Chavat Ukhane for female
Chavat Ukhane for Female – महिलांसाठी चावट उखाणे : हे खास महिलांसाठी बनवले गेले आहेत. हे उखाणे अतिशय लाजिरवाणी आणि गमतीशीर आहेत. उखाणे हे महिलांसाठी खूप आवडीची गोष्ट आहे. हे उखाणे घेताना खूप लाज वाटेल.
उखाणे घेणे हे भारतीय लग्नामधील परंपरा आहे. हि परंपरा आजही कायम आहे. आता नवीन पद्धतीचे उखाणे घेतले जातात त्यापैकी Chavat Marathi Ukhane For Female हा एक उखाणा आहे.
उपवासाला खातात, सगळे आवडीने केळ,
_______ सोबत घालवेल आता, बेडरूम मध्ये वेळ.
माझ्या एका मुलाला, सांभाळून झाले मी बोर,
तरीपण ________ रावांना पाहिजे, अजून एक पोर.
मेकअप करायला, सर्वाना लागतो आरसा,
________ राव आता लवकर द्या, घराण्याला वारसा.
घड्याळात वाजले दहा,
________ राव म्हणतात, माझ्याकडे एकदा तरी पहा.
जेवताना ताटात, वाढते मीठ,
__________ रावांचे नाव घेते, संसार करेन मी नीट.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- मंगळागौरीसाठी उखाणे Mangalagaur Ukhane
- Navriche Ukhane | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे Part 2
- Navariche Ukhane | नवरीचे उखाणे
- चावट उखाणे
- Chavat Ukhane Lagnache – लग्नाचे चावट उखाणे
जेव्हा दारू जाते पोटात,
तेव्हा ______ राव कुठेही चालू होतात.

किती सांगितलं समजवून, तरीपण स्वतःची लावतात अक्कल,
_______ राव हँडसम असले तरी, डोकयावर आहे टक्कल.
Chavat Ukhane for Female – महिलांसाठी चावट उखाणे
जेवणासारखे खातात, तंबाखूचा घास,
_________ रावांची किस घेताना, येतो खूप वास.
चांदीच्या ताटात, फणसाचे गरे,
________ राव दिसतात बरे, पण वागवतील तेव्हा खरे.
हि पण आहे सुंदर, ती पण आहे छान,
कोणाबरोबर प्रेम करू, मी आहे परेशान.
हळदी ची काम, पडली आहेत पंचवीस तीस,
________ लग्नानंतर करशील का, मला सगळ्यांसमोर किस.
उपवासाला खातात लोक केळी,
__________ राव सोडत नाहीत, कोणत्याही वेळी.
समोर सगळे असले, कि बसतात सरळ,
_____ रावांना लागते मी, सारखी जवळ.