सारिता सकाळी सकाळी समोरच्या ताईंशी बोलत होती…
“रोज रोज गाय आणि कुत्रा कुठे शोधणार ????
म्हणून रोज सकाळी पहिली पोळी मी खाते आणि शेवटची पोळी यांना टिफिनमध्ये देते …..”
(कुटूंब न्यायालयात )
न्यायाधीश: दोन्ही बाजू नीट तपासून पाहिल्यानंतर
मी तुझ्या बायकोला दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय घेतला आहे …
गण्या: खूप खूप धन्यवाद जजसाहेब…
आपण खूप दयाळू आहात .
जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा मीदेखील तिला थोडेफार पैसे देत जाईन.. !!!
जज ने हातोडा फेकून मारला
आर्ची ची आई: ये कुठे निघालीस?
आर्ची: परशा कडे
आर्चीची आई: अजुन भुत उतरल नाही का परश्याचे?
आर्ची: आता ग बया बहिरी बिईरी झाली का काय……
म्या परसाकडे चालली हाय
अन तूले परश्या कडे ऐकू येते
मराठीत सांगितलेलं कळत नाही का इग्लिश मध्ये सांगु
*हागाय…… हागाय*
मुलगी : आई राम कदम आले आहेत निवडणुक प्रचाराला..
आई : पहिली तु आत हो..
बाबा : तु पण आत हो ग त्याचा काय भरोसा नाय!!
बायकोच्या शाब्दिक चाबकाचे फटके खात खात…
संसाराची गाडी पळवणा-या सर्व खिल्लारी बैलांना
पोळ्याच्या हार्दिक..हार्दिक शुभेच्या….
सुप्रीम कोर्टाने विवाह बाह्य संबंध गुन्हा नाही म्हणून मान्यता दिली,
तरीही शेजारीण नाही म्हणते.
*हा न्यायालयाचा अपमान आहे, महोदय.*
मुलगा: आई दिवाळीला मि ह्या दुकानातुन फटाकड्या घेणार
आई: नालायक हे फटाकड्याचं दुकान.नाय मुलिंचे हॉस्टेल आहे
मुलगा: मला काय माहित पप्पा एकदा म्हणत होते हितं एका पेक्षा एक फटाकडया आहेत
आई: हो का .. अत्ता घरी गेल्यावर पप्पा बघ कसे रॉकेट सारखे आकाशात उडतील.
विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला,
‘आई संजयने माझी पाटी फोडली.’
‘कशी फोडली? थांब बघते मी संजयला.’
‘मी त्याच्या डोक्यावर आपटली
आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली.’
शेखर: ‘आई, बघ टकला माणूस.’
आई: ‘शांत रहा, तो ऐकेल ना.’
शेखर: ‘काय त्याला हे माहित नाही?’
डील: बबन, लक्षात ठेव आज गणिताच्या पेपरमधील जेवढी
उत्तरे चुकतील तेवढय़ा छड्या मारेन.
संध्याकाळी बबनला वडील म्हणाले किती प्रश्न चुकले?
बबन: एकपण नाही बाबा. तुमची धमकी मी लक्षात ठेवली.
वडील: याचा अर्थ सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिली, होय ना?
बबन: नाही बाबा, मी एकही प्रश्न सोडवला नाही.