Easter Sunday Information In Marathi | ईस्टर संडेची माहिती

Easter Sunday Information In Marathi | Easter Meaning In Marathi :  Easter Sunday 2024 हा दिवस ख्रिचन लोक सण साजरा करतात. ख्रिचन धर्म हा दिवस पुनरुत्थानाचा रविवार सण म्हणून साजरा करतात आणि ख्रिचन लोकांचे असे म्हणणे आहे की यादिवशी येशू ख्रिस्त पुनर्जीवित झाले होते त्यामुळे त्याच्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो.

Easter Sunday Information In Marathi
Easter Sunday Information In Marathi

Easter Sunday Information In Marathi | ईस्टर संडेची माहिती

गुड फ्रायडे नंतर तिसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे ईस्टर संडे होय, ह्या दिवशी म्हणजे रविवारी येशू पुनर्जीवित झाले असे मानले जाते म्हणून हा दिवस आनंदाने साजरा करतात.

ख्रिस्ती बाधवाचा ख्रिसमस नंतरचा सर्वात मोठा सण म्हणजे ईस्टर संडे होय, या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. प्रभू उठले आहेत! या शब्दात एकमेकांचे स्वागत करतात. (Easter Sunday Information In Marathi)

ईस्टर संडेच्या निमित्ताने सगळी कडे उत्साही आणि आनंदी वातावरण पाहायला मिळते. तसेच या दिवशी विविध ठिकाणी ईस्टरच्या निमित्ताने काही स्नेहभोजनाच्या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात येतं. कुटुंब, समुदाय, मित्रपरिवार एकत्र येऊन असा हा ईस्टर संडे साजरा केला जातो.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Good Friday Information In Marathi | गुड फ्रायडे म्हणजे काय ?
Good Friday Quotes 2024 | गुड फ्रायडे मराठी कोट्स
Happy Easter Wishes In Marathi | ईस्टरच्या मराठी शुभेच्छा

ईस्टर कथा (Easter story) 

रविवारी पहाटे अंधार असताना मेरी मॅग्डालीन कबरेजवळ आल्या आणि त्यांनी पाहिले की कबरेतून दगड बाजूला सरकलेला आहे. मग त्या शमौन पतरस आणि दुसरा शिष्यांकडे गेल्या आणि म्हणाल्या की त्यांनी येशूचे शरीर कबरेतून काढले आहे. सर्वजण तेथे पोहोचले आणि पाहिले की कफनाचे कपडे पडलेले होते. (Easter Sunday Information In Marathi) सर्वांनी पाहिले की येशू तेथे नाही. मग सर्व शिष्य निघून गेले, पण मरीया मग्दालीन तिथेच राहिल्या.

रडत रडत मॅग्डालीनीने येशूचे शरीर जेथे ठेवले होते त्यात पुन्हा डोकावले आणि तेथे त्यांना पांढरे कपडे घातलेले दोन देवदूत डोक्यावर व पायाजवळ बसलेले दिसले. देवदूताने त्यांना विचारले, तू का शोक करीत आहेस? मग मॅग्डालीन म्हणाली की त्यांनी माझा प्रभू काढून घेतला आहे. असे बोलून ती वळताच त्यांना येशू तेथे उभे असल्याचे दिसले. येशू मग्दालिनींना म्हणाले, मी माझ्या पित्याकडे जात आहे आणि तू माझ्या भावांकडे जा. (Easter Sunday Information In Marathi) मरीया मॅग्डालीन शिष्यांकडे आल्या आणि म्हणाल्या की त्यांनी प्रभुला पाहिले आहे… असे देखील म्हटले जाते की येशूने काही शिष्यांना देखील दर्शन दिले. – बाइबल यूहन्ना 20

रविवारी फक्त एका स्त्रीने त्यांना त्यांच्या कबरीजवळ जिवंत पाहिले. जिवंत दर्शनाचा हा प्रसंग ‘इस्टर’ म्हणून साजरा केला जातो. बायबलनुसार, येशू खरोखरच मेलेल्यांतून उठले (Easter Sunday Information In Marathi) आहे हे सिद्ध करण्यासाठी, प्रेषितांना पटवून देण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी आणि चर्चची स्थापना करण्यासाठी 40 दिवस या जगात जगले.

त्यानंतर ते प्रेषितांना जैतूनच्या डोंगरावर घेऊन गेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद देत, ढगांनी त्यांना झाकून घेईपर्यंत आकाशाकडे उड्डाण केले. तेव्हा दोन देवदूत आले आणि त्यांना म्हणाले, (Easter Sunday Information In Marathi) ‘हा येशू, ज्याला तुम्ही तुमच्यातून स्वर्गात जाताना पाहत आहात, तो पुन्हा येईल, ज्याप्रमाणे तुम्ही त्या स्वर्गात जाताना पाहिले आहे. मग तो सर्व मानवांचा न्याय करील.’

हा उत्सव साजरा करण्यामागचं कारण काय?

ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृत झाल्यानंतर पुन्हा उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. येशू गुड फ्रायडेच्या (Easter Sunday Information In Marathi) दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी 40 दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो.

ईस्टरचा आठवडा पवित्र आठवडा म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे तीन दिवस म्हणजे मौन्द्य गुरुवार, उत्तम शुक्रवार ( Good Friday) व होली सॅटर्डे असे आहेत. त्यानंतरचा रविवार हा ईस्टर असतो. ईस्टरची तारीख दरवर्षी बदलते कारण वसंत संपात पौर्णिमेच्या नंतरचा पहिला रविवार म्हणजे ईस्टर असे इसवी सन 325 मध्ये भरलेल्या ख्रिस्ती बिशप लोकांच्या संमेलनात ठरवले गेले. यहुदी लोकांच्या पासोव्हर या सणाच्या ऐवजी ईस्टर साजरा केला जातो असे काहींचे म्हणणे आहे. कारण बऱ्याच युरोपियन भाषांमध्ये ईस्टर हा शब्द पासोव्हरचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.ईस्टर साजरा करण्याच्या पद्धती मात्र देशागणिक वेगळ्या आहेत. प्रोटेस्टंट पंथीय लोकात ‘प्रभू उठला आहे’ असे म्हणून येणाऱ्यांचे स्वागत केले जाते तर दुसरा माणूस ‘हो खरच प्रभू उठला आहे’ असे म्हणून त्या स्वागतास प्रत्युत्तर देतो.

अंड्यांचे महत्त्व

काही देशात ईस्टर अंडी सजवण्याची प्रथा आहे. येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे अंडे. ईस्टरच्या सणात अंड्याला खूप महत्त्व आहे. अंडे म्हणजे नवीन आयुष्याच्या सुरुवातीचे प्रतीक समजतात. (Easter Sunday Information In Marathi) प्रभू कबरीतून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे.

या दिवशी अंडी रंगविणे विशेष मानले जाते. (Easter Sunday Information In Marathi) अंडे हे नव्या आनंदी दिवसाच्या प्रारंभाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी आई वडील रंगीत अंडी लपवून ठेवतात आणि लहान मुलांनी ती शोधायची अशी पद्धती रूढ आहे.

Leave a Comment