Marathi Kavita On Love

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी प्रेम कविता

जर का तुम्ही मराठीमध्ये Marathi Kavita On Love शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन कविता मराठी प्रेम रंग मराठी कविता, Marathi Love Poemes, Heart Touching Love Poems in Marathi चे अपडेट्स मिळतील. आणि हो तुम्ही Romantic Love Quotes Marathi हे पण वाचू शकतात.. त्याच सोबत तुम्ही Love Quotes in Marathi हे पण वाचू शकतात शेअर देखील करू शकता.

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

तुझ्या आठवणी म्हणजे… मोरपिसाचा हळूवार स्पर्श .
तुझ्या आठवणी म्हणजे… नकळत निर्माण होणारा हर्ष .
तुझ्या आठवणी म्हणजे… स्वप्नांनी सजवलेलं एक गाव .
तुझ्या आठवणी म्हणजे… विरह सागरात हरवलेली नाव .
तुझ्या आठवणी म्हणजे… आयुष्य जगण्याची आशा आणि ,
तुझ्या आठवणी म्हणजे… गमवलेल्या गोष्टींची निराशा .
तुझ्या आठवणी म्हणजे… पावसात चिंब भिजणं .
तुझ्या आठवणी म्हणजे… ओसाड वाळवंटात एकटच भटकणं .
तुझ्या आठवणींशिवाय आयुष्यच अर्थहीन आहे ,
तुझ्या आठवणींचा सहवास हाच माझ्या आयुष्याच रंग आहे…..!!!

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर ‘चल’ म्हणाली,
‘हो’ म्हणायच्या आतंच ती देऊन हात, घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत, कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत नभी चांदणे,
चंद्रासंगत गोड गप्पा नव्हत्या थांबत सुरेल आवाज जणू कोकिळेगत मौनामधे भासे
दिव्य एक रंगत अनवट सूर, बासरीचे उमलत हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची तरूतळी एका आम्ही बसलो मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात परि नजर थेट डोळ्यात
काय झालं पूढे सांगत नाही स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी, प्रेमामधे तर पडलो नाही….

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

तुज्यासाठी शब्दच सापडत नाही .
तुज्यावर खुप दिवसांपासून लिहायचे म्हणतो
पण तुज्यासाठी शब्दच सापडत नाही
तुजा विषय निघाला की शब्दच हरवतात।
कारण तेव्हा मी, मी नसतो , आसमात तुला शोधत भरकटत असतो
तू नसुनही कायम बरोबर असतेस
पाहतो जेव्हा चंद्र तेव्हा तू तिथे दिसतेस
आनंदाच्या वेळी तूझा बेभानपणा भासतो
निराश मनाची समजूत काढनारी तूच असतेस
तूझी प्रतिमा मी रोज रंगवत असतो,
तुज्याशी मी रोज बोलत ही असतो,
थट्टा-मस्करी आणि भांडण ही होते
तरीही तू कोण आहेस? कुठे आहेस? कशी आहेस?
एक ना अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत
पण एक दिवस टू समोर येणार आणि
तेव्हा मात्र शब्दांचा मुसळदार पाउस पडणार..

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
नजरेला आस तुझी
ओढ हृदयास तुझी
आतुर हे नयन माझे झलक पाहण्यास तुझी
पाहण्याचा तुला रोज शोधतो मी पर्याय,
कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
दिन रात भास तुझा, मनाला या ध्यास तुझा.
हवाहवासा ग वाटे मला सहवास तुझा,
तुझी साथ जीवनात हवी आता, ग जगाय कस सांगू तुला,
मनात माझ्या काय ? कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
देईन तुला सुख सारे, नाही याची देत हमी, पण प्रेमात नाही राहणार कधी कोणतीही कमी.
तुझी साथ नशिबात असो किंवा नसो,
पण पाहवेना मला तुझ्या नयनात नमी ,तुझ्या खुशीतच माझी ख़ुशी जणू.
काय कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
आयुष्यात माझ्या मला खुश तुला पहायचय, तुझ्या सोबत जगायचय, तुझ्या सोबत मारायचाय.
स्वप्न माझी पूर्ण होण्यास तुझा होकार हवाय,
कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

फक्त तू नकोस मला
साथही तुझी हवी आहे
शांत स्थळी एकांतवेळी
प्रीत तुझी हवी आहे
शृंगार प्रेम नको मला
वात्सल्य प्रेम हव आहे
सांजवेळी सूर्यास्ताला
प्रेमगीत हव आहे
दवबिंदू नकोत मला
रिमझिम पाऊस हवा आहे
रानफुलाला सुखावणारा
गार वारा हवा आहे
फक्त शब्द नकोत मला
अर्थ त्यातला हवा आहे
तिमिरातून तेजाकडचा
मार्ग त्यातून हवा आहे
सृष्टी सारी नको मला
द्रुष्टी तुझी हवी आहे
तुझ्या डोळ्यात दिसणारा
विश्वास मला हवा आहे
तुझा दुरावा नको मला
सहवास तुझा हवा आहे
खचनाऱ्या माझ्या मनाला
आधार तुझा हवा आहे
क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तू हवा आहेस
वेळ तुझी नको मला
वेळीस तू हवा आहेस.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपित लपलय.
तुझ्या माझ्या मैत्रीने फकत आपलेपण जपलंय .
नात्यांचे स्नेह बांध कोण शोधत बसलय.
जीवा पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलय .
दरवलनारया सुगंधाला कोणी कैद केलय.
तुझ्या माझ्या मैत्रीने सार जग व्यापलय.

Marathi Kavita On Love
Marathi Kavita On Love

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

वेळ असेल तुला तर एकदा मला भेटशील का?
दोन शब्द बोलायच होत थोड ऐकून घेशील का?
पहिला तू माझ्याशी खुप काही बोलाय्चास,
वेळ नसला तरी माझ्यासाठी खुप वेळ काढ़ाय्चास,
तासन तास माझ्याशी खुप गप्पा मारायचास,
नसले विषय तरी नविन विषय काढ़ायाचास,
काही ही बोलूंन मला खुप खुप हसवाय्चास,
माझा फ़ोन एंगेज असला की खुप खुप रागवाय्चास ,
दिवस भर माझ्याशी कट्टी फू करायचास ,
आता कशाला आमची गरज पडेल अस सारख चिडवाय्चास,
माझा चेहरा पडला तर खुप नाराज होय्चास,
हळूच जवळ घेउन सॉरी बोलायचास,
आज ही मला तुझा सारखा होतो भास् ,
कारे असा वागतोस का देतोस त्रास ?
नाही पुन्हा भेटणार एकदा बंद पडल्यावर श्वास,
एकदाच भेट मला पुन्हा नाही देणार त्रास..

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

प्रेम करतोस ना तिच्यावर,
मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव,
तिने ही कराव प्रेम म्हणून
आणायचा नसतो दबाव….
असेल तिचा नकार, तर
तो हि तू हसत स्विकार,
तिलाही आहे ना स्वत:चा
निर्णय घेण्याचा अधिकार…
नाही म्हणाली तर तूझ्या
प्रेमाने नकाराला होकारात बदल,
का नाही म्हणाली याचा विचार
करुन आधी स्वत:ला बदल…
नाही म्हणाली तर तिच्या
नकारावरही प्रेम कराव,
नाही म्हणता म्हणता तिला
प्रेम करायला शिकवाव…
नको रे घेउस तूझ्या वेड्या
हट्टा पाई तिचा बळी,
काय मिळणार तूला तोडून
एखादी उमलणारी कळी…
खरे प्रेम करतोस ना,
मग ठेव सच्ची निती,
कशाला दाखवतोस उगाच
तिला जिवाचि भिती…
तूझे हे सच्चे रुप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार,
तिलाही होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार…
अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तूही घे अवश्य माघार,
कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार…

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

आठवण माझी आली कधी
तर पापण्या जरा मीटून बघ.
सरलेल्या क्षणांमधले
संवाद जरा आठवून बघ.
आठवण माझी आली कधी
तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ
त्या पाउल वाटेवरती
उमटलेली आपली पाउले बघ.
आठवण माझी आली कधी
तर उडणार्या पक्षांकडे बघ.
त्यांच्यासारखाच माझ मन
तूज्याकडे धावत आलेलं बघ.
आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ.
चांदण्या रात्रि घेतलेल्या शपथेचा
शब्द न शब्द आठवून बघ.
आठवण माझी आली कधी
तर सागरकिनारी जाऊन बघ.
हजारदा किनार्याला मीठीत घेऊन सुद्धा
परतणाऱ्या नीराश लाटेच वीरघळन बघ.
आठवण माझी आली कधी
तर साद मला घालून बघ
तुझ्या अवतीभोवती फीरणार
माझ अस्तित्व जरा जाणवून बघ.
—-अनघा—-

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

तू कॉल करणार होतास
संध्याकाळ होतेय
वादळ घोंघावतंय
मी गच्चीत उभी
मृदगंध नकोसा वाटतोय
त्या दिवशी महत्वाचं बोलणं अर्धच राहिलं..
तू कॉल करणार होतास..
भरलेलं आभाळ गप्पं कोसळतंय
पाकोळ्या भिरभिरताहेत
माझं लक्ष वारंवार फोनकडे
गार वारा झोंबतोय
बिझी असशील पण तरीही..
तू कॉल करणार होतास..
शेवटचा किरण धरतीला भेटून चाललाय
पक्षी घरट्याकडे निघालेत
घरांमध्ये दिवे लागलेत
ओला पाऊस जाळतोय
मीच कॉल केला असता पण..
तू कॉल करणार होतास..
झाडांमध्ये रात्र विसावलीय
विजा चमकताहेत
मी अजूनही गच्चीवरच
टिटवीचा आवाज छळतोय
तुला ठाऊक आहे,मी काळजी करते..
तू कॉल करणार होतास..

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

सगळीकडे अंधार झालाय अन चिखलही
एकेक पायरी उतरणं जड जातंय
स्वप्नात तरी भेटशील ?
ठीक आहे,आज नाही तर पुन्हा कधीतरी..
तू कॉल करणार होतास..
पण,कदाचित डेड असेल..फोन….की….आपलं नातं ?
आज तु मनात विचार करशील कोण मी
अर्थातच निदान आज तरी कोणी नाही
मन म्हणेल हा उगाच त्रास देतोय मेला
आज मी स्वर्गात आहे, इथं जिवंत कोणी नाही
आज तु म्हणशील कधी भेटली मी याला
तुला आठवेल न आठवेल पण आठवतय मला
तु म्हणशील असं का म्हणुन सतवतोस तु मला
खरंच मला माहित नाही कोण जबाबदार याला
ओठांवर थोडसं हसु तरी आलं असेल कवितेसाठी
खरंच नसेल आवडत तर तसं सांग तु माझ्यासाठी
तुल त्रास होत असेल तर सोडेन मी लिहिणं कविता
रात्र जागुन लिहितोय ह्या कविता अखेर तुझ्यासाठी ….

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते
अरे हळु, ही गोष्ट फक्त स्वत:शी बोलायची असते
लग्नाची असली तरी ती फक्त बायको असते
आपली मस्तानी कोणालाच सांगायची नसते
लोक म्हणतात हा व्यभिचार आहे
जानून बुजुन केलेला एक अविचार आहे
बोलनारे लोक खोटारडे असतात
स्वतः पासून सुध्हा काही तरी लपवत असतात
करतील तरी काय , सगळेच बाजिराव नसतात
लोक नेहेमी असेच वागतात ,
बजिरावाचे प्रेम ग्रेट म्हणतात
तुमच्या आमच्या चारित्र्यावर शिन्तोडे उड़वतात
येता जाता नैतीकतेचे डोस पाजतात
प्रत्येकाला ठाऊक असते मस्तानी आपली होणार नाही ,
सगळ्याचेच नशीब काही तेवढे थोर नाही
तरी ही आपली मस्तानी जपायची असते
मनाच्या कप्प्यात खोल खोल दडवायची असते !!
…………… आभार – कवी आणि सुरिंदर

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी
कोण जाणे ती परी दिसते तरी कशी
आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा
पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या
बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं
का कोण जाणे काय जादू आहे तुज्यात…
कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात
तुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं
बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान
तुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा …

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देसील का?
माझ्या मनाच्या कोपऱ्यात
नयनांच्या माझ्या पापण्यात
थोडा वेळ विसाव्शील का ?
माझ्या मनातील ………………….
तुझ्या एका नजरे साठी
असतो सदा तुजपाठी
मज भरकटलेल्या जीवना मार्गावर आणशील का?
माझ्या मनातील……………..
एकच ध्येय माझ्या जगण्याचे
तुला माझी झालेली बघण्याचे
करण्या मज इच्छा पुरती तू पुढे येशील का?
माझ्या मनातील…………
तुझ्यात असतो मी गंभीर
करतेस मज तू अधीर
शेवटचे मागणे हाती हात देशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?
….कवी: म.श.भारशंकर

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

किती? वाट बघावी तुझया या चाहुलीची,
नको बघू अंत आता माझया आशेची.
दूर दूर राहून वेडापिसा झालो आहे,
सहन नाही होत,
तुझया प्रेमात वेडा झालो आहे.
प्रत्येक पाउली तूच असावी,
अशी इच्छा आहे आता.
लवकर येऊन भेट मला,
खूप लागली आहे आतुरता.
डोळे मिटून तूच दिसते,
डोळे उघडून पण तुझीच आस असते.
जेव्हा माझी पापणी लावते,
त्याक्षणी तु इथे नसल्याची
जाणीव होते.

प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love

कळत नकळत सगळ घडत होते,
आणि मी तुझ्यात गुंतत होते
चेहर्‍यावरचे हसू सुद्धा तूच,
आणि डोळ्यातले अश्रू सुद्धा तूच
जीवनाचे गाणे सुद्धा तूच,
आणि मनातले तरंग सुद्धा तूच
माझा श्‍वासही आहेस तूच,
आणि माझी रासही आहेस तूच
जीवनाला अर्थही आहेस तूच,
आणि जीवनातला पार्थही आहेस तूच
माझ्या जीवनाची दिशा ही तूच,
आणि माझ्या जगण्याची आशाही तूच
मी सुद्धा तुझीच आहे,
आणि फक्त तुझीच आहे……………
– उज्वला राउत

Leave a Comment