100+ मातृदिन शुभेच्छा 2024 | Mothers Day Quotes In Marathi

Mothers Day Quotes In Marathi : “मातृदिवस हा आपल्या आईच्या अद्वितीय प्रेमाला वंदन करण्याचा विशेष दिवस आहे. ‘Mothers Day Quotes In Marathi‘ मध्ये आपल्याला आईच्या प्रेमाची, त्यागाची आणि अपार काळजीची झलक मिळेल. ‘Mothers Day Quotes In Marathi‘ आपल्या भावनांना शब्दांचे स्पर्श देतात आणि आईच्या निःस्वार्थ प्रेमाचा जाणीव करून देतात. आईच्या प्रेमाचे वर्णन करणारे हे सुविचार आपल्या हृदयाला भिडतील आणि आपल्या आईच्या महत्वाचा शाश्वत संदेश प्रेषित करतील.”

मातृदिन शुभेच्छा 2024 | Mothers Day Quotes In Marathi
मातृदिन शुभेच्छा 2024 | Mothers Day Quotes In Marathi

Mothers Day Quotes In Marathi

आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात
मेतकूट कालवलेला मऊ तूपभात,
आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र
सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र,
शांताबाई शेळके
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

‘ठेच कान्हूला लागली, यशोदेच्या डोळा पाणी
राम ठुमकत चाले, कौसल्येच्या गळा पाणी,
देव झाला तान्हुला ग, कुशीत तू घ्याया,
तिथे आहेस तू आई, जिथे आहे माया’
मंगेश पाडगावकर
मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

‘दिला जन्म तू विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये सुखे साहिलेस,
जिण्यालागी आकार माझ्या दिलास,
तुझ्या वंदितो माउली पाऊलांस’
ग. दि. माडगूळकर
मातृदिनाच्या शुभेच्छा!

Mothers Day Quotes In Marathi

आईचे प्रेम हे कोणत्याही नव्या फुललेल्या
फुलांपेक्षाही अधिक सुगंधित असते
देवाशिष मृधा

जेव्हा तुम्ही तुमच्या आईकडे पाहता…
तेव्हा जगातील सगळ्या शुद्ध गोष्टीकडे तुम्ही पाहता
चार्ली बेनेटो

दिवस सुरु होतो तुझे गोड तोंड पाहून
जॉर्ज इलिएट

आईपण हे एखाद्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते
ऑलिव्हर होम्स

Mothers Day Quotes In Marathi

लेकराची माय असते, वासराची गाय असते,
दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते, आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही’
फ. मु. शिंदे
मातृदिनाच्या शुभेच्छा!

फक्त आईच भविष्याचा विचार करु शकते
कारण ती एका नव्या जीवनाला आयुष्यात आणत असते
मॅक्झिम ग्रोस्की

Mothers Day Quotes In Marathi

‘आई माझा गुरू, आई माझे कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे’
साने गुरूजी
मातृदिनाच्या शुभेच्छा!

कौसल्येविण राम न झाला, देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवराजाचे चरित्र घडवी माय जिजाबाई
नकोस विसरू ऋण आईचे, स्वरूप माऊली पुण्याईचे
थोर पुरुष तो ठरून तियेचा होई उतराई
ग. दि. माडगूळकर
मातृदिनाच्या शुभेच्छा!

Mothers Day Wishes In Marathi

आई तुला किती काय काय सांगायचे असते..
तुझ्यावरचे माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते..
पण तुला पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्या कुशीत राहायचे असते.
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई तुझ्या मूर्तीवाणी..
या जगात मूर्ती नाही..
अनमोल जन्म दिला
आई तुझे उपकार
या जन्मात तरी फिटणार नाही – Happy Mother’s Day

ओरडाही तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे,
ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
जी आहे माझी आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सगळे दिले मला आयुष्याने …
आता एकच देवाकडे मागणे..
प्रत्येक जन्मी मला हीच आई मिळो
या पेक्षा अजून काय हवे –
Happy Mother’s Day

पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,
जिने जन्म दिलाय मला तिला कायम सुखी ठेवा
– Happy Mother’s Day

माझ्यासाठी कायम भक्कम उभी राहणारी व्यक्ती म्हणजे माझी आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्रीचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि चांगुलपणाचा अर्थ शिकवणारी पहिली व्यक्ती म्हणजे आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

यशाच्या शिखरावर येण्यासाठी तूच माझी कायम प्रेरणा होतीस…
आई तुझ्याशिवाय मी काहीच नाही
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Status In Marathi

गुतंलेले तुझे हात
नेहमीच व्यस्त असतात कामात,
तुझी अंगाई ऐकावया,
घेऊन येई रात्र,
मातृदिनाच्या शुभेच्छा

ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या ह्रदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी आई,
मातृदिनाच्या शुभेच्छा!

कोठेही न मागता भरभरुन मिळालेले
दान म्हणजे ‘आई’,
विधात्याच्या कृपेचे निर्मळ वरदान म्हणजे ‘आई’
मातृदिनाच्या शुभेच्छा!

तुझ्या गर्भात नक्कीच स्वर्ग असावा
म्हणूनच वाटे तुझ्या कुशीत घ्यावा विसावा,
समस्त मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा!

आई, आभाळाएवढी
माया जिची,
ईश्वरासमान कृपा तिची,
मातृदिनाच्या शुभेच्छा!

तिच्या मांडीवर डोकं ठेवून
अश्रूंना वाट मोकळी करुन द्यावीशी वाटते,
पण तिचे आलेले अश्रू आठवताच
मी मुक्याने माझे अश्रू गाळून टाकतो,
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा

आई तुझ्या संस्कारातून
कोवळ्या रुपाचे झाले तरु,
मी कसा गं विसरेन तुला,
तुझ्याचमुळे मी झालो यशस्वी,
मातृदिनाच्या गोड शुभेच्छा!

आई,
आमची सर्वप्रथम गुरु,
तुझ्याचपासून माझे अस्तित्व सुरु,
मातृदिनाच्या शुभेच्छा!

हजार जन्म गेले तरी,
या एका जन्माचे ऋण कधीच फिटणार नाही,
आई लाख चुका होतील माझ्याकडून,
पण तुझं समजावणं काही मिटणार नाही, मातृदिनाच्या शुभेच्छा!

जगात अशी कोणती गोष्ट आहे जी मिळत नाही
बाकी सर्व मिळू शकतं पण आई कधीच मागून मिळत नाही
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला.
आई मी भाग्यवान आहे की,
मी तुझ्या पोटी जन्म घेतला
मातृदिनाच्या शुभेच्छा!

हंबरूनी वासराला जेव्हा चाटते गाय
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय
मातृदिनाच्या शुभेच्छा!

तू माझी जिवलग मैत्रीण आहेस आहे.
मला हे आयुष्य दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
आणि तुला मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Mother Day In Marathi

आईसाठी अजून काय काय करता येईल
असा विचार करत असाल तर तिच्यासाठी
या मदर्स डे ला काही खास मेसेज लिहा
आणि तिला सरप्राईज द्या. असेच काही खास मेसेज आईसाठी
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उन्हामधली सावली तू
पावसातली छत्री तू
हिवाळ्यातली शाल तू
माझ्यासाठी आहेस सर्वकाही तूच
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Mother Day In Marathi

माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही
कितीही कामात असली तरीही मला फोन करायचे विसरत नाही
कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही
म्हणून तर आई मला तुला सोडून कुठेच जावेसे वाटत नाही
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जगी माऊलीसारखे कोण आहे
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही
या ऋणाविना जीवनास साज नाही
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दुःखाचा डोंगर असो की सुखाची बरसात
आठवते ती एकच व्यक्ती कायम जिचा हवा सहवास…
अशीच ती आपली आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Mother Day In Marathi

दोन शब्दात सारं आकाश सामावून घेई
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई – आई तुला हॅप्पी मदर्स डे

हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचेही ऋण फिटणार नाही
आई लाख चुका होतील माझ्याकडून
पण तुझं समजावणं कधीच मिटणार नाही
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई म्हणजे स्वर्ग
आई म्हणजे सर्व काही…
कितीही जन्म घेतले तरी
तुझे ऋण फेडू शकणार नाही
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

फुलात जाई, प्रार्थनेत साई
पण जगात सगळ्यात भारी आपली आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आई म्हणूनच मी आहे
ती आहे म्हणूनच ही सुंदर नाती आहेत
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Mother Day In Marathi

ती असताना कधीच आयुष्यात उदासीनता येत नाही
कारण जगात कोणीही सोबत दिली नाही
तरी ती मात्र खंबीरपणे सोबत असते…
आई तुला माझे शतशः प्रणाम
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

एकमेव कर्ज प्रत्येक माणसावर आयुष्यभर असतं
कारण ते कधीच फेडता येत नाही आणि ते म्हणजे आईचं प्रेम…
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हीच इच्छा माझी की, कितीही वेळा होईल जन्म माझा
तूच हवीस कारण तू आहेस माझा जन्मोजन्मीचा ठेवा
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई तुझ्याशी आहे असे अतूट नाते
तू हसल्यावर मीदेखील हसते
तुला उदास पाहिल्यावर
मन माझे रुसते
नेहमी राहा आनंदी, तुझ्यासाठी जिंकेन जग मी
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Mother Day In Marathi

ज्याला आई असते तोच खरा भाग्यवान – मातृदिनाच्या शुभेच्छा!

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तू आहेस म्हणून मी आहे
तुझ्याशिवाय माझे अस्तित्व बेकार आहे
गृहीत तुला धरलं तरी माफ करतेस मला
आहेसच तू मूर्तीमंत देवता…

Happy Mother Day In Marathi

ज्या माऊलीने दिला मला जन्म
जिने गायली अंगाई
आज मातृदिनाच्या दिवशी
नमन करतो तुजला आई…
मातृदिन शुभेच्छा

देवाकडे एकच मागणे, भरपूर आयुष्य लाभो तिला
माझ्या प्रत्येक जन्मी, तिचाच गर्भ दे मजला….मातृदिन शुभेच्छा

Happy Mother Day In Marathi

आईची ही वेडी माया
लावी वेड जीवा
जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा
माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
आईच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
आई साठी विशेष मराठी स्टेटस
मुलींसाठी एटीट्यूड स्टेटस

Mother’s Day Caption In Marathi

आई ही एकच अशी व्यक्ती आहे
जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक तुम्हाला ओळखत असते
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी
कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात अनेक जण येतात जातात
पण आईसारखं कधीच कोणी आयुष्यात राहात नाही
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!!!
मदर्स डे च्या निमित्ताने फक्त माझे तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करत आहे….आई कायम हसत राहा
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही,
म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकता येते अ, आ, ई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

विधात्याची एक उत्तम कलाकृती तू
अशी कलाकृती इतर कोणी निर्माणच करू शकत नाही
तुला शतशः प्रणाम आई…
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते
डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते …
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई…
मातृदिनाच्या शुभेच्छा!

Leave a Comment