटता मिटता
डोळ्यातला पाणी टचकन खाली येत .

💘 तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि,
♥ प्रत्येक मुलीमध्ये मला
तिचाच चेहरा दिसतो

💘 तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.

💘 मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून

💘 “मला विसरण्याची
तुझी सवय जुनी आहे …..
तुझ्या आठवणीत माझी
रात्र सुनी आहे !!!!”

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

💘 “या सौद्यातील नफा तोटा नाहीच
तसा लपण्यासारखा …..
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा !!!!”

💘 अंतर ठेवून ही बरोबरी राखता येते
दूर राहून ही प्रेमाची गोडी चाखता येते.

💘 अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले….
💘 मग क्षण भर मी पाहतच राहिलो…
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले..

💘 अज़ून तरी मी तुला
कधी निरुत्तर केले नाही….
तरीपण माझ्या प्रश्नाना
तू कधि उत्तर दिले नाही….

💘 अजुन तरी काहीच नव्हते
तुझे माझे म्हणण्या जोगे
सर्व काही आपले होते
एकत्र प्रेम करण्या जोगे

💘 अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस

Leave a Comment