घटस्थापना संपूर्ण माहिती | Ghatsthapna Information In Marathi
घटस्थापना संपूर्ण माहिती | Ghatsthapna Information In Marathi : आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण, उत्सव मोठया उत्साहात, आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच नवरात्र हा देवीचा उत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यावर, पितृ पंधरवड्यानंतर, आपण सर्वजण नवरात्रीच्या आतुरतेने या उत्सवाची वाट बघतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. या नवरात्रीला शारदीय नवरात्र या नावाने देखील ओळखले जाते. (Ghatsthapna Information In Marathi) यावर्षी या उत्सवाची घटस्थापना १५ ऑक्टोबर, रविवार या दिवशी होत आहे. या सणाची माहिती, पूजाविधी आणि महत्व आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
आपल्या भारत देशात अनेक सण साजरे केले जातात, त्यापैकीच एक महत्वाचा सण म्हणजे नवरात्र. हा सण भारतातील विविध भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. सार्वजनिक मंडळे घटस्थापना या दिवशी देवीच्या मूर्तीची स्थापना करतात. तसे पाहायला गेले, (Ghatsthapna Information In Marathi) तर हिंदू दिनदर्शिकेनुसार, नवरात्रीचा सण वर्षातून चार वेळा म्हणजेच शरद , चैत्र, माघ आणि आषाढ या महिन्यात साजरा केला जातो. शरद आणि चैत्र महिन्यात येणारी नवरात्री दुर्गा देवीच्या भक्तांसाठी विशेष आहे, तर माघ आणि आषाढ महिन्यात येणारी नवरात्री ला गुप्त नवरात्री म्हणतात. शरद नवरात्री आणि चैत्र नवरात्री हि ९ दिवसांपर्यंत ची नवरात्री असते.
घटस्थापना माहिती
पहिल्या दिवशी देवीची स्थापना करून नवरात्रीतील नऊ दिवस सर्वजण मोठ्या श्रद्धेने देवीची पूजा करतात. सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी देखील देवीची स्थापना करून अखंड नऊ दिवस देवीआईची मनोभावे सेवा पूजा, आरती केली जाते. मंडळाकडून भजन, कीर्तन तसेच अनेक देखाव्यांचे आयोजन (Ghatsthapna Information In Marathi) केले जाते. ते बघायला लोक एकत्रित येतात. बरेच लोक नऊ दिवस उपवास करून देवीचे व्रत पूर्ण करतात. नवरात्रीचे नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात.
या नऊ दिवसात एक आगळा वेगळा उत्साह असतो. घटस्थापना करताना देवीसमोर घट स्थापना केला जातो.एका परडीमध्ये काळी माती ठेऊन या मातीमध्ये नऊ धान्य पेरतात. त्यावर रोज थोडे थोडे पानी शिंपडून न्यू दिवसंपर्यंत त्यावर छोटी रोपे तयार होतात. त्यावर पाण्याने भरलेला एक घट ठेवतात. (Ghatsthapna Information In Marathi) या घटात आंब्याची पाने ठेवतात. त्यावर नारळ ठेवला जातो. देवीचे टाक ठेवतात. त्याच्यापुढे ५ फळे ठेवतात. या घाटाला झेंडूच्या फुलांची माळ घालतात.
नवरात्रीमध्ये सर्वत्र सजावट पाहायला मिळते. मोठे-मोठे मंडप बघायला मिळतात. विविध सार्वजनिक मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हल्ली तर शहरांप्रमाणे स्त्रिया, पुरुष तसेच लहान मुलं दांडिया, गरबा खेळताना दिसतात. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात. या नऊ दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. कलकत्ता, गुजरात, बिहार, आसाम मध्ये या सणाला वेगळेच महत्व आहे. तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गापूजेचे आयोजन केले जाते. देवीने राक्षस महिषासुराचा वध केला म्हणून देवीला महिषासुरमर्दिनी (Ghatsthapna Information In Marathi) असे सुद्धा म्हटले जाते. दहाव्या दिवशी देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते या दिवसाला दसरा असेही म्हणतात. हा सण एकमेकांना जवळ आणतो. वाईट गोष्टीवर मात करून नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा हा सण आपल्या सगळ्यांनाच आवडतो.
घटस्थापना कशी करतात?
घटस्थापना करण्यासाठी एक बांबूच्या काड्या पासून बनवलेल्या टोपलीमध्ये माती भरली जाते. या मातीमध्ये पाच किंवा नऊ प्रकारचे धान्य टाकतात. त्यावर रोज थोडे थोडे पाणी शिंपडून शेवटी त्याची रोपे तयार झालेली दिसून येतात. माती टोपलीत व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर यामध्ये एक तांबे या धातूचा तांब्या ठेवला जातो. या तांब्यामध्ये पाच विड्याची पाने किंवा आंब्याचा टाळ गोलाकार ठेवतात आणि त्यावर नारळ ठेवतात. घटाची पूजा केली जाते. तांब्याला पाच बाजूने हळदी कुंकवाच्या उभ्या रेषा मारल्या जातात. (Ghatsthapna Information In Marathi) प्रत्येक दिवशी या घटाची पूजा करून त्यावर दर्दीवशी नवीन फुलांची माळ चढवली जाते. देवीच्या या घटाजवळ दहा दिवसांसाठी सुंदर दिवा लावला जातो. हा दिवा अखंड तेवत राहण्यासाठी माता भगिनी विशेष काळजी घेतात. अश्या प्रकारे घटस्थापना केली जाते.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- Navratri Information In Marathi | नवरात्र सणाचे महत्त्व आणि माहिती
- नवरात्रीचे नऊ रंग २०२३ | Navratri Colours
- 100+ Navratri Wishes In Marathi | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
घटस्थापना पूजेसाठी साहित्य
धान्य पेरण्यासाठी भांडे | अत्तर | ताम्हण | पळी |
पाणी | विड्याची पाने | कलश | पंचपात्र |
कुंकू | आंब्याचे टाळ | अगरबत्ती | धूप |
नारळ | हळद | चंदन | कापूर |
फळे | निरांजने | समई | पंचामृत |
दूध | दही | साखर | गूळ |
फुलांच्या माळा | फुले | तूप | तेल |
तांदूळ | धान्ये | माती | सुटे पैसे |
स्थापना पूजा विधि
- सर्वप्रथम संपूर्ण घे स्वच्छ करून, स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करून,पूजेचे साहित्य जमा करावे.
- घरातील देवाची पूजा करून घ्यावी.
- टोपली किंवा भांडे घ्यावे. आणि भांड्याच्या अर्ध्या भागापर्यंत माती भरावी. नंतर त्यावर आपल्याकडील धान्य पेरावे. धान्याच्या वर माती घालावी. त्यानंतर भांड्यात थोडे पाणी घाला.
- एक कलशवर पवित्र धागा बांधा. कलशाच्या मानेपर्यंत पाण्याने भरा. कलशमध्ये सुपारी,दुर्वा गवत, सुगंधी अत्तर नाणे घाला. कलशच्या काठावर झाकणाने झाकण्यापूर्वी 5 आंब्याची पाने किंवा विध्यची पाने गोलाकार ठेवा. कलश मध्ये अक्षता ठेवा.
- कलशाला हळद कुंकुवाचे उभी पाच बोटे लावून घ्या.
- यानंतर नारळ घ्या आणि तो लाल कपड्यात गुंडाळा. पवित्र धाग्याने नारळ आणि लाल कापड बांधा. आणि कलशच्या वर ठेवा. शेवटी कलश तयार केलेल्या धान्याच्या भांड्यावर मध्यभागी ठेवा.
- नारळावर देखील आपण स्वस्तिक काढुन घ्यायचे आहे. स्वस्तिक काढल्यामुळे ते शुभ प्रतिक मानले जाते.
- घटस्थापना पूजा थाळी (पुष्पहार, दिवा, धूप काठी, फळे, गोड आणि सुगंध) ठेवून तयार करा.
- प्रथम गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे. आपण ही स्थापना करत असतांना पानाचा विडा घ्यायचा आहे. त्यानंतर पुजन करून घ्यायचे आहे.
- हळद, कुंकू लावायचे आहे.
- ॐ गणेशाय नमः | जय माता दि या मंत्राचा जप करायचा आहे. स्थापना करतेवेळी हा जप करायचा आहे.
- मातीच्या भांड्याच्या बाजुला धागा बांधुन घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला नऊ पानांची नऊ फुलांची माळ तयार करायची आहे. अशी ती नऊ दिवस फुलांची माळ तयार करून बांधायची आहे.
- देवीचं ओटीचं साहीत्य समोर ठेवायचे आहे.
- अखंड नऊ दिवस आपल्याला देवीसमोर व घटासमोर दिवा तेवत / प्रज्वलित ठेवायचा आहे.
- देवी दुर्गाला आवाहन करा.
- देवीला हार तयार करून घालायचा आहे, त्यानंतर देवीला फुले, पाच प्रकारची फळे ठेवायची आहेत आणि देवीला नमस्कार करायचा आहे.
- कलश आणि धान्याच्या भांड्याला पहिली प्रार्थना करून देवी दुर्गाचे आवाहन करा. आणि तिला विनंती करा की तुमची प्रार्थना स्वीकारा आणि नऊ दिवस कलशमध्ये राहून तुम्हाला आशीर्वाद दया.
- नावाप्रमाणे, पंचोपचार पूजा पाच पूजा वस्तूंसह केली जाते. दिवा लावा आणि कलशाभोवती प्रदक्षिणा घाला. धूप लावून कलशाभोवती गोल फिरवा.
- धुप, अगरबत्ती आणि निरंजन लावायची आहे. आणि घंटा वाजवून देवीला ओवाळायचे आहे.
- कलश वर फुलांची माळा ठेवा आणि फुले अर्पण करा. शेवटी पंचोपचार पूजेची सांगता करण्यासाठी नैवेद्य म्हणजेच कलशला फळ आणि गोड पदार्थ अर्पण करा. कलशावर अत्तर शिंपडून देवतेला सुगंध अर्पण करा.
- मंत्रोच्चार करून ध्यानधारणा करावी.
- त्यानंतर देवीची आरती करून नैवेद्य दाखवावा.
घटस्थापनेचे महत्व (Importance of Ghatsthapana)
हिंदू धर्मातील शारदीय नवरात्रोत्सवात घटस्थापनेला (कलश प्रतिष्ठापन) विशेष महत्त्व आहे. कलशालाच घट बसवणे असे देखील म्हटले जाते. धार्मिक मान्यतांनुसार कलश हे देवता, ग्रह आणि नक्षत्रांचे निवासस्थान मानले जाते. कलश हे शुभ कार्याचे आणि सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. (Ghatsthapna Information In Marathi) नवरात्रीमध्येही कलशाची स्थापना करून सर्व दैवी शक्तींचे आवाहन केले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
घटस्थापनेचा मंत्र
घटस्थापनेसाठी पूजास्थळी बसल्यानंतर प्रथम स्वतःला आणि संपूर्ण पूजा साहित्य मंत्राने आणि तुळशीच्या पानांनी तांब्यातील पानी शिंपडून पवित्र करून घ्यावे. ‘ॐ अपवित्रः पवित्रोवा सर्वावस्थां गतोऽपिवा। यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः॥’, असा मंत्र म्हणावा. (Ghatsthapna Information In Marathi) हा मंत्र म्हणून तुळशीच्या पानाने कलशातील पाण्याने आधी स्वतःवर आणि नंतर पूजा साहित्यावर प्रोक्षण करावे. उजव्या हातात अक्षता, फूल, जल, विडा, नाणी आणि सुपारी घेऊन नवरात्र दुर्गा पूजनाचा संकल्प करावा.
शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेचं महत्व काय
घटस्थापना करताना प्रथम एक भांडे घेतले जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते. त्यावर एक घट ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. नवव्या दिवशी तळी उचलून घटाचे विसर्जन केले जाते. (Ghatsthapna Information In Marathi) घटस्थापना हा सण पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात येतो तसेच रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्याआधी घटस्थापना केली जाते. ही कृषी आधारित वैज्ञानिक संकल्पना असून बियाणे, माती, पाणी आणि हवामानाची चिकित्सा करणारी पारंपारिक तसेच शास्त्रीय दृष्टीकोण असणारी पद्धती आहे.
घटासाठी वापरण्यात येणारी माती ही आपल्या शेतातीलच का वापरली जाते
घटस्थापनेसाठी वापरण्यात येणारी माती ही शेतातील काळी माती वापरली जाते. परंतू ही माती इतर कोणाच्या शेतातील घेतली जात नाही, तर शेतकरी ज्या शेतात तो रब्बी पिक घेणार आहे त्याच शेतातील माती वापरली जाते. कारण ज्या शेतात तो पिक घेणार आहे त्या शेतातील मातीचे हे एकप्रकारे परिक्षणच असते. (Ghatsthapna Information In Marathi) या मातीत मिसळलेले बियाणे हे शेतकरी आपल्या शेतात पेरु शकतो आणि त्याच्याकडे उपलब्ध असणारे बियाणेच शेतात टाकले जाते. त्या मागचा हेतू हाच असतो की त्याच्या शेतात वापरले जाणाऱ्या बियाणांची उगवण क्षमता किती आहे हे तपासणे असते.
घटासाठी वापरले जाणारे पाणी शेतातील जलस्त्रोत्राचे
घटामध्ये नऊ दिवस जे पाणी घातले जाते ते शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्त्रोत्राचे पाणी वापरणार आहे त्याच जलस्त्रोत्राचे पाणी घटामध्ये घातले जाते. घट हा मातीचा वापरला जातो. (Ghatsthapna Information In Marathi) तो इतर कोणत्याही धातुचा वापरायचा नसतो. कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरणे आवश्यक असते. जेणेकरुन त्याच्या खाली ठेवलेल्या मातीत आणी त्यात टाकलेल्या बियांना रुजण्यासाठी त्याची उपलब्धता होते.
घट नऊ दिवसच का बसवला जातो?
घट नऊ दिवसच का बसवला जातो असा सर्वांना पक्ष पडला असेल. तर त्याचे कारण बियांना रुजून अंकुर बाहेर पडण्यासाठी कमीतकमी आठ दिवसाचा कालावधी लागतो. (Ghatsthapna Information In Marathi) घटामधील बियाणांची उगवणक्षमता रोज तपासली जाते. परंतू नवव्या दिवशी शेतकऱ्याकडून घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पहाणी केली जाते. ज्या धान्याचे पिक जोमाने आले आहे ते पिक तो आपल्या शेतात पेरण्यासाठी निवडतो.
या निर्णायाला चांगभल, येळकोट अशा घोषणा देवून सर्व मान्यता दिली जाते. या उपटलेल्या पिकाचा तुरा शेतकरी आपल्या टोपी किंवा फेट्याच्या शिरपेचात खोचतो किंवा त्याची अंगठी करुन हातातही बांधली जाते. तसेच बायका आपल्या केसात माळतात. या प्रथेमुळे घरोघरी घेण्यात आलेल्या परिक्षणाचे निकाल एकत्र करुन अभ्यासणे सोपे जाते. या सर्व प्रक्रियेत माती, पाणी आणी धान्य यांचे जसे परिक्षण केले जाते, (Ghatsthapna Information In Marathi) त्याच बरोबर या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे याचे देखील परिक्षण केले जाते.
शेतकऱ्यांच्या दृष्टीनं घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व
घटस्थापनेला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतात पिकं व्यवस्थित येईल का?पिकाची उगवण क्षमता चांगली राहिल का? तसेच शेतात पुरेस पाणी आहे का? हे पाहण्यासाठी घटस्थापना केली जात असल्याची सांगितले जाते. पावसाळा संपत आला की आपण घटस्थापना करतो. (Ghatsthapna Information In Marathi) आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते.तसेच दहाव्या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त असतो. त्यामुळं त्याला शेतीच्या दृष्टीनं महत्व आहे.
घटस्थापना (शारदीय नवरात्र) का करतात?
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हा सण शरद ऋतूच्या प्रारंभी येतो. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. दहाव्या दिवशी दसरा सणाला विसर्जन केले जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. (Ghatsthapna Information In Marathi) आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा अर्च आणि आरती करणे, देवीची ध्यानधारणा करून नंतर नैवेद्य दाखवणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय.
पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात त्यामुळे शेतकरी खुशीत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते .नऊ दिवस देवीची पुजा देवांना देव्हा-यातून बाहेर न काढता करणे. प्रत्येक घरी प्रत्येक (Ghatsthapna Information In Marathi) भागात वेगवेगळया पद्धतीचा वापर करून नवरात्र साजरी केली जाते. काही घरांमध्ये घटस्थापनेला घरी भट- सवाष्ण जेवायला बोलावतात.
काही घरांमध्ये कुमारिका पूजन म्हणजेच कुमारिकेला देवीचे प्रतिक मानून तिची पुजा करून तिला जेवायला वाढतात. नऊ दिवस अखंड दीप तेवत असतो. काही घरात फक्त तिळाच्या तेलाचाच दिवा लावतात. दररोज एक माळ देवाच्या डोक्यावर बांधली जाते. त्यामध्ये देखील तिळाच्या फुलांच्या माळेला अधिक महत्व आहे, अशा एकूण नऊ माळा बांधल्या जातात. हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.
काही घरांमध्ये देवा शेजारी धान्याची पेरणी करतात. त्या धान्याला अंकुर येतात. नवव्या दिवशी होम हवन होतो. ब्राह्मण व सुवासिनींना जेवावयास बोलावले जाते. होमात कोहळा अर्पण करतात व शेवटच्या दिवशी होमहवन होऊन याचे उद्यापन व विसर्जन विजयादशमीला होते. (Ghatsthapna Information In Marathi) विजयादशमीला म्हणजेच दस-याला आपट्याच्या पानांची पुजा करून ह्या उत्सवाची सांगता होते. अश्या पद्धतीने नवरात्रोत्सव आपल्याकडे साजरा करण्याची पद्धत आहे.
पूजा विधी आणि वेळ-
घरात उत्तर-पूर्व दिशा कलशाची स्थापना करणे योग्य समजली जाते. घट बसवणाऱ्या जागेला गंगाच्या पाण्याने स्वच्छ करावे आणि जमिनीवर किंवा केळीच्या पानावर किंवा भांड्यात स्वच्छ माती पसरवावी, त्यानंतर मातीवर वेगवेगळे बियाणे घालावे. यानंतर पुन्हा त्यावर स्वच्छ मातीचा थर पसरावा आणि त्या मातीवर पाणी शिंपडावे. मग त्याच्यावर कलश स्थापित करावा. कलशाला शुद्ध पाण्याने भरावे आणि त्यात एक नाणे ठेवावे. कलशाच्या पाण्यात गंगा जल मिक्स करावे. यानंतर कलशावर उजवा हाथ ठेवून मंत्रोच्चार करावा.
गंगे! च यमुने! चैव गोदावरी! सरस्वति!
नर्मदे! सिंधु! कावेरि! जलेSस्मिन् सन्निधिं कुरु।।
यानंतर कलशच्या तोंडावर कापड बांधा आणि नंतर एका भांड्याने कलश झाकावा. नंतर झाकलेल्या भांड्यात धान्य भरा. एक नारळ घेऊन लाल कपड्याने लपेटून कलशाला बांधा. (Ghatsthapna Information In Marathi) नंतर नारळ धान्याने भरलेल्या वाडग्याच्या वर ठेवा. नवरात्रीमध्ये देवी दुर्गासमोर नऊ दिवस अखंड ज्योत लावण्याची देखील प्रथा आहे. देवीसमोर एक तेलाची आणि एक शुद्ध तुपाची ज्योत लावावी.
घटस्थापना करताना या चुका करू नका
- घटस्थापना स्थळाजवळ शौचालय किंवा स्नानगृह नसावे.
- देवीच्या पूजास्थळाजवळ घाण होऊ देऊ नका. यामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.
- पूजेच्या जागेच्या वर कोणतेही कपाट नसावे. असल्यास ते स्वच्छ ठेवावे.
- घटस्थापना करताना कलशाचे तोंड उघडे ठेवू नये. कापडाने झाकून ठेवा.
- प्रार्थनास्थळासमोर थोडी मोकळी जागा असावी, जिथे ध्यान आणि पठण करता येईल.
- कलश झाकणाने झाकलेले असेल तर त्यात तांदूळ भरून त्याच्या मध्यभागी एक नारळ ठेवावा.
- कलशाची स्थापना चुकीच्या दिशेने करणे टाळा.
- उत्तर-पूर्व ही देवतांची दिशा असून या दिशेला देवीच्या नावाने कलश ठेवावा.
- पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीनं घटस्थापनेला कोणते महत्त्व आहे?
घटस्थापनेला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतात पिकं व्यवस्थित येईल का?पिकाची उगवण क्षमता चांगली राहिल का? तसेच शेतात पुरेस पाणी आहे का? (Ghatsthapna Information In Marathi) हे पाहण्यासाठी घटस्थापना केली जात असल्याची सांगितले जाते.
घटस्थापना कधी करावी?
गणेश विसर्जन आणि पितृ पक्ष झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आश्विन शुक्ल प्रतिपदा या दिवशी घटस्थापना करावी.
Ghatsthapna Information In Marathi आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.