Karva Chauth In Marathi | करवा चौथ व्रत माहिती
Karva Chauth In Marathi | करवा चौथ व्रत माहिती : करवा चौथ व्रत हा हिंदी बोलणाऱ्या विवाहित महिलांसाठी खास दिवस आहे. हे दरवर्षी कार्तिक महिन्याच्या चौथ्या दिवशी होते. या दिवशी या महिला लवकर उठून आंघोळ करतात. त्यानंतर, ते त्यांच्या पतींना दीर्घायुष्य मिळावे म्हणून चंद्र देवाकडे प्रार्थना करतात. तसेच शिवशंकर आणि सूर्याला जल अर्पण करतात.सकाळ ते रात्री चन्द्रदर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात.
विवाहित महिला मोठ्या उत्साहाने साज श्रुंगार करून पीठ गळण्याच्या गाळणीत आधी चंद्र व नंतर आपल्या पतीचे मुखदर्शन घेवून त्यांच्या हातून पाणी पिवून हे संस्कारी व्रत समाप्त करतात.
भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना,हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात.
करवा चौथ व्रताची माहिती – Karva Chauth In Marathi
करवा चौथ म्हणजे काय ?
हिंदू महिला या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व आपल्या संबंधांना अधिक मजबूत करण्या हेतू हे व्रत करतात. (Karva Chauth In Marathi) ह्या दिवशी अगदी पहाटेच स्नान करून सुर्यनारायणास अर्घ्य देतात. नंतर शंकर भगवानांच्या पिंडीस जल चढवतात.
सकाळ ते रात्री पर्यंत अन्न व जल त्याग करून उपाशी राहतात. रात्री चंद्र दर्शन करून पतीच्या हातून पाणी पिवून हे व्रत पूर्ण करतात. चंद्राचे दर्शन पिठाच्या चाळणीतून घेतले जाते. व पतीचे मुखदर्शन घेवून त्याचा आशीर्वाद घेवून पाणी ग्रहण केले जाते.
चद्र्देवतेस पतीच्या दीर्घ आयुषी व त्यांच्या संबंधास अधिक मजबूत करण्याचे साकडे घातले जाते.
यादिवशी स्त्रिया सुंदर व नवीन पोशाख घालतात घरात मिष्ठान्न बनविले जाते. त्यासोबतच घर चांगले सजवून आपल्या पतीस प्रसन्न करण्याची कोणतीच संधी या दिवशी सोडायची नसते.
पुरातन कहाण्यांपैकी एकामते पूर्वी लोक लढाई वर जात असत त्यावेळी हिंदू महिला आपल्या पतीच्या सुरक्षेसाठी चंद्रदेवतेकडे साकडे घालत व व्रत करीत. (Karva Chauth In Marathi) पती सुखरूप घरी आल्यास त्याचे मुख चंद्र देवतेसोबत चाळणीतून बघितले जाई.
या व्रताला एक उत्सवाचे हि रूप दिले जाते. या दिवशी कृषिप्रधान राज्यांमध्ये शेतात.गव्हाची हिवाळी हंगामाचे पिकाची कापणी केली जात असे. यावरून हे व्रत साजरे केल जाऊ लागले. असे काही अख्यायीकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच भारतातील प्रमुख गहू उत्पादक राज्यात हे व्रत उत्साहात केले जाते.
यास करवा चौथ व्रत का म्हणतात ?
करवा म्हणजे मातीचा तो भाग ज्याचा वापर गहू ठेवण्यास केला जातो. चौथ म्हणजेच चतुर्थी हा उत्सव हिंदू कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी वर साजरा केला जातो. (Karva Chauth In Marathi) विशेषतः महिलांचा सन म्हणून याची ओळख आहे.
या दिवशी विवाहित महिला आटा चाळणीतूनच का आपल्या पतीस पाहतात?
ह्या व्रतात पाहते ते रात्रीस चंद्र दर्शन पर्यंत महिला उपवास करून अन्नजल त्याग करून आधी चंद्राचे दर्शन व नंतर आपल्या पतीचे दर्शन पीठ चाळणीतून घेतात.
हिंदू धर्म मान्यतेनुसार एका देवासुर, संग्रामात चंद्र्देवांनी भगवान शिव आणि श्रीगणेश भगवानांचे प्रतिनिधित्व केले त्यामुळे या दोघांकडून त्यांना दीर्घायुष्याचा व अमरतेचा आशीर्वाद मिळाला. (Karva Chauth In Marathi) त्यामुळे या तिथीस चंद्र देवाचे दर्शन, त्यांच्या नावे निर्जल उपवास करून त्यांना मनोचीत प्रसन्न करून त्यांच्या कडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले जाते.
महिला यासोबत भगवान शिव आणि गणेशाचा जलाभिषेक करून व्रतास सुरुवात करतात. हिंदू धर्मात या व्रतास फार महत्व आहे. विवाहित महिलेस ह्या व्रताची दरवर्षी आतुरतेणे प्रतीक्षा असते. ह्या व्रतातून ते आपल्या पती प्रती आपले प्रेम दर्शवितात.
राणी विरवाती ची कहाणी
एके काळी एक सुंदर राणी विरवती होवून गेली. ती सात भावात एकच बहिण होती. तिचा पती एका दीर्घ आजाराने आजारी होता. तिने हे व्रत केले. दिवसभर पतीच्या आयुष्यासाठी आपले सर्व काही देवाचरणी ठेवले.
रात्री ती चंद्राच्या प्रतीक्षेत वाट बघू लागली तिच्या भावांना तिची हि अवस्था बघवेना त्यांनी चंद्राची नकली प्रतिमा उभी करून तिचा उपवास सोडवला. त्याचवेळी तिचा पती मरण पावला ती रडत राहिली. (Karva Chauth In Marathi) त्याच वेळी एका देविरूपी स्त्रीने तिला दर्शन दिले. तिने हा उपवास परत कर असे सुचवले.
राणी भक्ती भावाने हे व्रत करू लागली. सायंकाळ झाली चंद्र दर्शन घेतले व नंतर मृत पतीचे दर्शन घेतले तोच चमत्कार घडला. तिचा पती पुनरजीवित होवून ठणठणीत तिच्या समक्ष उभा झाला. ह्या सर्वामुळे राणी फारच खुश झाली ती दरवर्षी नित्य नियमाने, उपवास करू लागली. या दंतकथेनुसारच महीला हा उपवास मोठया उत्साहाने करतात.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- Navratri Information In Marathi | नवरात्र सणाचे महत्त्व आणि माहिती
- घटस्थापना संपूर्ण माहिती | Ghatsthapna Information In Marathi
- नवरात्रीचे नऊ रंग २०२३ | Navratri Colours
महाभारतातील प्रसिद्ध दंतकथा
महाभारतातील पांडवपत्नी द्रौपद्री ने ह्या पर्वाच्या महत्वास सर्वप्रथम समजून हे पवित्र व्रत पूर्ण केले अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. हे व्रत माता पार्वतीने भगवान शिव शंकरांना आपला पती म्हणून मिळविण्यासाठी केला होता. (Karva Chauth In Marathi) यापासून द्रौपदीने हे व्रत केले होते.
पांडव – कौरव युद्धात पांडवांचा विजय व्हावा यासाठी द्रौपदीने हे व्रत मोठ्या भक्तिभावाने केले होते. याचा परिणामस्वरूप कौरवांचा नाश झाला.
निष्कर्ष
या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/शास्त्रातून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती वितरीत करणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी.
FAQ’s
करवा चौथ म्हणजे काय? (Karva Chauth In Marathi)
हिंदू महिला या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व आपल्या संबंधांना अधिक मजबूत करण्या हेतू हे व्रत करतात
यास करवा चौथ व्रत का म्हणतात?
चौथ म्हणजेच चतुर्थी हा उत्सव हिंदू कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी वर साजरा केला जातो. विशेषतः महिलांचा सन म्हणून याची ओळख आहे.
करवा चौथ व्रत 2023 मध्ये केव्हा आहे ?
या वर्षी करावा चौथ 1 नवंबर या दिवशी हे व्रत आहे
करवा चौथ ची पूजा कशा पद्धतीने केली जाते ?
महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात व दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्राची पूजा करून आपल्या पतीच्या हाताने पाणी पिऊन हे व्रत सोडतात.या दिवशी एक पत्नी आपल्या पती साठी केवळ चौथ देवीकडे सौभाग्याचे वरदान मागत नाहीत, तर या व्रत मध्ये संपूर्ण सृष्टीला समाविष्ट केले जाते, ही सृष्टी पाच तत्त्वापासून बनलेली आहे, यामध्ये अग्नी, जल, वायू ,पृथ्वीआणि आकाश हे तत्त्व आहेत. हे पाचही तत्त्व साक्षी मानून हे पूजा केली जाते.