वाती सारताना घ्यायचे उखाणे | Vati Sartana Ukhane

वाती सारताना घ्यायचे उखाणे :

Vati Sartana Ukhane

समईतील ज्योती भक्ती-भावाने उजळविते,
____________नाव घेऊन वाती सारते.

समईत लावल्या वाती, उजळल्या ज्योती,
____________नाव घेऊन सारते वाती.

चंद्रोदय होताच संकष्टीला करतात गणेशाची आरती,
____________चं नाव घेऊन सारते वाती.

दसऱ्याला आपट्याचे पान, हृदय मिलन दर्शविते,
____________चं नाव घेऊन वाती सारते.

आई-वडिलांनी जन्म दिला, ब्रह्मदेवानी बांधल्या गाठी,
____________चं नाव घेते वाती सारण्यासाठी.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

महाविष्णूची लक्ष्मी, नीलकंठाची पार्वती,
____________चे नाव घेऊन सारते वाती.

श्रावण महिन्यात सण, उत्सवाची पर्वणी
____________चं नाव घेते मी वाती सारण्याचा कारणी.

स्वर्गीय नंदनवनात सुवर्णाच्या केळी,
____________चं नाव घेते वाती सारण्याच्या वेळी.

सौभाग्याची जीवनज्योत प्रीतीतेलाने तेवते,
____________चं नाव घेऊन मी वाती सारते.

वाती सारताना घ्यायचे उखाणे | Vati Sartana Ukhane
वाती सारताना घ्यायचे उखाणे

वेलीला शोभे फूल, स्त्रिला शोभे अपत्य,
____________चं नाव घ्यायला वाती सारण्याचं निमित्त.

लक्ष्मी दानात शोभते, विद्या विनयेन शोभते,
____________चं नाव घेऊन मी वाती सारते.

क्षणाची विदयुलता ब्रम्हांड उजळी,
____________चं नाव घेते वाती सारण्याच्या वेळी.

बागेतील फूल पूजेसाठी तोडते,
____________नाव घेऊन वाती सारते.

Leave a Comment