Mundavali Ukhane - मुंडावळी सोडतानाचे उखाणे

मुंडावळी सोडतानाचे उखाणे | Mundavali Ukhane

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी उखाणे

मुंडावळी सोडतानाचे उखाणे | Mundavali Ukhane :

मुंडावळी सोडतानाचे उखाणे | Mundavali Ukhane

स्वर्गीय नंदनवनात सुवर्णाच्या केळी,
_____________च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

भ्रमर करतो गुंजारव, मधाने भरतो पोळी,
_____________च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

हिंद मातेच्या डोक्यावर मोत्यांची जाळी,
_____________च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

उंबरठ्यावरचे माप पदस्पर्शाने लवांडते,
_____________च नाव घेऊन मुंडावळी सोडते.

सौभाग्याची जीवन ज्योत प्रीती तेलाने तेवते,
_____________च नाव घेऊन मुंडावळी सोडते.

नेत्राचे निरंजन लावावे संसाराच्या ताटी,
_____________च नाव घेते मुंडावळी सोडण्यासाठी.

सीतेच्या पर्णकुटी समोर लावल्या केळी,
_____________च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

घरापुढे अंगण, अंगणात काढली रांगोळी,
_____________च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

Mundavali Ukhane - मुंडावळी सोडतानाचे उखाणे
Mundavali Ukhane – मुंडावळी सोडतानाचे उखाणे

घरासमोर अंगण अंगणात लावली केळी,
_____________च नाव घेऊन सोडते मुंडावळी.

Ukhane

केळीच्या पानावर केशरी भात,
_____________च नाव घेऊन लावते मुंडावळी ला हात.

Leave a Comment