Good Friday Information In Marathi | गुड फ्रायडे म्हणजे काय ?

Good Friday Information In Marathi | Good Friday Meaning In Marathi : ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे दिवस अत्यंत पवित्र मानला (Good Friday On 29 March) जातात.

Good Friday Information In Marathi
Good Friday Information In Marathi

Good Friday Information In Marathi | गुड फ्रायडे म्हणजे काय ?

या दिवशी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक चर्चमध्ये जातात. ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे आणि इस्टर संडे दे दिवस अत्यंत पवित्र मानले (Good Friday On 29 March) जातात. या दिवशी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक चर्चमध्ये जातात आणि येशूचं स्मरण करतात आणि मोठ्या उत्साहाने सामाजिक कार्य करतात. (Good Friday Information In Marathi) अशी मान्यता आहे की गुड फ्रायडेच्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले आणि त्यांनी आत्मत्याग करुन लोकांना प्रेमाच्या कळसाचं एक उदाहरण सादर केले.

या दिवसाला होली डे, ग्रेट फ्रायडे आणि ब्लॅक डे असेही म्हणतात. यावेळी गुड फ्रायडे 29 मार्चला साजरा केला जात आहे. गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभु येशूवर (Good Friday Information In Marathi) जे आत्याचार झालेत ते पाहता हा दिवस आनंदाचा दिवस मानला जाऊ शकत नाही. मग या दिवसाला गुड फ्रायडे का म्हटलं जातं? चला जाणून घेऊ याबाबतची अधिक माहिती.

गुड फ्रायडे मान्यता काय ?

ख्रिश्चन समाजाच्या लोकांमध्ये अशी मान्यता आहे की प्रभु येशू ख्रिस्त हे देवाचा पुत्र होते. अज्ञान दूर करण्यासाठी आणि प्रेम आणि चांगुलपणा शिकवण्यासाठी ते या पृथ्वीवर आले. (Good Friday Information In Marathi) त्यामुळे जेव्हा पितालुसने कट्टर लोकांचे समाधान करण्यासाठी येशू ख्रिस्तांवर अनेक अत्याचार केले तरीही त्यांनी ते सर्व सहन केलं. जेव्हा पिलातुसने येशू यांना क्रॉसवर लटकवून त्यांचा जीव घेण्याचा आदेश दिला तरीही येशूयांनी त्या लोकांच्या अज्ञानतेसाठी देवाला प्रार्थना केली की यांना माफ करा,

कारण, यांना नाही माहित की हे काय करत आहेत. येशू यांनी प्रेमाच्या सर्वोत्तम उदाहरण सादर करण्यासाठी आपली कुर्बानी दिली. ज्या दिवशी त्यांना क्रॉसवर लटकवण्यात आले होते, (Good Friday Information In Marathi) त्या दिवशी फ्रायडे म्हणजेच शुक्रवारचा दिवस होता. येशू यांनी महानता, त्याग, दया आणि प्रेमाची इच्छा पाहता या शुक्रवारला गुड फ्रायडे म्हटलं जाऊ लागलं.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Easter Sunday Information In Marathi | ईस्टर संडेची माहिती
Good Friday Quotes 2024 | गुड फ्रायडे मराठी कोट्स
Happy Easter Wishes In Marathi | ईस्टरच्या मराठी शुभेच्छा

गुड फ्राइडे कसा साजरा केला जातो ?

या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूचं स्मरण करतात. काही लोक येशूच्या स्मरणार्थ काळे कपडे परिधान करुन शोक व्यक्त करतात आणि पदयात्राही काढली जाते. (Good Friday Information In Marathi) या दिवशी मेणबत्ती लावली जात नाही आणि घंटीही वाजवली जात नाही. लोक लाकडाने खटखट असा आवाज करतात. कारण हा दिवस चांगुलपणाचा दिवस मानला जातो, म्हणूनच बहुतेक लोक सामाजिक कार्यात भाग घेतात. वृक्षारोपण करतात आणि दान करतात.

का लटकवलं गेलं येशू ख्रिस्तांना क्रॉसवर?

ख्रिस्ती धर्मानुसार येशू ख्रिस्त हे परमेश्र्वराचे पुत्र होते. लोकांना ते अज्ञानाच्या अंधारातून बाहेर येण्यासाठी शिक्षित करत होते. त्यावेळी काही कट्टरपंथी लोकांनी येशू ख्रिस्तांचा विरोध केला. (Good Friday Information In Marathi) त्यांनी त्यावेळी रोमन गव्हर्नर पितालुसकडे येशू ख्रिस्तांची तक्रार केली. यहुदी लोकांनी क्रांती करु नये म्हणून आणि त्यांना खूश करण्यासाठी गव्हर्नरने येशु ख्रिस्तांना क्रॉसवर लटकवून जीवे मारण्याचा आदेश दिला.  

येशूने त्याचे संपूर्ण जीवन मानवाला जीवनाचे खरे ध्येय समजावून सांगण्यात घालविले. ज्या  इस्त्राईलात जेरुसलेम येथे येशूंचा जन्म झाला तेथील धर्मग्रंथात न्याय आणि शिक्षेबद्दल असे सांगितले होते की, कुणी कोणाचा डोळा फोडता तर त्याचा डोळा फोडण्यात यावा. कुणी कोणाचा हात तोडला असेल तर त्याचा हात तोडण्यात यावा. परंतु येशू ख्रिस्ताने मात्र आपल्या अनुयायास  सांगितले, दुष्टाला अडवू नका, जो तुमच्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसरा गाल करा. जो तुमची बंडी हिसकावून घेऊ पाहतो, त्याला तुझा अंगरखाही दे, याप्रमाणे येशू ख्रिस्ताला सूडचक्रातून मानवजातीची सुटका करायची आहे.

कारण रागाने राग आणि द्वेषाने द्वेष वाढतो हाच इतिहास आहे. येशू म्हटले तुम्ही शत्रूवर प्रेम करा, शेजार्‍यावर प्रीती करा, हा जगावेगळा सल्ला कुणालाही पाळायला कठीणच आहे, परंतु प्रभूने यामागे दिव्य तर्कसंगती सांगितली आहे. तो म्हणतो, ‘जे तुम्हाला उसने देतात, त्यांना तुम्ही परत मिळेल या भावनेने उसने दिले तर त्यात काय मोठेपणा? पापी लोक हे पापी लोकांना उसने देतात, तुम्ही पाप पुण्याचा विचार न करता सर्वांवर सारखे प्रेम करणार्‍या परमेश्वराचे पुत्र आहात ना?

मग त्याच्यासारखे व्हा.’ तो म्हणजे परमेश्वर चांगल व वाईट अशा दोन्ही लोकांच्या शेतावर पाऊस पाडतो व त्यांना विपुल सुख देऊ इच्छितो. जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यावर प्रेम केले तरच ते दिव्य प्रेम, नाही तर आपल्यावर  प्रेम करणार्‍यांवर प्रेम करणे हा तर व्यवहार झाला. 

आज संपूर्ण जगामध्ये दु:खी लोकांचे अश्रू पुसणार्‍या आजार्‍यांची सेवा करणार्‍या मृत्यूच्या  दारात उभ्या असलेल्यांना, युद्धातील जखमींना, भूकेलेलंना अन्न देणार्‍या, गरिबांची सेवा करणार्‍या   असंख्य संस्था, व्यक्ती जे अफाट प्रयत्न करीत आहेत, त्यामागे उभे आहे त्या दिव्य येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी केलेले क्रुसावरचे समर्पण. त्या महान, करुणामयी, प्रेममयी  देवपुत्रास शतश: नमन!

Leave a Comment