Teachers Day Essay - शिक्षक दिन निबंध

Teachers Day Essay – 2023 शिक्षक दिन निबंध

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी निबंध

Teachers Day Essay – 2023 शिक्षक दिन निबंध

Teachers Day Essay – शिक्षक दिन निबंध : आज ५ सप्टेंबर. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतिदिन. हा दिवस आपल्या भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ५ सप्टेंबर १८८८ रोजी डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म झाला. डॉ. राधाकृष्णन हे एक शिक्षक होते तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपती ही होते. त्यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

आजच्या दिवशी शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो. शिक्षकांचा सन्मान करण्याची ही परंपरा जुनी आहे. शिक्षक म्हणजे तरी काय?

शि म्हणजे शिल
क्ष म्हणजे क्षमा
क म्हणजे कला


ज्याच्याकडे शिल, क्षमा आणि कला याचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक. डी. एड किंवा बी.एड ची डिग्री घेऊन आपण आपल्या नावापुढे शिक्षक हे लेबल पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की खरंच झालोय का मी शिक्षक?

ज्याप्रमाणे मूर्तिकार आपल्या मूर्तीला योग्य आकार देऊन तिला सुंदर बनवतो त्या प्रकारे आपले आई वडील हे आपल्या मुलाला आकार देऊन योग्य दिशा दाखवत असता, मुलांना चांगले वळण लावणे आणि त्याचे व्यक्ती महत्व विकसित करत असतात, आई वडील हे विध्यार्थाचे पहिले गुरु असतात आणि शिक्षक हे विध्यार्थाचे दुसरे गुरु. आणि शिक्षक हे आपल्याला पुस्तकी ध्यान न देता पुस्तकाबाहेरील जगाशी आपला संबंध जोडतात.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

खरं तर शिक्षक हा लाखो करोडो मन घडविणारा शिल्पकारच! कुंभार जसा फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन मडकं घडवत असतो तेच काम शिक्षकाच आहे. काही लोक बोलताना माझे विद्यार्थी असा उल्लेख करतात. त्यात चुकीचं काहीच नाही पण माझी मुलं कानाला ऐकायला जास्त बरं वाटतं. माझी मुलं म्हणण्यात जो गोडवा आहे तो विद्यार्थी म्हणण्यात नक्कीच नाहीये. असो हा वादाचा मुद्दा आहे.

शिक्षक प्रत्येक विद्यार्थाला नेहमी प्रेरणा देऊन मानसिक बाळ वाढवतात, आयुष्यात प्रत्येक टप्यावर शिक्षकाचे मार्गदर्शन मोलाचे ठरते.

Teachers Day Essay - शिक्षक दिन निबंध
Teachers Day Essay – शिक्षक दिन निबंध

शिक्षक असणं हा नोकरी व्यवसायाचा भाग म्हणून पाहिलं तर आपण एक आदर्श शिक्षक कधिच बनू शकणार नाही. जोवर शाळेतील मुलांना आपण आपली मुलं म्हणून पहात नाही तोवर आपण शिक्षक झालो असं म्हणतात येणार नाही. मागे कोणीतरी म्हंटलेलं ऐकलं की शाळेतली मूलं आहेत म्हणून आपली मुलं शिकतात मी तर म्हणेन ती मुलं आहेत म्हणून आपली मुलं जेवतात. आपलं पोट भरण्याचं साधन जर आपली नोकरी असेल तर आपली मुलं त्याचा पाया आहे. शेवटी काय हो मुलं आहेत म्हणून शाळा आहे आणि शाळा आहे म्हणून आपण आहोत. हे असंच सूत्र आहे. मग आपलं काम तेवढ्याच आत्मीयतेने, प्रामाणिकपणाने करणं क्रमप्राप्त आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनी चे मालक शिक्षणाचे महतव सांगताना म्हणतात कि तुमच्या मुलांना चांगले शिक्षण द्याचे असेल तर महागडे शाळा शोधण्यापेक्षा एक आदर्श शिक्षक शोधा, आपल्या कडे पैसे संपत्ती पेक्षा चांगले संस्कार असणे महतवाचे आहे, आपल्या देशामध्ये गुरु आणि शिष्य याची परंपरा महान आहे.

आजही खेड्यापाड्यात आणि आदिवासी विभागात कठीण परिस्थि चा सामना करून ज्ञानाचे प्रवित्र कार्य निसवर्थ पणे पार पाडत आहे , अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचा भावी आयुष्यासाठी अहोरात्र झटत आहे, शाळेचा दर्जा वाडवण्याकरिता अतोनात प्रयन्त करीत आहे, या दिवशी आदर्श शिक्षकांना शासनातर्फे पुरस्कार हि दिला जातो.

पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आपण आदर्श नको बनुयात. आपण आपल्यालाच आदर्श घालून घेतला तर पुरस्कार काय हो लाखो सत्कारमूर्ती तयार करू शकतो. कधीतरी आपल्या शाळेतला एखादा जुना मुलगा भेटतो आपल्याला बऱ्याच वर्षांनी आणि त्याचं यश ऐकत असताना आपसूकच उर भरून येत असतो आपला. अहो मग हाच तर सर्वोत्कृष्ट पुरस्कार असतो अपल्या आयुष्यातला.

गुरुविण न मिळे ज्ञान
ज्ञानवीन न होई जागी सन्मान
जीवन भर भवसागर तारया
चला वंदू गुरुराया

असे अनेक पुरस्कार मिळवण्यासाठी आणि आपलं काम प्रामाणिकपणे करण्यासाठी सर्व शिक्षक मित्रांना खूप खूप शुभेच्छा!!

Teachers Day Essay

आयुष्याला आकार,आधार आणि
अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक
गुरुवर्यास शतशः नमन…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

जगण्याची कला शिकवतात शिक्षक
ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक
फक्त पुस्तक असून नाही काही फायदा
जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा 2023

Teachers Day Essay

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवनभवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Comment