Dohale Jevan Ukhane

100+ डोहाळे जेवण उखाणे | Dohale Jevan Ukhane

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी उखाणे

डोहाळे जेवण उखाणे | Dohale Jevan Ukhane : ह्या दिवशी होणाऱ्या आईला आपल्या नवऱ्याचे नाव सर्वान समोर घ्यावे लागते, म्हणजेच तिला Marathi Ukhane घ्यावे लागते. अश्याच डोहाळे जेवणाच्या कार्यक्रम साठी आम्ही Dohale Jevan Ukhane, Baby Shower Ukhane in Marathi घेऊन आलो आहोत.

डोहाळे जेवण उखाणे | Dohale Jevan Ukhane

मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी;
___रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.

माझ्या सासर – माहेरची , लोकं सारी हौशी;
___रावां चं नाव घेते डोहाळाच्या दिवशी.

हिमालयावर पडतो बर्फाचा पाऊस;
___रावांचे नाव घेते सासरच्यांनी केली हौस

मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल;
___रावां चं नाव घेते आता जड झाले पाउल.

मायेच्या माहेरी डोहाळे-जेवणाचा घाट,
___रावां चे नाव घेते, केला थाटमाट

आई-वडील प्रेमळ, तसे सासू-सासरे;
___रावां चं नाव घ्यायला डोहाळे जेवणाचं कारण पुरे.

तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले;
___रावां चं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे.

घाट घातला तुम्ही पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे ;
___रावांच्या प्रेम झुल्यावर घेते मी हिंदोळे

पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी;
___रावांचे नाव घेते भरली माझी ओटी.

Dohale Jevan Ukhane

वसंत ऋतूच्या आगमनाने धरती ल्याली माझी ओटी;
___रावांचं नाव घेते डोहाळे जेवण आहे आज.

कुबेराच्या भांडारात हिरे-माणिकांच्या राशी;
___रावांनी आणला शालू डोहाळे जेवणाच्या दिवशी.

फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी;
___रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी.

रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा
___ना अन मला येणाय्रा बाळराजांकरीता तुमचा आर्शिवाद हवा

संसारातल्या राजकुमाराची स्तुती सुत्रे गायला लागत नाही भाट
___राव बघतात आता बोबड बोलायची वाट

हिरवी नेसले साडी हिरवा घातला चुडा
___रावाच नाव घेवुन शोभते बर्फी किंवा पेढे

श्रावना मध्ये येते सुंदर श्रावनधारा
___रावांचे नाव घेते डोहाळे जेवन आहे घरा

पांढय्रा भातावर पिवळ धमक वरण
___रावाच नाव घेते डोहाळे जेवनाचे कारण

सासु सासय्राने डोहाळे जेवन केले माझे झोकात
___रावाच नाव घेते कार्यक्रम झाला थाटात

क्रुष्णांच्या गाईला चरायला हिरवे हिरवे कुरण
___रावांचे नाव घेयला डोहाळे जेवनाचे कारण

नाटकात नाटक गाजले सुभद्रा हरण
___रावांचे नाव घेते डोहाळे जेवनाचे कारण

कळी हासेल फुल उमळेल मोहरून येईल सुगंध
___च्या सोबतीत डोहाळे जेवनाच्या दिवशी गवसला जिवनाचा आनंद

___माझी आहे सर्व कलामध्ये कुशल
तुमच्या येण्याने झाला डोहाळे जेवनाचा दिवस स्पेशल

संतांच्या अभंगात आहे अम्रूतवाणी
डोहाळे जेवनाला माझी ___म्हणते मधुर गोड गाणी

द्राक्षच्या वेलीला त्रिकोनी पान ___चे नाव घेतो
डोहाळे जेवनाच्या दिवशी ऐका देवुन काण

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
50+ Chavat Ukhane Lagnache – लग्नाचे चावट उखाणे
100+ Marathi Non Veg Ukhane – मराठी नॉन व्हेज उखाणे
50+ Navriche Ukhane | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे Part 2
100+ Barshache Ukhane | बारशाचे उखाणे

काही शब्द येतात ओठातुन काही येतात
गळ्यातुन लग्न असो वा डोहाळे जेवन ___ चे येते ह्रदयातुन

Dohale Jevan Ukhane
Dohale Jevan Ukhane

Dohale Jevan Ukhane for Male | पुरूषांसाठी डोहाळे जेवण उखाणे

गोप गोपीकांना करते धुंद क्रुष्णाची बासरी
___रावांच नाव घेते डोहाळे जेवन आहे सासरी

थाटा माटाणे डोहाळे माहेरच्यांनी केले आज
___रावांनी मला घातला साज

Dohale Jevan Ukhane

डोहाळे जेवनाला सजवल्या पाना फुलांच्या नौका
___रावांचे नाव घेते लक्ष देवुन ऐका

काव्य आणि कविता सागर आणि सरीता
___नाव घेते तुमच्या करीता

चांदीच्या वाटीत रूपये ठेवले साठ
___चे नाव घेते केला डोहाळे जेवनाचा थाट

बाळराजाची चाहुल आली दरवळला परीसर
___च्या सहवासात माझे जिवन होईल सफल

Funny ukhane for dohale jevan | विनोदी डोहाळे जेवण उखाणे

डोहाळे कार्यक्रमासाठी आज फुले मिळाली स्वस्त
___रावांचे नाव घ्यायला कारण लाभलेय मस्त

___आहे प्रेगनंट देतो मी तुला फूल,
प्रॉमिस करतो आज तुला, डॅडी होईन मी कूल

___रावांना आहे माज,
तरीही नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी खास

आहे मी प्रेमळ, नाही कोणाचा द्वेष, डोहाळे जेवणाच्या दिवशी
___रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश

कितीही झाला बिझनेसमध्ये तोटा,
___रावांनी तरीही उडवल्या डोहाळे जेवणात 100 च्या नोटा

सिव्हिल इंजिनिअर बनायला लागले खूप कष्ट
___रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी स्पष्ट

Dohale Jevan Ukhane

गणपती बाप्पाला केला होता नवस
___रावांसह साजरा करतेय आज डोहाळे जेवणाचा दिवस

नटण्यासाठी बायका कायम असतात हौशी,
___रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी

इन्स्टाग्रामच्या बायोला टाकले आहे फूडी
___राव पाहा आजही डोहाळे जेवणाला आहेत तसेच मूडी

दादर चौपाटीवर बसून बघायला आवडते समुद्राची लाट
___रावांच्या छोट्या Version ची पाहतेय मनापासून वाट!

Dohale Jevan Special Ukhane In Marathi | पारंपारिक डोहाळे जेवण उखाणे

नाटकामध्ये नाटक गाजले सुभद्रा-हरण
___रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे आहे कारण

कृष्णा देवाच्या गायींना चरायला हिरवे-हिरवे कुरण,
___रावांचे नाव घ्यायला डोहाळे जेवणाचे कारण

प्रिय सासू-सासऱ्यांनी डोहाळे जेवण केले माझे झोकात
___रावांचं नाव घेते कार्यक्रम झाला अगदी थाटात

वाऱ्यावरती हलके हलके कळी उमलली मस्त,
___रावांचं नाव घ्यायला कारण लाभल मस्त

श्रावणामध्ये येते सुंदर श्रावणधारा,
___रावांचे नाव घेते डोहाळे जेवण आहे घरा

पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळ धमक वरण,
___रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे आहे कारण

मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल
___रावांचे नाव घेते, जड झाले पाऊल

Dohale Jevan Ukhane

आनंदाचे कारंजे, मनी उडते थुई थुई
___रावांच्या बाळाची, आता होणार मी आई

आजच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या हौशी,
___रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी

रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा
___रावांना अन् मला येणारया बाळराजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा.

चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ,
___चे नाव घेते केला डोहाळ जेवणाचा थाट

सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सबाई आहेत हौशी,
___चे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी

लागली आहे बाळराजांची चाहुल दरवळला परिसर,
___च्या सहवासात माझे जीवन होईल सफल

खरं तर संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत नाही भाट
___राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट

मायेच्या माहेरी डोहाळे-जेवणाचा घाट,
___चे नाव घेते, केला थाटमाट

तुम्हाला हे डोहाळे जेवण उखाणे आवडले असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुमच्याही डोहाळे जेवणासाठी ठरतील उपयोगी. 

Leave a Comment