Puneri Jokes | मराठी पुणेरी जोक्स

Puneri Jokes | मराठी पुणेरी जोक्स

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी जोक्स

Puneri Jokes | मराठी पुणेरी जोक्स

पुणेरी स्पेशल
चिंटूः बाबा मला ब्लॅकबेरी नाही तर अॅप्पल पाहिजे.
बाबाः घरात फणस आणलाय तो संपव आधी…

“गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत हे
जरी खरे मानले,
तरी येता- जाता तिच्या पोटाला हात लावून सारखा नमस्कार करू नये,
तिला गुदगुल्या होतात..”

अस्सल पुणेरी
सदाशिव पेठेतली एक लायब्ररी
सभासद: आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ?
ग्रंथपाल: (सभासदाकडे रोखून पहात ) पुस्तक परत कोण आणून देणार ?

पुणेरी बँकेतला किस्सा
ग्राहक: “आज चेक डिपॉंजीट केला तर जमा केव्हा होईल??”
कारकून:” ३ दिवसांनी”
ग्राहक: “”अहो बँक समोरच तर आहे….
फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे….तरीही एवढा वेळ ??”
कारकून: “अहो ती प्रोसिजर आहे….
समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील
कि रीतसर घरी नेऊन मग जाळतील ??”

स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर: ३ लाख रुपये.
.
….
.
पेशंट: (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??

स्थळ: सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका: काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या: अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका: मग तुम्हाला का इतका आनंद झालाये?
तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीये !

पुणेरी boyfriend
मुलगा: I’ll climb the tallest mountain, swim the deepest sea,
walk on fire just for you.
मुलगी: wow किती romantic…!
तू मला आत्ता भेटायला येशील का?
मुलगा: आत्ता लगेच नको, पाऊस पडतोय, आई ओरडेल…!

एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला,
” थांबा मी चहा घेऊन आलो…”
. १० मिनीटांनी,
” चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया…!”

एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो,
तो nurse ला विचारतो, खायला काय आहे?
nurse : पोहे आणि उपीट तयार आहे…
मुलगा: च्या आईला! परत पुण्यात जन्माला आलो….!!

पुणेरी: ओ दुकानदार, केळी कशी दिली राव?
दुकानदार : एक रुपयाला एक
पुणेरी : काय तरी काय. साठ पैशाला देता का बोला….
दुकानदार : अहो साठ पैशात तर त्याचं साल फक्त येईल.
पुणेरी : ठीक आहे. मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवायचं केळं द्या पाहू.

एका पुणेरी मिठाई दुकानावरील पाटी..
“इथे तुम्हाला – तुमच्या मेहुणीपेक्षा गोड …
आणि बायकोपेक्षा तिखट पदार्थ मिळतील…..”

Leave a Comment