Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको विनोद – भाग २
नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं.
भाजीवाला विचारतो: मैडम खूप शिकलेल्या आहेत वाटतं.
नवरा (खुश होऊन): हो इंजिनियर आहे ती, तुम्हाला कसं कळलं?
भाजीवाला: त्यांनी पिशवीमध्ये खाली टोमॅटो
आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला.
पेट्रोल पंपावर पहिले प्रत्येकजण आपल्या बायकोला
पेट्रोल पंपाच्या बाहेर उतरवून पेट्रोल भरायला जात होता.
मी खूप विचार केला असे का?
नंतर तिथला बोर्ड पहिला आणि खूप हसलो राव
… लिहिलं होतं, “आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवाव्यात”
तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल तर अविवाहित असताना बदला.
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चे चैनल पण बदलू शकत नाही.
गणपतीला दोन बायका असतात रिद्धी आणि सिद्धी
सामान्य माणसाला एकच बायको असते आणि ती पण जिद्दी
Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको विनोद – भाग २
एक बाई कपडे धुताना दुसरीला
तू वापरतेस तोच साबण मीही वापरते
पण तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे?
दुसरी: आगं, मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे
असे समजून धोपटते … म्हणून
माणूस: केस बारीक कापा
कटिंग वाला: किती बारीक कापू ?
माणूस: बायकोच्या हातात येणार नाही इतके
बायको : पाहुणे येणार आहेत, घरी फक्त डाळच आहे.
नवरा : तू एक काम कर, किचन मध्ये एक भांडं पाड,
मग म्हण “अरे देवा, पुलाव सांडला” नंतर,
दुसरं भांडं पाड आणि म्हण “अगं बाई,
बिरयाणी सांडली” मग,
मी पाहुण्यांना सांगीन आज डाळ भात खाऊ….
पाहुणे येतात…
किचन मधून भांडं पडल्याचा आवाज येतो…
नवरा “काय झालं???”
बायको : आईच्या गावात….डाळच पडली
बायको: तुम्ही आपल्या शेजारनी ला “आय लव यु” तर नाही न म्हटलं?
नवरा: नाही तर … का? काय झालं ?
बायको: ती कालपर्यंत मला “वहिनी” म्हणत होती,
आज अचानक “ताई” म्हणतेय!!
पत्नी: पूरा दिन क्रिकेट, क्रिकेट ..!!
मैं घर छोड़ कर जा रही हूँ …
पति: (कोमेन्टरी के अंदाज़ में)
पहलीबार कदमों का बेहतरीन इस्तेमाल!
बायकांचे ११ प्रकार
१. आळशी बायको
स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा.
२. धमकवणारी बायको
कान खोलून ऐकून घ्या या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील.
३. इतिहासाची आवड असलेली बायको
सर्व जाणून आहे मी तुमचं खानदान कसं आहे ते.
४. भविष्य-वाचक बायको
पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही.
५. गोंधळलेली बायको
तूम्ही माणूस आहात की पायजमा
६. स्वार्थी बायको
ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे.
तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही.
७. शंकाळू बायको
फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून?
८. अर्थशास्त्रज्ञ बायको
कोणता खजिना जमा केलेला आहे जे रोज-रोज चिकन खाऊ घालू?
९. धार्मिक बायको
देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली.
१०. निराश बायको
माझ्या नशीबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का?
आणि शेवटी ☆☆☆☆☆
११. टिकाऊ बायको
मी होते म्हणून टिकले दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती.
यातून तुमची कोणती आहे? तपासून घ्या!!
Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको विनोद – भाग २
पति: काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस..
पत्नी: तूमचा काही तरी गैरसमज झालेला दीसतोय.
पती: कसला गैरसमज ?
पत्नी: हाच की मी झोपेत होते म्हणुन…
बायको: अहो सकाळी सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार तरी करत जा.
कामं चांगली होतात.
नवरा: काहीही चांगलं होत नाही.
लग्नाच्या दिवशी बाहेर पडताना घरातील सर्व देवांना नमस्कार केला.
काय झालं.
नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते
आज पासून तू मला आई म्हणायचं
आणि सासर्यांना बाबा म्हणायचं
संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो, तेव्हा ती म्हणते…
आई….. दादा आला!
सुखी राहायच असेल तर आतला आवाज ऐका
…….
………
आतला आवाज म्हणजे
.
.
.
किचन च्या आतला आवाज
*”अहो ऐकल का”*
Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको विनोद – भाग २
बायको आपल्यावर खुपच प्रेम करते असे वाटत असेल तर,
जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात पुसून पहा…
तुमचा सगळा गैरसमज दूर होईल…!!
डिलिवरी च्या वेळेस …
बायको – देवा, मुलगा होऊ दे ….
नवरा – देवा, मुलगी होऊ दे प्लीज
देव – माकडांनो गप्पा बसा , नाही तर असा आयटम बनवेल,
कि तुम्ही दोघपण रडत बसाल, आणि तो टाळी वाजवेल.
बायको: माझ्यासाठी वाघाची शिकार करा,
मला वाघाचे कातडे आपल्या घरात लावायचे आहे….
नवरा: अगं हे कसे शक्य आहे, दुसरे एखादे सोपे काम सांग
बायको: ठीक आहे,
तुमच्या मोबाईल मधले व्हाटसप चे मेसेजेस दाखवा….
नवरा: वाघ साधा हवा की पांढरा?
Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको विनोद – भाग २
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको मराठी विनोद – भाग १
- Navra Bayko Jokes In Marathi Sharechat – भाग 3
- Non Veg Navra Bayko Jokes Marathi – भाग 4
- Jokes In Marathi Navra Bayko – भाग ५
एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तीच पुसून टाकली
आणि माणसाला विचारले,”काही आठवते का?”
माणूस: हो, फक्त बायकोचे नाव.
देव हसला अन म्हणाला,
सगळा फॉरमॅट केला पण वायरस गेला नाही
बायको: देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे.
नवरा: अरे वा, इतका आवडतो मी तुला?
बायको: तसे नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार?
नवीन माणसाला परत कोण शिकवणार?
एक नवरा साधूकडे जातो
नवरा: बाबा रात्री कधी झोपेतून जाग आली तर बायकोचा चेहरा चादरीच्या आतून
तेजाने चमकत असतो, कुठलीतरी अद्भुत किरणे दिसतात,काय करू?
साधू: आरे password टाक मोबाईलला तुझ्या,
येड्या तुझा मोबाईल चेक करते ती………..!!!
सर्वात छोटा जोक
नवरा: मला कविता आवडते
बायको: मलापण विनोद आवडतो
Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको विनोद – भाग २
पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते….
बायको (वैतागून): तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय……
पक्क्या: अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते…
पत्नी: ऐकलं का? पेपरमध्ये बातमी आली आहे.
की एका नवऱ्याने आपल्या पत्नीला विकलं?
पती – अरे वा, कितीला?
पत्नी – एका सायकलसाठी त्याने असं केलं.
तुम्ही तर अस नाही ना करणार
पती – मी इतका मूर्ख थोडी आहे. तुझ्या बदल्यात तर मी कार घेईन
बायको नवऱ्यासाठी सकाळी गरम दूध घेऊन येते.
नवरा ग्लास घेऊन तोंडाला लावतो आणि एक घोट घेतो.
नवरा: याक … छी … !!! हे कसलं गं दूध ?
बायको: ते काय आहे ना, केसर संपलं आहे
म्हणून मी तुमच्या खिशातील विमल पान मसाला टाकला.
ते टीव्हीवर म्हणतात ना “इसके दाने दाने मे है केसर का दम”
(नवऱ्याने विमल सोडली)
बायको: आहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटते.
नवरा: हा, म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल?
Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको विनोद – भाग २