Dhamma Chakra Pravartan Din

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा | Dhamma Chakra Pravartan Din

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

Dhamma Chakra Pravartan Din : अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. (Dhamma chakra Pravartan Din) या दिवसाचं स्मरण ठेवत अनेक बौद्ध धर्मीय नागपूरला दीक्षाभूमीवर येतात. बाबासाहेबांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात.

बौद्ध धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhamma chakra Pravartan Din). तारखेनुसार बौद्ध धर्मिय हा धम्मचक्र प्रर्वतन दिन 14 ऑक्टोबर दिवशी साजरा करतात. यंदा या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, प्रियजनांना देण्यासाठी मराठी वेडा. इन कडून तयार करण्यात आलेल्या या मराठमोळ्या शुभेच्छापत्रांना शेअर करत करू शकता. Wishes, Images, Greetings, Photos शेअर करून तुम्ही या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा | Dhamma Chakra Pravartan Din

काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य
परिवर्तनाच्या वाटेने झगमगते हे कार्य
दिक्षाभूमीत्या पायथ्याशी जगण्याचे हे धैर्य
चला एकमुखाने गाऊ भिमाचे शौर्य
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सदिच्छा!

बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

मानवतेचा शिल्पकार या जगामंध्ये ठरला
भीमाने कोट्यावधींच्या काळजात बुद्ध कोरला
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना त्रिवार वंदन
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा !

Dhamma Chakra Pravartan Din
Dhamma Chakra Pravartan Din

तुझाच गौतमा प्रकाश पडे अंतरी
तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

तथागताच्या मधूर वाणी
धम्म शिक्षेची किती स्तुती
शरण ले सम्राट अशोक
भीमरावजी आंबेडकर
स्विकारला विश्व शांतीचा पथ
भीमरायाने ओढीला धम्माचा रथ
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज येतो गंध भिमाच्या दीक्षाभूमीच्या मातीला
या मातीने उद्धरिले साऱ्या मानवजातीला
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोणाचा जन्म कोणाला
काय देऊन गेला…….
फ़क्त बाबा साहेबाचा जन्म
आम्हाला न्याय देऊन
गेला….
जनावरासारखे होते जीवन…..
तो माणूस बनवून गेला……
आम्ही होतो गुलाम…
आम्हाला बादशाह बनवून गेला…
सम्राट अशोक विजया दश्मी व धम्म चक्र अनुप्ररिवर्तन दिनाच्या कुटूंबासहित सर्वाना हार्दीक मंगलकामना

परिवर्तनाच्या दिशेने चालण्याचे घेऊन धैर्य एकमुखाने गात भीमरायाचे शौर्य सोबतीने पार पाडू धम्मप्रसार कार्य ६४ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लावला
माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला
14 ऑक्टोंबर 1956 जगातील सर्वात मोठे धर्मांतर
धम्मचक्र परिवर्तन दिनाबद्दल मंगलमय हार्दिक शुभेच्छा

समाजातील वंचित आणि शोषितांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ! धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपल्या कुटुंबासहित सर्वांना हार्दिक मंगल कामना

क्रांती घडवावी तर बाबासाहेबांसारखी
आणि शांती मिळवावी तर गौतम बुद्धांन सारखी
धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा

65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशातील सर्व बौद्ध बंधू-भगिनी आणि बांधवांना कोटी कोटी मंगलमय हार्दिक शुभेच्छा जय भीम नमो बुद्धाय.

तर हे होते धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या (Dhamma chakra Pravartan Din) हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जर या शुभेच्छा आवडले असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर आणि आपल्या परिवाराबरोबर नक्की शेअर करा

Leave a Comment