Navratri Colours

नवरात्रीचे नऊ रंग २०२३ | Navratri Colours

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी सणवार

नवरात्रीचे नऊ रंग २०२३ | Navratri Colours

नवरात्रीचे नऊ रंग २०२३ | Navratri Colours : आश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेला देवीचे आगमन होते. घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. यंदा १५ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या दिवसांमध्ये नवरात्री साजरी होणार आहे तर २४ ऑक्टोबरला दसऱ्याचा मुहूर्त आहे. तुम्हीही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये बस, ऑफिस, गरबा- दांडियाला यामध्ये  एकाच रंगात सजून तुमच्या मित्रपरिवार बरोबर हे नऊ दिवस आनंद आणि उत्साहानी साजरे करता . या नऊ रंगांची निवड कशी होते व यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे याविषयी जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

दिवस १ – शैलपुत्री: 15 ऑक्टोबर 2023 रविवार – केशरी (Navratri Colours)

नवरात्रीचे नऊ रंग 2023 मध्ये नवरात्रीच्या सुंदर रंगांच्या यादीमधील केशरी रंग हा पहिला आणि अतिशय खास आहे. या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते.

या दिवशी केशरी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा केल्याने आयुष्यात ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते. केशरी रंग सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो.

दिवस २ – ब्रह्मचारिणी: 16 ऑक्टोबर 2023 सोमवार – पांढरा 

नवरात्रीचे नऊ रंग 2023 मध्ये नवरात्रीच्या विशेष रंगांच्या यादीमधील दुसरा रंग आहे पांढरा रंग. शांततेचे प्रतीक असलेला पांढरा रंग हा शुद्धता आणि साधेपणा दर्शवितो.

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता दुर्गा ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणी हे प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक आहे.देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे. पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो. या दिवशी देवीच्या पूजेसाठी तुम्ही चमेली किंवा पांढरे कमळ यांसारख्या फुलांचा वापर करू शकता.

दिवस ३ – चंद्रघंटा: 17 ऑक्टोबर 2023 मंगळवार – लाल (Navratri Colours)

नवरात्रीचे नऊ रंग 2023 मध्ये नवरात्रीच्या विशेष रंगांच्या यादीमधील तिसरा आणि सर्वात शक्तिशाली रंग आहे लाल रंग. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटेती देवीची पूजा केली जाते. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा केल्याने आयुष्यात शक्ती आणि चैतन्य प्राप्त होते.

दिवस ४ – कुष्मांडा: 18 ऑक्टोबर 2023 बुधवार – निळा

नवरात्रीचे नऊ रंग 2023 मध्ये नवरात्रीच्या विशेष रंगांच्या यादीमधील चौथा रंग आहे निळा रंग. निळा रंग हा समृद्धी आणि शांतताचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते.

या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा केल्याने तुम्हाला आयुष्यात अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात भरपूर समृद्धी आणि भरभराट प्राप्त होईल.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

दिवस ५ – स्कंदमाता: 19 ऑक्टोबर 2023 गुरुवार – पिवळा (Navratri Colours)

नवरात्रीचे नऊ रंग 2023 मध्ये नवरात्रीच्या विशेष रंगांच्या यादीमधील पाचव्या क्रमांकाचा रंग आहे पिवळा. पिवळा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो.

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते.

Navratri Colours
Navratri Colours

दिवस ६ – कात्यायनी: 20 ऑक्टोबर 2023 शुक्रवार – हिरवा

नवरात्रीचे नऊ रंग 2023 मध्ये नवरात्रीच्या विशेष रंगांच्या यादीमधील सहाव्या क्रमांकाचा आणि सर्वोत्तम रंग आहे हिरवा. हिरवा रंगाचा निसर्गाशी दृढ संबंध असतो, हा एका नवीन वाटचालीची सुरुवात दर्शवितो. हिरवा रंग हा शांततेचे प्रतीक मानला जातो.

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा केल्याने आयुष्यात सुख आणि शांतता प्राप्त होते.

दिवस ७ – कालरात्री: 21 ऑक्टोबर 2023 शनिवार – करडा (Navratri Colours)

नवरात्रीचे रंग 2023 मध्ये नवरात्रीच्या विशेष रंगांच्या यादीमधील सातव्या क्रमांकाचा रंग आहे करडा/राखाडी रंग. हा रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे. करडा/राखाडी रंग एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक होण्यासाठी प्रेरित करतो.

नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रि देवीची पूजा केली जाते. या दिवशी राखाडी किंवा करड्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा केल्याने आयुष्यातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता प्राप्त होते.

दिवस ८ – महागौरी: 22 ऑक्टोबर 2023 रविवार – जांभळा


नवरात्रीचे रंग 2023 मध्ये नवरात्रीच्या विशेष रंगांच्या यादीमधील आठव्या क्रमांकाचा रंग आहे जांभळा रंग. जांभळा रंग भव्यता आणि राजेशाहीचे प्रतीक मानला जातो.

नवरात्रीच्या सातव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. या दिवशी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते.

दिवस ९ – सिद्धिदात्री: 23 ऑक्टोबर 2023 सोमवार – मोरपंखी (Navratri Colours)

नवरात्रीचे रंग 2023 मध्ये नवरात्रीच्या विशेष रंगांच्या यादीमधील नवव्या क्रमांकाचा रंग आहे मोरपंखी, हा रंग निळ्या आणि हिरव्या रंगाचे मिश्रण करून तयार होतो. मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. मोरपंखी रंग इच्छाशक्ती तसेच ध्येयपूर्तीचे प्रतीक मानला जातो.

नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिध्दिदात्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी मोरपंखी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा केल्याने आयुष्यात समृद्धी आणि नवीनता प्राप्त होते.

Leave a Comment