पोंगल सणाची माहिती | Pongal Meaning In Marathi

Pongal Meaning In Marathi : दक्षिण भारतात पोंगल (Pongal) या सणाला विशेष महत्त्व आहे. या वर्षी हा सण 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपासून सूरु होणार आहे. 4 दिवस चालणारा हा सण 17 जानेवारीला संपेल. दक्षिण भारतातील लोक नवीन वर्ष म्हणून पोंगल सणही साजरा करतात.

पोंगलचे महत्त्व दक्षिण भारतातील हा सण समृद्धीसाठी समर्पित असल्याचे म्हटले जाते. (Pongal Meaning In Marathi) या दिवशी धानाचे पीक गोळा करून, येणारे पीकही चांगले येवो, अशी देवाकडे प्रार्थना करूनच आनंद व्यक्त करून हा सण साजरा केला जातो. पाऊस, सूर्यदेव, इंद्रदेव आणि पशु (प्राणी) यांची पूजा या सणात समृद्धी आणण्यासाठी केली जाते.

पोंगल सणाची माहिती | Pongal Meaning In Marathi

पोंगल म्हणजे काय ?

असे मानले जाते की पोंगल सणाच्या आधी अमावस्या येते तेव्हा प्रत्येकजण वाईटाचा त्याग करून चांगले अंगीकारण्याचे व्रत घेतो, ज्याला ‘पोही’ असेही म्हणतात. पोही म्हणजे ‘जाणे’, याशिवाय तमिळ भाषेत पोंगल म्हणजे उफान असा होतो.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

पोंगल कसा साजरा केला जातो ?

पोंगल चार दिवस साजरे केला जातो, या दिवशी सर्व प्रकारचा कचरा जाळला जातो. सणासुदीला चांगले पदार्थ तयार केले जातात. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, तिसऱ्या दिवशी गुरांची पूजा केली जाते आणि (Pongal Meaning In Marathi) चौथ्या दिवशी कालीजीची पूजा केली जाते. सणाच्या दिवशी घरांची खास साफसफाई करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. हा सण जवळजवळ 4 दिवसांपर्यत साजरा केला जातो आणि चारही दिवसाचे आपापले महत्व आहे.

  1. भोगी पोंगल
  2. थाई पोंगल
  3. मट्टू पोंगल
  4. कान्नुम पोंगल

1) भोगी पोंगल:

इंद्र देवतेला प्रसन्न करण्याकरता पोंगल चा हा पहिला दिवस साजरा होतो. शेतकरी बांधवांकरता पाऊस अत्यंत महत्वाचा आहे आणि इंद्र देवता पावसाची आणि आकाशाची देवता म्हणुन ओळखली जाते त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्याकरता आणि त्यांचे आशिर्वाद प्राप्त करण्याकरता पृथ्वीतलावर समृध्दी आणणाऱ्या इंद्र देवतेची प्रार्थना करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. (Pongal Meaning In Marathi)

या दिवशी घराची स्वच्छता केल्यानंतर सायंकाळी गवऱ्या आणि लाकडाने आग पेटवली जाते आणि त्यात घरातील महिला जुन्या आणि कामात नसलेल्या वस्तु टाकुन देतात. शेकोटी भवती महिला गाणे गात नृत्य करतात. या दिवसांमधे थंडी असल्याने देखील या आगीचा उपयोग लोकांना उष्णता प्रदान करण्याकरीता सुध्दा होतो.

2) थाई पोंगल:

पोंगल च्या या दुसऱ्या दिवशी मातिच्या भांडयात नवे तांदुळ, नवा गुळ आणि दुधाला एकत्र शिजवुन सुर्यदेवतेला नैवेद्य दाखविला जातो. या पदार्थात इलायची, किसमिस, हिरवा हरभरा, आणि काजु देखील टाकतात. हा पदार्थ घराच्या अंगणात सुर्यादेवते समोर तयार करण्यात येतो.

या व्यतिरीक्त ऊस नारळ आणि केळाचा देखील नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी घरातील स्त्रिया माती आणि शेणाने सारवलेल्या भिंतींवर चुन्याने परंपरागत रांगोळया काढतात. याला शुभ समजल्या जाते. सकाळी उठल्याबरोबर स्नान करून स्त्रिया या रांगोळया घरातील भिंतीवर काढतात. संध्याकाळी सर्व एकत्र येउन शिजविलेल्या तांदळाचे सेवन करतात.

3) मट्टू पोंगल:

पोंगल चा तिसरा दिवस गायी आणि बैलांना समर्पित असतो. गायीचे दुध सर्वांकरीता अमृतासमान असते आणि बैल शेतकऱ्यासमवेत दिवसरात्र कष्ट करतात त्यामुळे या दोघांचे पुजन करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. (Pongal Meaning In Marathi)

या दिवशी भगवान शंकरांनी आपल्या बसव बैलाला शाप दिल्याने त्याला कायम स्वरूपी पृथ्वीवर वास करावा लागला त्यामुळे बैल शेतीच्या, धान्याची ने आण करण्याकरता उपयोगात येतात. त्याच्या प्रती उतराई होण्याकरता मट्ठू पोंगल हा दिवस साजरा होतो.

4) कान्नुम पोंगल…पोंगल चा अखेरचा दिवस:

हा दिवस पोंगल चा शेवटचा दिवस असतो या दिवशी चार दिवसात उरलेल्या पदार्थांना विडयाचे पान ऊस आणि सुपारी घेउन हळदीच्या पानावर घराबाहेर अंगणात ठेवल्या जाते. या दिवशी कन्यापुजन देखील केले जाते. घरातील महिला चुन्याचा दगड, हळद, तेल आणि तांदुळ हे घेउन आपल्या भावाला ओवाळतात व त्यांच्या सुख समृध्दीची कामना करतात. त्यानंतर सर्वजण एकत्र येत आनंदाने जेवण करतात.

Pongal Meaning In Marathi
Pongal Meaning In Marathi

“पोंगल” या सणाची पौराणिक कथा

भगवान शंकरांनी एकदा आपल्या वसव बैलाला पृथ्वीवर जाऊन संदेश देण्यास सांगीतले. तो संदेश असा होता… मनुष्याने रोज अंगाला तेल लावुन स्नान करावे आणि महिन्यातुन एकदा भोजन करावे.

वसव बैलाने पृथ्वीवर उलटा संदेश दिला रोज भोजन करावे आणि महिन्यातुन एकदा तेल लावुन स्नान करावे यामुळे भगवान शिव का्रेधीत झाले आणि त्यांनी बैलाला शाप दिला तु कायमचा पृथ्वीवर जा आणि यापुढे मनुष्याला शेतीत मदत कर… या शापामुळे बैलाला पृथ्वीवर कायमचा मुक्काम करावा लागला.

या उत्सवाशी निगडीत एक पौराणिक कथा कृष्ण आणि इंद्रदेवाशी संबधीत आहे. देवतांचे राजा झाल्यानंतर इंद्रदेव फार अभिमानी झाले त्यांचा गर्वाभिमान दुर करण्याकरीता भगवान कृष्णांनी एक युक्ती केली आपल्या गोकुळातील नागरीकांना इंद्र देवतेची पुजा करण्यापासुन रोखले. त्यामुळे इंद्रदेव रागावले त्यांनी सतत 3 दिवस गोकुळावर प्रचंड पाऊस पाडला.

या पाऊसामुळे संपुर्ण व्दारका संकटात सापडली त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी सगळयांच्या संरक्षणासाठी आपल्या एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आणि समस्त प्राणीमात्रांना आश्रय दिला. इंद्रदेवांना आपली चुक उमगली आणि श्रीकृष्णाचे श्रेष्ठत्व सुध्दा लक्षात आले.

भगवान श्रीकृष्णाने विश्वकर्माला सांगुन व्दारकेचे पुनर्निर्माण करवीले व गोकुळ वासीयांनी आपल्या गायी आणि बैलांच्या मदतीने पुन्हा शेती पिकवली…..

टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

“पोंगल” सणाबद्दल (“पोंगल” उत्सवाची माहिती | Pongal Meaning In Marathi) आम्ही दिलेल्या मराठी माहितीमध्ये तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास, कृपया आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे किंवा ईमेलद्वारे त्वरित सूचित करा. तुम्ही दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही आवश्यक ते बदल नक्कीच करू.

Leave a Comment