Holi Festival Information In Marathi

होळीची संपूर्ण माहिती | Holi Festival Information In Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी सणवार

Holi Festival Information In Marathi : Holi Information In Marathi :- शेवटच्या मराठी महिन्यामध्ये हा सण येत असतो, तो म्हणजे फाल्गुन या महिन्यातील पौर्णिमेला होळी (Holi Information In Marathi) हा सण येतो. देशभरात विविध ठिकाणी होळी हा सण साजरा करण्याची परंपरा व पद्धत वेगवेगळी आहे. तितकीच सुंदर आणि आकर्षक सुद्धा आहे. या उत्सवाला होलिकादहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, कामदहन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तर कोकणातील शिमगा या नावाने ओळखले जाते.

Holi Festival Information In Marathi
Holi Festival Information In Marathi

होळीची संपूर्ण माहिती | Holi Festival Information In Marathi

आपल्या भारतासारखा जगात दुसरा कोणताही देश नाही, जिथे लोक एकत्र येतात आणि कोणताही भेदभाव न करता बंधुभावाने सर्व सणांचा आनंद घेतात. हा सण हिंदूंचा मुख्य आणि लोकप्रिय सण आहे, परंतु तरीही सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा सण प्रेमाने साजरा करतात, त्यामुळे या सणामुळे एकमेकांबद्दल आपुलकी वाढते आणि त्यांना जवळ येते. आपल्या देशात साजरे होणाऱ्या सर्व सणांच्या मागे एक पौराणिक आणि सत्य कथा दडलेली असते. त्याचप्रमाणे होळीत रंग खेळण्यामागेही अनेक कथा आहेत. आज या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की होळी (Holi Festival Information In Marathi) सण का साजरा केला जातो?

सणाचे नावहोळी (24 मार्च 2024)
तिथीफाल्गुन पौर्णिमा
ऋतूवसंत
उदेश्यवाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टीचा विजय

होळी कधी आणि कशी साजरी करतात – Holi Information In Marathi

महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्यात येते. यावर्षी 24 मार्च 2024 या दिवशी होळी आणि धूलिवंदन 25 मार्च 2024 तर 30 मार्च 2024 ला रंगपंचमीचा सण आहे. (Holi Festival Information In Marathi) संपूर्ण भारतात होळीचा सण साजरा केला जातो. एवढंच नाही तर या सणाला भारतातील प्रत्येक प्रांतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. होलिकादहन केल्यावर दुसऱ्या दिवशी गुलाल, अबीर आणि विविध रंगाची उधळण करून धुळवड साजरी केली जाते.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Holi Wishes In Marathi 2024 | होळीच्या मराठी शुभेच्या
धुलीवंदनाला खास शुभेच्छा | Dhulivandan Wishes In Marathi

भारतात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, आसाम, बनारस, बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, मथुरा – वृंदावन, नागालॅंड, ओरिसा, पांडेचरी, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड या ठिकाणी होळी साजरी केली जाते. भारतात प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात होळीचा सण शिमगा या नावाने प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच शिमग्यालाही कोकणात उत्साहाचं वातावरण असतं.

होळी सण हा प्रामुख्याने दोन दिवस साजरा केला जातो. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवासणी, मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. (Holi Festival Information In Marathi) होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुन आहे, काळभारी आहे, अमंगल आहे. त्या सर्वांचा जळून नाश करायचा, नव्याने सांगण्याचा उदात्ततेचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश असतो. होलिका दहन केल्यावर दुसऱ्या दिवशी गुलाल आणि विविध रंगाची उधळण करून होळी साजरी केली जाते.

दुसऱ्या दिवशी रंगाची होळी खेळली जाते.काही ठिकाणी या दिवसाला “धुलीवंदन” म्हणले जाते.यादिवशी सकाळी उठून ,गावातील किंवा शहरातील सोसायटी मधील लोक जुनी – पुराणी कपडे घालून एका विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात आणि आपल्या प्रियजनांना रंगाने रंगवतात. या दिवशी सर्व ठिकाणी आनंदाचे वातावरण असते आणि संपूर्ण आसपासचा परिसर रंगाने मोहून गेलेला असतो.ही रंगाची होळी दुपार पर्यंत खेळली जाते आणि संध्याकाळी या दिवशी माणसे एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांमध्ये मिठाई वाटतात.

काही ठिकाणी हा सन तीन दिवस साजरा केला जातो. (Holi Festival Information In Marathi)

  • पहिला दिवस – पौर्णिमेच्या दिवशी (होळी पौर्णिमा) थालीमध्ये आणि लहान पितळ भांड्यात रंगाची पूड व पाण्याची व्यवस्था केली जाते. उत्सवाची सुरुवात ज्येष्ठ पुरुष सदस्यापासून होते जी आपल्या कुटुंबातील सदस्यांवर रंग शिंपडते.
  • दुसरा दिवस – होळीच दुसरा दिवसाला “पुनो” म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी होलिकाच्या प्रतिमा जाळल्या जातात आणि लोक होलिका आणि प्रल्हादाची कहाणी लक्षात ठेवण्यासाठी प्रकाशझोत लावतात. अग्नीच्या देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या मुलांसह माता अग्नीच्या भोवती पाच फेऱ्या काढतात.
  • तिसरा दिवस – हा दिवस ‘पर्व’ म्हणून ओळखला जातो आणि होळी साजरी करण्याचा हा शेवटचा दिवस असतो या दिवशी रंगीत पावडर आणि पाणी एकमेकांवर ओतले जाते. राधा आणि कृष्णाच्या देवतांची पूजा केली जाते आणि रंग खेळला जातो ज्याला मराठी संस्कृती मध्ये रंग पंचमी या नावाने देखील ओळखले जातो.

भारताच्या अन्य प्रांतात होळी कशा प्रकारे साजरी केली जाते ?

भारताच्या अन्य प्रांतात होळी कशा प्रकारे साजरी केल्या जाते तर उत्तर भारतातील वजीर भागातील होळीचे विशेष महत्त्व आहे. तेथे कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार पद्धती प्रसिद्ध आहेत.(Holi Festival Information In Marathi) उत्तर भारतातील खेडेगावात होळीचे विशेष महत्त्व आहे. तेथे लाकडे रचून त्याची होळी पेटवली जाते आणि युवक-युवती त्याभोवती नृत्य करतात. बनारस मधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या अग्नि वरून चालत जाण्याची प्रथा आहे.

महाराष्ट्रात होळीच्या अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. तसेच समस्त समुदाय होळीच्या विधीयुक्त पूजन करतो. गाडीसमोर गऱ्हाने, नवस बोलण्याची परंपरा आहे. तसेच होळीच्या भोवताली रांगोळी सुद्धा काढली जाते. तर ईशान्य भारतात विशेष करून मणिपूरमधील विष्णुपुरी भागात महिला होळीचा दिवस आनंदाने साजरा करतात.

पश्चिम बंगाल मध्ये वैष्णव संप्रदायात गौरव पौर्णिमा या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्म तिथी म्हणून श्री कृष्ण अष्टमी प्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो. (Holi Festival Information In Marathi) तर गुजरातमध्ये एक आठवडा होळीचा आनंद साजरा केला जातो. हा सण मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.

वैज्ञानिकदृष्टया महत्व

उन्हाळाही सुरू होत असतो, जमीन भाजून निघते. तिच्यातुन उष्ण वाफारे निघतात. घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच असेल तर त्यातून येणारी घाण आरोग्याला हानीकारक असते म्हणून तीची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करावी लागते त्याची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो ती उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञापुर्वक केलेला प्रणाम. (Holi Festival Information In Marathi) होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन स्वागत !

होळी सणा विषयी असणारी कथा

जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. (Holi Festival Information In Marathi) परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते.

तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही.

राजाने होलिकेला भक्त प्रह्लादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल.

भक्त प्रह्लादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. (Holi Festival Information In Marathi) दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.

धुलीवंदन

होलिका दहन केल्यानंतर पुढील पाच दिवस महाराष्ट्रात धुळवड अथवा रंगपंचमी साजरी केली जाते. एकमेकांना गुलाल अथवा विविध रंग लावून आणि पाण्याने रंगपंचमी खेळली जाते. (Holi Information In Marathi) यामागे सर्वांनी एकत्र येणे हा उद्दिष्ट असतो. रंग हे आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असतात. म्हणून या रंगाची उधळण करून हा सण साजरा केला जातो. नाच, गाणी आणि रंग खेळून सगळीकडे धुळवड साजरी केली जाते.

भांग खाण्याची प्रथा

भारतात काही ठिकाणी होळीच्या दिवसांमध्ये भांग पिण्याची प्रथा आहे. भांग एकमेकांना देऊन त्यांची मजा घेणं हा या मागचा उद्दिष्ट असतो. भांग घेतल्यानंतर लोकांच्या वागण्याबोलण्यावरचं नियंत्रण सुटते. (Holi Information In Marathi) ज्यामुळे जाणिवपूर्वक इतरांना भांग देऊन त्यांची मजा घेतली जाते. हा केवळ एक मनोरंजनाचा भाग असतो. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करताना भांग घेण्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.

रंगपंचमी

रंगपंचमी म्हणजे होळीचा ५ वा दिवस. (Holi Information In Marathi) या दिवशी सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात. 

सृष्टीरूपी रंगमंचावर जीवनरूपी नाटकातील आपली भूमिका साकार करतांना आपल्याला अनेक भावरंगांनी सामोरे जावे लागते, सुख, समाधान, स्वास्थ्य, शांती, यासोबतच दुःख, विषाद, उदासीनता, अशांती ही स्वाभाविकणे आपल्या जीवनात (आत्मप्रवासात) येतात. (Holi Information In Marathi) परंतु खरे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आपण त्याला न डगमगता दुःख व संकटाला सामोरे गेले पाहिजे. प्रत्येकाने परस्परांच्या सुख दुःखाच्या प्रसंगी सामील होऊन परस्पर सहकार्य व सामंजस्याने आपले जीवन व्यतीत करावे.

FAQ

होळी का साजरी केली जाते ?

मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या नावाने ओळखली जाते, अपप्रवृत्ती ना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरेतर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागता साठी सिद्ध होण्याच हा सण.

होळी सणाचा इतिहास काय आहे ?

हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकशिपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो . होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते, परंतु भारतीय डायस्पोराद्वारे आशियातील इतर प्रदेशांमध्ये आणि पाश्चात्य जगाच्या काही भागांमध्ये देखील पसरली आहे.

मित्रोंना तुम्हाला हा (Holi Information In Marathi) वर आमचा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Leave a Comment