Exam Jokes | परीक्षा मराठी जोक्स – भाग १

Exam Jokes | परीक्षा मराठी जोक्स – भाग १

एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सण.
परीक्षा..
दिवे पण लागतात..
फटाके पण फुटतात..
Band पण वाजतो..
आणि घरचे आरती पण ओवाळतात.

एक ज्योतिषी इंजिनीअरिंग करणा-या विद्यार्थ्याचा हात पहात होता.
ज्योतिषी: बेटा, तू खूप खूप शिकणार आहेस..
विद्यार्थी: ते माहितीय हो…गेल्या ८ वर्षांपासून मी शिकतोच आहे.
मला सांगा, मी पास कधी होणार?

दोन इंजिनिअरिंग चे मित्र 1st इअर च्या परीक्षेत दोन वेळेस नापास होऊन- होऊन वैतागून गेले होते..
.
त्यातला एक मित्र दुसऱ्याला म्हणाला: चल यार जाऊन आत्महत्या करू,
आपल्या नशिबात इंजिनिअरिंग पास होणं लिहलच नाही…..!
.
तितक्यात दुसरा मित्र ओरडून म्हणाला: अबे पागल आहे का?
…..पुढच्या जन्मी परत बालवाडी पासून सुरु करावं लागेल….!

एका हुशार विदयार्थ्या मागे एका सुंदर शिक्षकाचा हात असतो..
आणि एका नापास विदयार्थी मागेएका सुंदर मुलिचा हात असतो

प्रगति पुस्तक वाचतांना
वडील: हे काय गणितात कच्चा, इंग्रजीत नापास, मराठीत शुन्य, वर्तणूक वाईट, अक्षर घाणेरडे.
मुलगा: बाबा, पुढे वाचा, आरोग्य चांगले आहे.

एकदा चम्प्या एक स्पर्धा परीक्षा देण्यासाठी गेला..
ज्या परीक्षेत उत्तर ‘हो किंवा नाही’ यामध्येच द्यायचं होतं..
चम्प्याने एक कॉईन काढला आणि तो फ्लिप करायला सुरुवात केली..
हेड म्हणजे ‘हो’ आणि टेल्स म्हणजे ‘नाही’
आणि अवघ्या अर्ध्या तासातच त्याने पेपर सोडवला..
सगळे पोरं मात्र पेपर सोडवण्यात दंग..
शेवटचे काही मिनिट राहिले तरी चम्प्या घामाघूम होऊन कॉईन फ्लिप करतच होता.
सर: हे काय करतोय?
चम्प्या: मी रीचेक करतोय कि उत्तर बरोबर आहेत कि नाही.

कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो
कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो
आणि या सगळ्यातून जो वाचतो त्याला
परिक्षेचा आभ्यास मारून टाकतो.

परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण
असतो, चिटीँग पण करता येत नसते.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचार:-यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
.
.
गण्या: “सर, तुमची पँट मागून फाटली आहे…!!!”

Leave a Comment