Maharashtra Din Status

महाराष्ट्र दिन स्टेटस | 1 May Maharashtra Din Status In Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी स्टेटस

महाराष्ट्र दिन स्टेटस | 1 May Maharashtra Din Status In Marathi : Maharashtra Din Wishes, Maharashtra Din Shubhechha, Maharashtra Din Quotes

Maharashtra Din Status
Maharashtra Din Status

१ मे १९६० चा दिवस म्हणजे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात “महाराष्ट्र दिन” (Maharashtra Din) म्हणून साजरा केला जातो. तसेच कामगारांच्या संघर्षाचं आणि एकतेचं प्रतिक म्हणून संपूर्ण जगामध्ये 1 मे हा दिवस आंतराष्ट्रीय कामगार दिन (International Labour Day) म्हणून देखील साजरा केला जातो. मित्रांनो जर का तुम्ही Happy Maharashtra Din Status In Marathi च्या शोधात असाल तर आजच्या या लेखामध्ये आम्ही 1 मे महाराष्ट्र दिन शुभेच्छांसह संग्रहित केलेले आहेत.

महाराष्ट्र दिन स्टेटस | 1 May Maharashtra Din Status In Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र…
माझ्या राजाचा महाराष्ट्र…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कपाळी लावूनी केशरी टिळा
नमन करितो तुला महाराष्ट्र देशा
जय महाराष्ट्र

बाप महाराष्ट्राचा,
महाराष्ट्राची माय,
रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी सांडलं रक्त,
त्याच मातीतून निर्माण झालेले मराठी भाषेचे सारे भक्त

Maharashtra Din Status

शिव निष्ठा येथ असे सतत जागती…
अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!

पैठणचे प्रेम अमित देश कोकणा…
पंढरीस ये विदर्भ देवदर्शना…
अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सव
उत्सव महाराष्ट्राचा, उत्सव माझ्या माय मराठीचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद…
महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाचे शुभेच्या संदेश | Maharashtra Din Wishes

माझे कर्म महाराष्ट्र
माझा धर्म महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

मराठा तितुका मेळवावा…
महाराष्ट्र अखंड राखावा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

इतिहास लिहीणं सोपं आहे
पण आमच्या राजांनी इतिहास घडवला
महाराष्ट्र घडवला आम्हाला घडवलं
पवित्र देशा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीयन असण्याचा,
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

नतमस्तक झालो ज्या वीरांपुढे
ज्यांनी रचली शौर्याची गाथा
जाणता होता आमचा राजा
अशा महाराष्ट्र देशा
तुझ्या भूमीला माझं वंदन
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राची यशोगाथा,
महाराष्ट्राची शौर्यगाथा,
पवित्र माती लावू कपाळी
धरणी मातेच्या चरणी माथा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
सावित्रीबाई फुले भाषण | Savitribai Phule Speech In Marathi
सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्या | Savitribai Phule Quotes In Marathi
सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती | Savitribai Phule Information In Marathi

माझ्या राष्ट्राच्या मातीला सुंगध आहे मराठी माणसांचा,
नेहमीच अग्रेसर राहील महाराष्ट्र माझा

धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र,
टाकावा ओवाळून जीव असा माझा महाराष्ट्र

इतरांना पडला असेल विसर
पण या सोनेरी दिवसासाठी
जे झाले हुतात्मा त्यांचं ही होऊ दे स्मरण
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कृतज्ञता राष्ट्राची,
कृतज्ञता इथल्या मातीची…
माझ्या महाराष्ट्राची…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Din Quotes In Marathi

ज्ञानाच्या देशा,
प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा…
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

महाराष्ट्राची गावी स्तुती दररोज पोटभरून…
महाराष्ट्राने ठेवलं आहे आपल्या सर्वांना धरून
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

राकट देशा,
कणखर देशा,
दगडांच्या देशा,
नाजुक देशा,
कोमल देशा,
फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

जय महाराष्ट्र जय मराठी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

दगड झालो तर सह्याद्रीचा होईन
माती झालो कर महाराष्ट्राची होईन…
तलवार झालो तर भवानी मातेची होईन
आणि
पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्रात माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान आहे.
माझ्या माय मराठीचा मला अभिमान आहे.
इथली संस्कृती तिचाही मला अभिमान आहे.
महाराष्ट्र दिन 2024 च्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.

महाराष्ट्र चिरायू होवो…
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे.
राज्य जे सर्वांसाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे.
जय महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या
प्रत्येकाला मानाचा मुजरा
अखंड महाराष्ट्राच्या सर्व जनांना
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अभिमानाने भरलेली छाती, सळसळणारं रक्त
रोमारोमात आहे भगव्या झेंड्याचा स्वाभिमान
जय शिवाजी जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

एकत्र आलो तर मजबूत
वेगळे राहिलो तर कमजोर
एकत्र राहू आणि उंच जाऊ
जय महाराष्ट्र

मर्द मराठ्यांचा हा मुलुख
शांतता, आनंद आणि अभिमान असलेल्या
महाराष्ट्राचा अभिमान आहे मला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मोजन्मी होईन महाराष्ट्रीन,
हे मातृभूमी तुझा मी सदैव मान राखीन,
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

१ मे कामगार दिनासाठी शुभेच्छा संदेश

१ मे हा दिवस आंतरराष्टीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. यासाठी कामगार दिनासाठी शुभेच्छा संदेश

सर्व कामगार बंधू आणि भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

काम असे करा की लोकांना म्हणायला हवं
काम करावं तर यानेच…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कामगार कल्याणाचे राखू धोरण,
करू या महाराष्ट्राचे निर्माण…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस हक्काचा…
दिवस कामगारांचा…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कष्टाची भाकर मिळते कामातून,
काम करा आणि मोठे व्हा…
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

काम करा हो काम करा कामावरती प्रेम करा…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

एकजुटीने काम करू कामावरती प्रेम करू कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व कष्टकरी, श्रमिकांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment