शिवाजी महाराज शायरी | Shivaji Maharaj Shayari Marathi : तुम्ही मराठीत छत्रपती शिवाजी महाराज शायरी शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
या पोस्टमध्ये मी तुम्हाला शूर छत्रपती शिवाजी महाराजांवरील अप्रतिम मराठी शेर शायरी सांगितल्या आहेत. जे छत्रपती शिवाजी जयंतीला होणाऱ्या स्पर्धांसाठी योग्य आहे. तर जाणून घेऊया…
शिवाजी महाराज शायरी | Shivaji Maharaj Shayari Marathi
इतिहासाच्या पानावर…..
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर अन्….
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे…..
राजा शिवछत्रपती !!.
प्रजेला ज्यांनी समजले मायबाप…
शत्रूचा झाला थरकाप !
स्त्रीला दिला मातेचा सन्मान…
छत्रपती शिवरायांचा….
आहे आम्हाला अभिमान !
Shivaji Maharaj Shayari Marathi
राजे तुम्हीच अस्मिता…..
तुम्हीच महाराष्ट्राची शान !
जगती तुम्हीच छत्रपती….
तुम्हीच आमचा स्वाभिमान !
एक होते राजे शिवाजी,
भीती नव्हती त्यांना जगाची ….
चिंता नव्हती परिणामांची…
कारण त्यांना साथ होती,
भवानी मातेची आणि आई जिजाऊची….
ज्यांची गरूडाची नजर,
माता भगिनींबद्दल आदर….
प्रत्येकाच्या मनात केलं घर,
तेच छत्रपती ज्यांचा कायम आदर !
Shivaji Maharaj Shayari Marathi
डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच….
आजही वाजतोय जगती !
राखले स्वराज्य अबाधीत….
असे हे एकमेव शिवछत्रपती !
सहयाद्रीच्या रांगावरती…..
सदा मुघलांच्या नजरा !
बोट छाटली तयांची….
त्या शिवबांना माझा मुजरा !
हिंदू धर्म राखिले,
स्वराज्य स्वप्न साकारिले….
गनिया के लासी स्वराज्य साजरा,
छत्रपती शिवराजा तूज मानाचा मुजरा …!
शब्दही पडतील अपुरे,
अशी शिवबांची किर्ती…
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती !
Shivaji Maharaj Shayari Marathi
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा ….
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा ….
अतुल्य शौर्याची गाथा,
त्यांच्या चरणी झुकतो माथा ….
जय भवानी, जय राजे शिवाजी
जय जिजाऊ, जय महाराष्ट्र !
भवानी मातेचा लेक तो,
मराठ्यांचा राजा होता!
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा तो बाप होता !!
Shivaji Maharaj Shayari Marathi
शूर वीरांची आहे ही धरती,
वीर शिवाजी राजे पालनहार ….
मावळ्यांच्या मनात जागवला अभिमान,
असा हा राजा महाराष्ट्राची शान !
सह्याद्रीच्या कुशीतून,
एक हिरा चमकला ….
भगवा टिळा चंदनाचा,
शिवनेरीवर प्रकटला ….
लखलखणारी तलवार पाहून,
व्हायचे शत्रू ढेर…..
जिजाऊचा शिवबा होता,
शेरांचा सव्वाशेर !
छाती होती पोलाद ज्यांची,
डोळ्यात ज्यांच्या अंगार,
त्या माझ्या शिवबांचा आज ….
गर्जा जयजयकार, गर्जा जयजयकार !
जाणता शिवाजी राजा माझा,
एकच असा होऊन गेला ….
इतिहासाच्या पानांमध्ये,
नाव आपले कोरून गेला ….
Shivaji Maharaj Shayari Marathi
शिवनेरीवर एक तारा चमकला,
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला !
मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांना,
ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला !!
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇 |
Shivgarjana | शिवगर्जना (घोषवाक्य) मराठी |
छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन शुभेच्छा | Sambhaji Maharaj Rajyabhishek |
शिवजयंती 2024 (भाषण) | Shivjayanti Speech In Marathi |
कलम नव्हते कायदा नव्हता,
तरीही सुखी होती प्रजा !
कारण सिंहासनावर होता,
माझा छत्रपती शिवाजी राजा !!
लखलख, चमचम तळपत होती,
शिवबांची तलवार ….
महाराष्ट्राला घडवणारे,
तेच खरे शिल्पकार ….
फक्त मस्तकिच नव्हे,
रक्तात देखील भगवा दिसतो !
कारण हृदयात आमच्या,
तो जाणता राजा शिवछत्रपती नांदतो !!
जागवल्याशिवाय जाग येत नाही,
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही,
छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय ….
माझा दिवस उगवत नाही ….
कलम नव्हते, कायदा नव्हता,
तरीही सुखी होती प्रजा,
कारण सिंहासनावर होता ….
माझा छत्रपती शिवाजी राजा ….
Shivaji Maharaj Shayari Marathi
आले किती, गेले किती,
उडून गेले भरारा ….
संपला नाही आणि संपणारही नाही,
माझ्या शिवबांचा दरारा …
स्वराज्याचे बांधून तोरण,
शत्रूंना आणले शरण ….
देशाला आहे त्यांचा अभिमान,
छत्रपती शिवबांचे गाऊ गुणगान ….
“हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता,
अन्यायाविरुध्द लढण्याचा इरादा नेक होता,
असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तरजगात एक होता”
सिंहाची चाल, गरूडाची नजर,
स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन,
असेच असाव मावळ्यांचे वर्तन,
हीच शिवरायांची शिकवण ..
ताशे तडकणार, हृदय धडकणार….
मन थाडे भडकणार….
पण या देशावरच काय….
अख्या जगावर….
१९ फेब्रुवारीला भगवा झंडा फडकणार !!
शब्दही अपुरे पडती,
अशी शिवबांची किर्ती !
राजा शोभून दिसे जगती,
अवघ्या जगाचे शिवछत्रपती !!
सह्याद्रीच्या कुशीतून,
एक हिरा चमकला,
भगवा टिळा चंदनाचा,
शिवनेरीवर प्रकटला,
हातात घेऊन तलवार,
शत्रूवर गरजला,
महाराष्ट्रात असा एकच,
शिवाजी राजा होऊन गेला ….
सहयाद्रीच्या रांगावरती….
सदा मुघलांच्या नजरा !
बोट छाटली तयांची….
त्या शिवबांना माझा मुजरा !!
छत्रपती शिवाजी महाराज की जय !
जय भवानी, जय जिजाऊ,
जय महाराष्ट्र !
धन्यवाद !!
शिवाजी महाराज शायरी मराठीचा हा संग्रह तुमच्यासाठी कितपत उपयुक्त ठरला? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
खूप छान