Bhagwan Baba : आबाजी तुबाजी सानप (29 जुलै 1896 – 18 जानेवारी 1965), ‘ भगवान बाबा’ म्हणून प्रसिद्ध , यांचा जन्म सावरगाव घाट तालुका, पाटोदा जिल्हा, बीड येथे झाला. , ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रसिद्ध संत होते.
संत भगवान बाबा माहिती,जयंती | Bhagwan Baba
कोण होते भगवान बाबा ?
भगवानबाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. ते मूळचे सावरगाव घाट येथील. त्यांनी या धौम्यगडावर येऊन सातत्याने कीर्तन, प्रवचन केले. या ठिकाणीच त्यांनी दिंडी सोहळ्यांना सुरुवात केली. त्यामुळे धौम्यगड हा बीड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आला. भगवानबाबांचे निधन 1965 साली झाले. (Bhagwan Baba) त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली. त्यानंतर 2003 पासून नामदेव महाराज शास्त्री हे गडाचं काम पाहत आहेत.
जन्म आणि बालपण
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव येथे श्रावण वद्य पाच शके १८१८ (२९ जुलै, इ.स. १८९६), सोमवार रोजी सूर्योदयाच्या समयी संत भगवान बाबा चा जन्म झाला. बारशाच्यावेळी मुलाचे नाव ‘आबा’ किंवा ‘आबाजी’ ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप. ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते.
गावात चौथीपर्यंत शाळा होती. तेव्हा गुरुजींच्या सांगण्यावरुन पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी लोणी, ता. शिरूर, जि. बीड येथे पाठवले गेले. अधिक शिक्षणसोयी नसल्याने आबाजी पुन्हा गावाकडे परत आला. ग्रामीणभागात रीतीरिवाजानुसार गुरेढोरे राखायला जात. आबाजीला शेती व गुरांची निगराणी राखायला फार आवडत असे. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे उपजतच आबाजीला आध्यात्मिक ज्ञानाची व विठ्ठलनामाची आवड निर्माण झाली. आबाजी घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठलभक्ती करीत असे. त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत प्रथम दिंडीस गेले.
‘पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले तर जीवनाचे कल्याण होते’ अशी त्यांच्या परिवारात आणि आसपासच्या समाजात समजूत असल्याने त्यांनी गीतेबाबा दिघुळकरांसोबत पंढरपूरची वारी केली. त्यासाठी ते वयाच्या ५-६व्या वर्षी घर सोडून पायी चालत पंढरपूरला गेले. पहिल्या वारीच्या शेवटीच पंढरपुरात पोहोचल्यावर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. त्यांनी गीतेबाबानाच आध्यात्मिक गुरू मानले. पंढरपूरच्या वारीवरुन गावी परतल्यावर आबाजी घरी परत गेला नाही. गावातील हनुमान मंदिरात जाऊन बसला. घरच्यांना ही बातमी कळताच ते मंदिरात आले. तेव्हा लहान आबाजीने तुळशीमाळ घालण्यासाठी आग्रह केला. लहान आबाजीचे भगवंताविषयी असलेले प्रेम पाहून घरच्यांनी आग्रह स्वीकारला आणि नंतर आबाजी घरी परत आला.
आबाजीचे पूर्वज हे लहानपणापासून नारायणगडाचे उपासक होते. नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंशपरंपरागत गुरू होते. तत्कालीन नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा होते. आबाजीचे आईवडील नेमाने माणिकबाबाच्या दर्शनासाठी नारायणगडावर येत. एकदा आबाजीचे आईवडील त्याला घेऊन (Bhagwan Baba) विजयादशमीच्या दिवशी नारायणगडावर आले. आबाजीने माणिकबाबांना गुरूपदेश द्या असे म्हटले. त्यावर अल्पवयात गुरूपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले, पण आबाजीच्या मनाचे समाधान झाले नाही. माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले म्हणून माणिकबाबांनी आबाजीला अनुग्रह दिला आणि गुरूपदेश केला. नंतर माणिकबाबांनी आबाजीचे नाव ‘भगवान’ ठेवले.
असे सांगितले जाते की पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिकबाबांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले. माणिकबाबा हे त्यांचे गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील ह.भ.प. श्री बंकट स्वामी यांच्याकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले. त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.
ऊसतोड कामागारांचं श्रद्धापीठ
भगवानगड हा ऊसतोड कामगारांचं श्रद्धापीठ आहे. तसेच वंजारी समाजाचं धार्मिकस्थळ आहे. राज्यातील सुमारे 45 मतदारसंघात भगवानगडाचे भक्त राहतात. भगवानगडावर पूर्वीपासून लोक येत होते. मात्र, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भगवानगड अधिक चर्चेत आले. गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात जसजसा उदय झाला तस तसं मुंडेंमुळे भगवानगडाचा लौकीकही वाढला.
दसरा मेळाव्याची परंपरा
भगवान गडावरील मेळाव्याला 50 वर्षाची परंपरा आहे. स्वत: गोपीनाथ मुंडे 35 वर्ष हा मेळावा घेत होते. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. राज्याचे पहिले (Bhagwan Baba) मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवानबाबांनी पहिला दसरा मेळावा घेतला होता.
Bhagwan Baba Quotes In Marathi | श्री संत भगवान बाबा जयंती शुभेच्छा
आदर्श समाज सुधारक राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
।। बैसोनी पाण्यावरी
वाचली ज्ञानेश्वरी।।
आदर्श समाज सुधारक राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवटीच्या आंगीं थोरी | तरी ते बहु तेज धरी |
वाती आपुलिया परी | आणीच कीं ना ? ॥
बैसुनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी…
आपले बाबा.. ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा..