Rain Quotes In Marathi ( पावसावरील विचार )
पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे, फरक इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी या मनाला.
आज पुन्हा धुक्याची पहाट आली, प्रत्येक पानावर तुझी प्रतिमा तयार झाली, मी शोधत राहिलो त्या दवबिंदूमध्ये तुला आणि तू प्रत्येक थेंबात विलीन झालीस.
पावसाची सर आता नुकतीच बरसली आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवळली.
आज पावसात चिंब मी भिजले, तुझ्या आठवणींच्या झुल्यात जणू झुलले पाऊस जाग्या करतो आठवणी तुझ्या माझ्यादेतो एक वेगळाच विसावा.
हळुवार दाटती मेघ नभी हळुवार पसरतो गारवा सर्वांग फुलते आगमनाने भरुन वाहतो मनी स्पर्श नवा, हर्ष नवा.
पाऊस आला भुई भिजली मृदगंधाने मोहिनी घातली हिरवी तरु मोहरुनी गेली तव गालावर लाली आली.
तहानलेल्या त्या धरतीला आता चिंब भिजायचं पहिल्या पावसाच्या थेंबात मला धुंद व्हायचंय.
Rain Quotes In Marathi
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- मराठी पहिल्या प्रेमाच्या कविता
- Pavsachi Kavita – पावसाची कविता मराठीमध्ये
- Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह २
धो धो कोसळत होता आता लागोलाग पडली उन्हे, आपण जरा कौतुक करावे, तर पाऊस करते नखरे.
पावसात ओलं होणे आणि चिंब भिजणे यात जितका फरक आहे तितका फरक आयुष्य जगण्यात आणि नुसतं अस्तित्वात असण्यात आहे.
मनात चिंब भिजण्याची आस आहे पावसा बरस एकदाचा आणि भिजव मला तुझ्या थेंबात मला चिंब भिजायचे आहे.
हळुवार दाटली मेघ नभी, हळुवार पसरतो गारवा, सर्वांग फुलवे आगमनाने भरून वाहतो मनी स्पर्श नवा हर्ष नवा.
तहानलेल्या त्या धरतीलाही आता चिंब चिंब भिजायचं, पहिल्या पावसाच्या थेंबाना एवढं का मग लाजायच.
Best Rainy Quotes in Marathi
तो बरसतंच असतो अधुनमधून मग माझेही डोळे पाणावतात ती संधी साधून.
पहिल्या पहिल्या पावसाने शिवार दरवळल मृद गंधाने, हिरवागार शालू घातला धरतीला या कोवळ्या गवताने.
पावसाची सर आता नुकतीच बरसली आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा झळकली.
पाऊस एकाच वेळी अनेक ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाच भिजण हे वेगळं असत.
पावसाळ्याचे दिवस घरी चहाचा कप आणि चांगले पुस्तक घेऊन घालवले पाहिजेत.
मला नेहमी पावसात फिरायला आवडते, त्यामुळे मला कोणीही रडताना पाहू शकत नाही.
Best Rainy Quotes in Marathi
प्रत्येक वेळी पाऊस पडतो तेव्हा माती प्रत्येक थेंब मोजते.
पावसाच्या आवाजाला भाषांतराची गरज नाही.
पाऊस म्हणजे केवळ पाण्याचे थेंब नव्हे तर पृथ्वीवरील आकाशाचे प्रेम आहे ते एकमेकांना कधीच भेटत नाहीत पण अशा प्रकारे प्रेम करतात.