Sant Tukdoji Maharaj Information In Marathi : संत तुकडोजी महाराज यांचे जीवनचरित्र आणि माहिती तुकडोजी महाराज हे महाराष्ट्र, भारताचे संत होते. माणिक बंडोजी इंगळे हे त्यांचे पहिले नाव. अमरावती जिल्ह्यातील यावली गावात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अडकोजी महाराजांचे ते शिष्य होते.
Sant Tukdoji Maharaj Information In Marathi
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची थोडक्यात माहिती
नाव | माणिक बंडोजी इंगळे |
जन्म | ३० एप्रिल १९०९, यावली जि. अमरावती |
भाषा | हिंदी, मराठी |
वडील | बंडोजी |
आई | मंजुळाबाई |
साहित्य | ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली,सेवास्वधर्म, राष्ट्रीय |
मृत्यू | १९६८ |
माणिक बंडोजी इंगळे हे तुकडोजी महाराजांचे (Tukdoji Maharaj) पहिले नाव होते. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील यावली गावात १९०९ मध्ये एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. रामटेक, सालबर्डी, रामदिघी आणि गोंदोडा येथील खडबडीत जंगलात ते लहानपणापासून मोठे झाले. अडकोजी महाराजांचे ते शिष्य होते.
तुकडोजी महाराजांना (Tukdoji Maharaj) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रस्तेबांधणीसारख्या सामाजिक सुधारणांमध्ये रस होता. त्यांनी “ग्रामगीता” लिहिली आहे, ज्यात गावाच्या विकासाच्या पद्धतींचा तपशील आहे. त्यांनी सुरू केलेले अनेक विकास कार्यक्रम आजही सुरू आहेत. तुकडोजी महाराजांना भारतीय टपाल विभागाकडून सन्मानित करण्यात आले, ज्याने त्यांच्या सन्मानार्थ स्मरणार्थ तिकीट जारी केले. त्यांच्या सन्मानार्थ पूर्व नागपूर विद्यापीठाचे नामकरण “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ” करण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य
भारत-भ्रमण
तुकडोजी आठ-नऊ वर्षांचे असताना आडकोजी महाराजांचे (Tukdoji Maharaj) निधन झाले. या प्रसंगामुळे तुकडोजी एकदम उदास झाले. मनाच्या अशा अवस्थेतच तुकडोजींनी वयाच्या नवव्या वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि ईश्वरचिंतनासाठी त्यांनी एकांतवास पत्करला. यापुढील आठ-नऊ वर्षे ते जंगलात, रानावनात भटकत राहिले. त्यानंतर ते समाजात परत आले आणि भजने करीत सर्वत्र फिरू लागले. लोकांनाही त्यांची भजने आवडू लागली. याच सुमारास तुकडोजी महाराजांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. या प्रवासात त्यांना देशातील सर्वसामान्य जनतेची दैन्यावस्था जवळून पाहावयास मिळाली.
राष्ट्रीय चळवळीत सहभागी (Tukdoji Maharaj)
तुकडोजी महाराजांच्या भजनांमुळे अल्पावधीतच त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. महात्मा गांधींनीही त्यांना सेवाग्राममध्ये बोलावून घेतले आणि त्यांची भजने ऐकली. तुकडोजींनी सेवाग्राममध्ये सुमारे दीड महिना वास्तव्य केले. या काळात अनेक राष्ट्रीय नेत्यांचा सहवास त्यांना लाभला. त्यातून तुकडोजींच्या मनातही राष्ट्रप्रेम जागे झाले आणि त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रकार्यासाठी जनजागृती (Tukdoji Maharaj)
यानंतर तुकडोजी महाराजांनी भजन व कीर्तन यांद्वारे सर्वसामान्य लोकांत राष्ट्रीय वृत्ती जागविण्याचे आणि त्यांची मने राष्ट्रकार्याकडे वळविण्याचे कार्य हाती घेतले. त्यांच्या प्रचारकार्याने सामान्य लोकांत प्रचंड जागृती घडून आली. हजारो लोक राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्यासाठी पुढे आले. तुकडोजी महाराजांच्या ‘झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना ।’, ‘पत्थर सबही बाँब बनेंगे।‘ यांसारख्या भजनांनी जनतेची मने पेटून उठली.
त्यांच्या झंझावाती प्रचाराची इंग्रज सरकारने इतकी धास्ती घेतली की, त्याने तुकडोजींच्या भजनांवरही बंदी घातली. अखेरीस सरकारने त्यांना अटक करून तुरुंगात डांबले. सन १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीच्या काळात तुकडोजी महाराजांच्या प्रचारकार्यामुळे विदर्भातील अनेक गावांत चळवळीचे लोण पोहोचले आणि त्या गावांनी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महान कामगिरी बजावली.
समाजसुधारणेसाठी प्रयत्न (Tukdoji Maharaj)
तुकडोजी महाराजांनी समाजसुधारणेच्या क्षेत्रातही फार मोठे कार्य केले होते. ‘गोरगरिबांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा’ असे त्यांनी मानले आणि तो संदेश आपल्या हजारो अनुयायांना दिला. दीनदुबळ्यांची सेवा केल्याने, त्यांचे अश्रू पुसल्याने परमेश्वराचे दर्शन तुम्हाला होऊ शकेल, असा त्यांनी लोकांना उपदेश केला. सन १९३५ मध्ये त्यांनी ‘मोझरी येथे ‘गुरुकुंज‘ आश्रमाची स्थापना केली. त्यांचा हा आश्रम जनसेवेचे एक केंद्रच बनले. त्या ठिकाणी त्यांनी लोककल्याणाचे अनेक उपक्रम राबविले.
समाजातील सर्व लोकांनी आपापसांतील भेदाभेद दूर करून बंधुभावाने एकत्र यावे आणि एकात्म समाजाची उभारणी करावी यासाठीही तुकडोजी महाराजांनी प्रयत्न केले होते. आपल्या समाजातील जातीयता नष्ट व्हावी, अस्पृश्यतेच्या प्रथेचे उच्चाटन व्हावे, समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी लोकजागृतीची मोहीम त्यांनी उघडली होती. अस्पृश्यांना सर्वांच्या बरोबरीची वागणूक मिळाली पाहिजे; त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन झाले पाहिजे, असे त्यांनी लोकांना सांगितले. भारतीय समाजातील अनिष्ट रूढी व प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले. व्यसनमुक्ती, पशुहत्याबंदी, यात्राशुद्धी, कुटुंबनियोजन, हुंडाबंदी इत्यादी कार्यांनाही त्यांनी चालना दिली. यावरून त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्याची व्याप्ती किती प्रचंड होती हे स्पष्ट होते.
ग्रामसुधार अभियान (Tukdoji Maharaj)
तुकडोजी महाराजांनी ग्रामसुधारणेची मोहीमही हाती घेतली होती. हिंदुस्थान हा खेड्यापाड्यांनी बनलेला देश आहे. तेव्हा खेड्यांची सुधारणा झाली तरच देशाची प्रगती होईल हे ओळखून त्यांनी ग्रामसुधारणेवर भर दिला. त्यासाठी ग्रामसफाई, गावाचे आरोग्य आणि गावातील लोकांत बंधुभावाची वृद्धी या गोष्टी साध्य करण्यासंबंधी त्यांनी लोकांना उपदेश केला. गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी त्यांनी ‘ग्रामगीता‘ हा ग्रंथ लिहिला.
‘गाव हेच देऊळ आहे आणि त्या देवळातील देव म्हणजे गावातील लोक !’ असे सांगून त्यांनी जनसेवेचे तत्त्व लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला. आपल्या भजनांद्वारे त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेशही लोकांपर्यंत पोहोचविला. त्यांच्या या कार्याची स्मृती म्हणून २१ व्या शतकाच्या आरंभापासूनच महाराष्ट्र सरकार ‘तुकडोजी महाराज ग्रामसुधार अभियान‘ राज्यात राबवीत आहे. अशा या राष्ट्रसंताचा मृत्यू ११ ऑक्टोबर, १९६८ रोजी झाला.
तुकडीजी महाराज यांची आणि त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
- अनुभव सागर भजनावली (कवी – तुकडोजी महाराज)
- आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)
- ग्रामगीता (कवी – तुकडोजी महाराज)
- डंका तुकडोजींचा (राजाराम कानतोडे)
- राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक – प्रा. राजेंद्र मुंढे)
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक – डॉ. भास्कर गिरधारी)
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन – लेखक – प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)
- राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)
- राष्ट्रीय भजनावली (कवी – तुकडोजी महाराज)
- लहरकी बरखा (हिंदी, कवी – तुकडोजी महाराज)
- सेवास्वधर्म (कवी – तुकडोजी महाराज)
मृत्यू
आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर १९६८) रोजी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील “गुरुकुंज” या आश्रमामध्ये वंदनीय राष्ट्रसंतांचे महानिर्वाण झाले. त्यांची समाधी मोझरी येथे आहे. त्यांच्या स्मृर्तीपृत्यार्थ १९२५ मध्ये स्थापन झालेल्या नागपूर विद्यापीठास “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ” असे नाव देण्यात आले आहे.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील (Tukdoji Maharaj) माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल.