Funny Ukhane for wedding – लग्नासाठी मजेदार उखाणे
Funny Ukhane for wedding – लग्नासाठी मजेदार उखाणे :
नेत्ररुपी निरंजनात प्रेमरुपी फुलवात
—– चे नाव घेण्यास आजच केली सुरवात
आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद
—– चे नाव घेते तुम्हा सर्वाचा आशिर्वाद
दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात ….
साथि फुलेल आता सासरच्या व्रुन्दवनात्
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- मंगळागौरीसाठी उखाणे Mangalagaur Ukhane
- Navriche Ukhane | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे Part 2
- Navariche Ukhane | नवरीचे उखाणे
आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
……च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश
बारिक मणी घरभर पसरले,—–
साठि माहेर विसरले
मंगळसुत्राचे २ डोरले, एक सासर अन दुसरे माहेर,
—रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
सुर्यमा मावळला, चन्द्रमा उगवला,
रजनी टाकते हळुच पाउल,
— आणि — च्या संसारात,
लागली बाळराजाची चाहुल
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- Non Veg Jokes Marathi 2023 – नॉन व्हेज जोक्स मराठी भाग १
- Marathi Non Veg Ukhane – मराठी नॉन व्हेज उखाणे
- Chavat Ukhane for Female – महिलांसाठी चावट उखाणे
- Marathi Non Veg Jokes – नॉन व्हेज जोक्स मराठी भाग 2
एक होति परि …..
नाव घेते आता जावा आपापल्या घरि
तुमच्यापावलांवर पाउल ठेवून मी सप्तपदी चालले
आणि ………..नाथा मी तुज़ीच जाहले
रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य —– च्या सहीत