छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन शुभेच्छा | Sambhaji Maharaj Rajyabhishek : संभाजी महाराजांनी १६ जानेवारी १६८१ रोजी आपला राज्याभिषेक केला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढेही तशीच राहील, अशी हमी त्यांनी जनतेला दिली.
छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनादिवशी कुटुंबिय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि शिवभक्त यांच्यासोबत शेअर करुन शंभूराजेंना त्रिवार अभिवादन करा.
छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन शुभेच्छा | Sambhaji Maharaj Rajyabhishek
छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक 2023 कधी आहे?
छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन 16 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. संभाजी राजे यांना 20 जुलै 1680 रोजी पन्हाळा येथे राजा म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती, तर त्यांचा अधिकृत राज्याभिषेक सोहळा 16 जानेवारी 1681 रोजी झाला होता. हा सोहळा रायगड किल्ल्यावर पार पडला होता, छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रमाणेच भव्य आणि उत्साहात साजरा करण्यात आला होता.
छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्याभिषेकाचे महत्व
छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांच्या कारकिर्दीत दाखवलेले शौर्य आणि दिलेले योगदान लक्षणीय आहे. म्हणूनच संभाजी राजे राज्याभिषेक हा उत्सव छत्रपतींच्या अनुयायांसाठी महत्त्वाचा मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी राजे यांनी अडचणीच्या काळात मराठा साम्राज्य ताब्यात घेतले. त्याची कारकीर्द प्रामुख्याने मराठा राज्य आणि मुघल साम्राज्य, तसेच गोव्यातील सिद्दी, म्हैसूर आणि पोर्तुगीज यांसारख्या शेजारील सत्ता यांच्यात सुरू असलेल्या युद्धांना तोंड देण्यात गेली.
छत्रपती संभाजी राजे यांचे शौर्य
मात्र, चारही बाजूने शत्रूने वेढलेले असतांना अशा परिस्थितीतही संभाजी राजांनी धैर्याने लढा दिला हे सर्वज्ञात सत्य आहे. मुघल सम्राट औरंगजेबच्या अनेक वेळा पकडण्याच्या प्रयत्नातून ते बचावला आणि मराठा ध्वज मानाने उंच फडकत ठेवला. 1689 मध्ये जेव्हा संभाजी महाराज कपटाने पकडले गेले तेव्हाही संभाजी महाराज यांनी स्वतःवर होणार्या छळ आणि अत्याचाराविरुद्ध धैर्याने लढा दिला. शेवटी 11 मार्च 1689 रोजी त्यांचे कैदेत असतांना वीर मरण आले, परंतु इतिहासकार म्हणतात की मृत्यूला सामोरे जात असतानाही त्याने अनुकरणीय धैर्य दाखवले. मराठा राज्याचे दुसरे छत्रपती संभाजींची ही प्रेरणादायी कथा संभाजी राजे राज्याभिषेक उत्सवाला महत्त्वाची बनवते.
Chatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Quotes In Marathi

हिमालयाएवढे शौर्य असलेले
महापराक्रमी,
छत्रपती संभाजी महाराज
यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा!
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din
मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती
श्रीशंभुराजे यांना राज्याभिषेक
दिनानिमित्त मानाचा मुजरा!
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din
छत्रपती संभाजी राजे यांना
राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार वंदन!
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din
कोंढाण्यासाठी तानाजी गेला
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला…
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी
स्वराज्य रक्षक संभाजी झाला…
राज्याभिषेक दिनानिमित्त
श्रीशंभुराजेंना त्रिवार अभिवादन!
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din
स्वराज्याच्या मातीसाठी अमर झालेले
छत्रपती संभाजी राजे यांना
राज्याभिषेक दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
जो आत्मविश्वास जागा करतो तो संभाजी, जो स्वतःला ओळखतो आणि मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतो तो संभाजी
प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनाचे सदा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म सईराणीच्या पोटी, हे संभाजी राजा प्रणाम तुजला जन्माोजन्मी कोटयान कोटी…
पाठीवर शिवाजी आणि छाताडावर संभाजी कोरलाय, अन जीवाचं नाव भंडारा ठेवलंय, उधळला तरी येळकोट आणि नाय उधळला तरी बी येळकोटच…!
सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी, लाखात एक असे लाख मोलाचे अमुल्य शिवरत्न म्हणजे… छत्रपती संभाजी महाराज
पौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय!!!
छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे पुत्र संभाजीराजे. लहानपणीच आईचे छत्र हरपल्याने त्यांचा सांभाळ जीजाऊ आणि शिवाजी महाराजांनी केला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. दरम्यान, छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर बाल राजाराम यांना गादीवर बसवून स्वार्थी दरबारी मंत्र्यांनी राज्यकारभार आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना त्यात अपयश आले आणि स्वराज्याला संभाजी राजांच्या रुपात दुसरे छत्रपती लाभले.