Police Hawaldar Jokes | पोलीस हवालदार मराठी विनोद

Police Hawaldar Jokes | पोलीस हवालदार मराठी विनोद

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी जोक्स

Police Hawaldar Jokes | पोलीस हवालदार मराठी विनोद

मुलगा: मला गर्लफ्रेंड भेटत नाही आहे.
पोलीस: कधीपासून
मुलग: लहानपणा पासून

मुलगा: मला वाचवा
पोलीस: काय झाले?
मुलगा: काल एका मुलीला बोललो
दिल चीर के देख इसमे तेरा हि नाम होगा
पोलीस: मग
मुलगा: काल पासून चाकू घेऊन शोधतेय मला

एक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो
क्राइम ब्रँच
हा…बोला
साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खुन झालाय…..
इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली…
मग तुम्ही तिला अटक केली का नाही
नाही साहेब
फरशी अजुन वाळली नाही!

एक जोडप चित्रपट पाहायला जाते,
तेथे लहान मुलांना न्यायची परवानगी नसते….
ते जोडपे लहान मुलाला बास्केट मध्ये लपवतात.
वाचमनने त्यांला विचारले : या बास्केट मध्ये काय आहे?
जोडपे: यात लंच आहे….
वाचमन: सांभाळून न्या, डाळ बाहेर सांडत आहे….

एक पती: अहो माझी बायको हरवलीय….
दुकानदार: त्याचा इथे काय संबंध….
हे एक मेडिकल स्टोअर आहे…
तुम्ही पोलिस स्टेशन ला जा….
पती: ओह माफ करा….
आनंदाच्या भारत कुठे जायचं हे सुद्धा समजेना….

एका आजीबाईनी सिग्नल तोडला
आणि भुरकण स्कुटी ?वरून निघून गेल्या….
तिकड हवालदार शिटी वाजवून दमले पण आजी काही थांबली नाही….
पुढच्या सिग्नलला हवालदाराने आजीला थांबवले आणि म्हणाला
एवढ्या शिट्ट्या मारतोय मग तुम्ही थांबल्या का नाही…..??
आजी: बाळा शिट्टी वाजल्यावर थांबायच हे वय आहे का माझ….

नवीन वाहतूक चिन्ह…
वाहने सावकाश चालवा समोरून मोबाईलवर व्यस्त असणारे येत आहेत.

एका महिलेची तिसऱ्या वेळेस ड्राइविंग टेस्ट झाली.
तरी ती महिला fail झाली…
कारण…
RTO: वहिनी समजा एका बाजूनं तुमचा सख्खा भाऊ
व एका बाजूनं नवरा आला तर काय माराल?
महिला: नवरा….!
RTO: वहिनी हात जोडून शेवटचं सांगतो की ब्रेक मारायचा आहे ब्रेक…

बरं झालं बोर्डच्या रिझल्ट मध्ये Exit poll नाही ते
नाहीतर घरच्यांनी 3-4 दिवस अगोदर पासुन मारायला सुरूवात केली असती….

आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
जसे 100 लावल्यावर पोलिस येतात
तसे….100 दिल्यावर जातात पण..

Leave a Comment